सीधे मुख्य सामग्री पर जाएं

ट्रेडबायनरी या आघाडीच्‍या तंत्रज्ञान आणि कन्‍सल्टिंग कंपनीने महाराष्‍ट्रातील दापोलीमध्‍ये ग्रामीण आयटी सक्षमीकरण उपक्रम सुरू केला

ग्रामीण प्रतिभेच्या सक्षमतेसाठी ट्रेडबायनरीचा पुढाकार

दापोलीमध्‍ये परिवर्तनात्‍मक आयटी उपक्रम सुरू केला

मुंबई। ट्रेडबायनरी या आघाडीच्‍या तंत्रज्ञान आणि कन्‍सल्टिंग कंपनीने महाराष्‍ट्रातील दापोलीमध्‍ये ग्रामीण आयटी सक्षमीकरण उपक्रम सुरू केला आहे, ज्‍यामागे स्‍वावलंबी इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याचा उद्देश आहे, जी प्रकाशझोतात न आलेल्‍या टॅलेंटना निपुण करते, जागतिक एक्‍स्‍पोजरचा अनुभव देते आणि लहान नगरांमधील व्‍यावसायिकांना उद्योग प्रमुखांमध्‍ये बदलते. हा उपक्रम एक कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रयत्‍न असण्‍यासोबत दीर्घकालीन, व्‍यवसाय-संचालित मॉडेल देखील आहे, जो आर्थिक वाढ, कौशल्‍य विकास आणि आयटी विकेंद्रीकरणाची खात्री देतो.

नॉन-मेट्रो प्रांतांमधील कुशल व्‍यावसायिकांच्‍या व्‍यापक, प्रकाशझोतात न आलेल्‍या क्षमतेला ओळखत ट्रेडबायनरीने शाश्‍वत आयटी रोजगार संधी निर्माण करण्‍यासाठी हा पायलट प्रकल्‍प लाँच केला आहे. संस्‍थापक दर्शिल शाह आणि युवराज शिधये यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत हा उपक्रम प्रमुख आयटी हब्‍सपासून दूर अंतरावर असल्‍यामुळे दुर्लक्ष केले जाणाऱ्या आणि प्रीमियर कॅप्‍स प्‍लेसमेंटची कमी उपलब्‍धता असलेल्‍या पात्र टॅलेंटना सक्षम करण्‍याचा प्रयत्‍न करतो. स्‍वावलंबी टेक इकोसिस्‍टम घडवत कंपनी भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रामधील शहरी-ग्रामीण तफावत दूर करण्‍यास सज्‍ज आहे. 

या दृष्टिकोनाची मुलभूत बाब म्‍हणजे ट्रेडबायनरी नवीन दापोली-स्थित शाखेची स्‍थापना करेल, जिचे मालकीहक्‍क प्रामुख्‍याने कंपनी व तिच्‍या प्रमुख भागधारकांकडे असतील. हा उपक्रम सहा महिन्‍यांसाठी स्‍थानिक प्रतिभांना भरती व प्रशिक्षण देण्‍यासह सुरू झाला आहे, जेथे त्‍यांना स्‍पर्धात्‍मक आयटी पदांमध्‍ये निपुण होण्‍यासाठी अत्‍याधुनिक कौशल्‍ये व जागतिक एक्‍स्‍पोजरसह सुसज्‍ज करण्‍यात येईल. समकालीन आऊटसोर्सिंगच्‍या तुलनेत हे मॉडेल कंपनीमधील सर्व सुरूवातीच्‍या महसूलांमध्‍ये गुंतवणूक करत संपन्‍न, स्‍वतंत्र उद्योगाला चालना देते. यामधून दीर्घकाळपर्यंत अपरिहार्यतेची खात्री मिळते, ज्‍यामुळे दापोली नाविन्‍यतेचे उदयोन्मुख हब ठरेल आणि जागतिक तंत्रज्ञान लँडस्‍केपमध्‍ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्‍यास सक्षम होईल.

“टॅलेंट भौगोलिक क्षेत्रामुळे मर्यादित नसावे,'' असे ट्रेडबायनरीचे संस्‍थापक व संचालक युवराज शिधये म्‍हणाले. “लहान नगरांमधील अनेक गुणवंत टॅलेंटना पात्र संधी मिळत नाही आणि आमचे यामध्‍ये बदल घडवून आणण्‍याचे मिशन आहे. भारतातील ग्रामीण भागांमध्‍ये आयटी रोजगार आणत, ज्‍याची सुरूवात दापोलीसह करत आमचा संपन्‍न इकोसिस्‍टम तयार करण्‍याचा मनसुबा आहे, जेथे क्षमतेला निपुण केले जाईल, करिअर घडवले जातील आणि स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍था प्रगत होईल. टॅलेंटचा शोध व सक्षम करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी ही मोठ्या चळवळीची फक्‍त सुरूवात आहे.'' 

या उपक्रमाच्‍या अनुकूल परिणामांमधून दापोलीच्‍या स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थेला नवसंजीवनीची खात्री मिळते. आयटी व्‍यावसायिकांना त्‍यांच्‍या मूळगावांमध्‍ये प्रगती करण्‍यास सक्षम करत ट्रेडबायनरी सहाय्यक व्‍यवसायांमध्‍ये विकासाला गती देईल, पायाभूत सुविधा प्रबळ करेल आणि समुदायाचे स्‍वास्‍थ्‍य सुधारेल. दापोलीपलीकडे या मॉडेलची व्‍याप्‍ती वाढवण्‍याच्‍या सुस्‍पष्‍ट ब्‍लूप्रिंटसह कंपनीचा भारतातील ग्रामीण भागाला जागतिक आयटी क्षेत्रामध्‍ये पॉवरहाऊस बनवण्‍याचा दृष्टिकोन आहे. 

ट्रेडबायनरीचे संस्‍थापक व संचालक दर्शिल शाह म्‍हणाले, “ट्रेडबायनरी शहरी-ग्रामीण टॅलेंट तफावत दूर करण्‍याप्रती, लहान नगरांमधून जागतिक करिअर्सना चालना देण्‍याप्रती आणि टॉप टेक टॅलेंट फक्‍त महानगरांमधून न येता ग्रामीण भागांमधून देखील येतात हे दाखवून देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. हा उपक्रम आयटी विकेंद्रीकरणासाठी स्‍केलेबल मॉडेल आहे, जो भारतातील डिजिटल कर्मचारीवर्ग क्रांतीसाठी उदाहरण स्‍थापित करत आहे. या उपक्रमामधून नाविन्‍यता, सर्वसमावेशकता व शाश्‍वत प्रगतीप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते, जेथे कंपनी देशभरात तंत्रज्ञान-संचालित सक्षमीकरणासाठी नवीन मापदंड स्‍थापित करत आहे.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...