सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'आयपीएल'मध्ये एम. एस. धोनीचा अतूट वारसा 'मेन ऑफ प्लॅटिनम'बरोबर साजरा करण्याची संधी

मुंबई। 'इंडियन प्रीमियर लिग' अर्थात आयपीएलचा हंगाम सुरू होताच क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचतो. त्यातही विशेष बाब म्हणजे एम.एस.धोनी अर्थात सर्वांचा लाडका 'थाला' पुन्हा एकदा पिवळी जर्सी घालण्यासाठी सज्ज होतो. त्यामुळे देशभरातील त्याच्या चाहत्यांमध्ये एकप्रकारचा उत्साह संचारतो. एम. एस. धोनीच्या प्रत्येक चाहत्यासाठी हा फक्त एक खेळ नसून ते एक अतूट बंधन आहे जे विश्वास, लवचिकता आणि कायमचे टिकणारे क्षण यावर गुंफला गेला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात या दिग्गजाचा सन्मान करा आणि दुर्मिळ प्लॅटिनमपासून बनवलेले, खेळामधील सर्वोत्तम खेळाडूंच्या वारशाइतकाच टिकाऊ धातू असलेल्या खास 'मेन ऑफ प्लॅटिनम'चे 'एम.एस. धोनी सिग्नेचर एडिशन' खरेदी करून स्वत: त्याचे चाहते असल्याचे अभिमानाने मिरवा.

हा केवळ दागिनाच नाही, तर चाहत्यांसाठी त्यांची निष्ठा दाखवण्याचा, त्यांचा वारसा साजरा करण्याचा आणि त्यांच्या अतुलनीय भावनेचा एक तुकडा ते जिथे जातील तिथे घेऊन जाण्याचा हा एक मार्ग आहे. ९५ टक्के प्लॅटिनमपासून बनवलेल्या दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्यात स्वच्छ, ठळक रेषा आणि किमान सौंदर्याचा समावेश आहे, धोनीची स्वाक्षरी त्याच्या प्रवासाचे प्रतीक म्हणून प्लॅटिनममध्ये कोरलेली आहे. ते एक जाड ब्रेसलेट असो, एक आकर्षक चैन असो किंवा स्टेटमेंट रिंग असो, प्रत्येक डिझाइन त्याच्या कालातीत आकर्षणासह अत्याधुनिकता पुनर्परिभाषा करते. या आयपीएल हंगामात तुमच्या सामन्याच्या दिवशीच्या पेहरावात प्लॅटिनम दागिन्यांचा समावेश करा. तुम्ही जिथे जाल तिथे धोनीबद्दलच्या महान भावना घेऊन जाल.

सिग्नेचर कलेक्शनबद्दल धोनीने आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणतो की, “माझ्या क्रिकेट कारकिर्दीत प्रत्येक आव्हान, विजय आणि पाठ/अध्यायाने मला घडवले, मला खरी ओळख मिळाली. जीवनात आणि मैदानावरही मला मार्गदर्शन करणारी मूल्ये माझ्या मनात रुजवली गेली आहेत. प्लॅटिनम धातू दुर्मिळ, लवचिक आणि टिकाऊ धाटणीने बांधलेले आहे. अगदी प्रत्येक आव्हानावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिकतेप्रमाणेच त्याची बांधणी असते. माझ्यासाठी, प्लॅटिनमचे दागिने घालणे हे धैर्यवान असल्याची आठवण करून देणारे आहे. 'मेन ऑफ प्लॅटिनम'बरोबरचा सहयोग हेच यानिमित्त खास ठरते. या संग्रहातील प्रत्येक कलाकृती क्षणिक कलाच्या (ट्रेंड) पलीकडे जाते. हा संग्रह कालातीतपणाचे प्रतीक आहे. त्यातून चिकाटी, आत्म-अभिव्यक्ती आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.''

'मेन ऑफ प्लॅटिनम'च्या 'धोनी सिग्नेचर एडिशन'च्या काही दागिन्यांवर एक नजर टाकू, ज्यात ते परिधान करणाऱ्यांमध्ये एकप्रकारची समान महानता निर्माण करण्यासाठी खास डिझाइन केलेले आहेत. तुम्ही स्टँडवरून जल्लोष करत असाल, लाऊंजमध्ये सामन्याचा थरार अनुभवत असाल किंवा खास स्क्रीनिंगचे आयोजन करत असाल, तुमचे खेळाच्या दिवशीचे दिसणे हे अशा दागिन्यांनी अद्ययावत करा की जो तुमच्यातील आत्मविश्वास, शैली आणि अतूट विजयी भावना दर्शवतो.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...