सीधे मुख्य सामग्री पर जाएं

कोलोरेक्टल कॅन्सर साठी अपोलोने सुरु केला सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम

बदललेल्या जीवनशैलीमुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ

नवी मुंबई। भारतामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरच्या केसेस सतत वाढत आहेत. कोलोरेक्टल कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखू यावा आणि त्याला प्रतिबंध घातला जावा यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर्सने एक सर्वसमावेशक स्क्रीनिंग कार्यक्रम 'कोलफिट' सुरु केला आहे. रुग्णांच्या जिवंत राहण्याच्या दरामध्ये सुधारणा व्हावी, उपचारांच्या खर्चात घट व्हावी आणि निदान करण्यात विलंब यासारख्या चिंताजनक समस्या दूर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 'कोलफिट' मध्ये वृद्ध आणि युवक दोघांसाठी देखील सीआरसी स्क्रीनिंग वाढवण्यावर ध्यान केंद्रित करण्यात आले आहे, आजार लवकरात लवकर लक्षात यावा यावर भर देण्यात आला आहे. भारतात सीआरसीचा वय दर दर १,००,००० पुरुषांमागे ७.२ आणि दर १,००,००० महिलांमागे ५.१ आहे, जो खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या १ अरबपेक्षा जास्त आहे, त्यामानाने केसेसची संख्या खूप जास्त आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे भारतात गेल्या पाच वर्षांमध्ये या आजाराच्या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर ४०% पेक्षा कमी आहे.

धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात बदललेली जीवनशैली व आहारातील बदल, व्यायामाचा अभाव, तंबाखू आणि मद्य सेवन, अनियमित झोप, लठ्ठपणा आणि मधुमेह, या सर्व कारणामुळे आतड्याच्या कर्करोगात वाढ होत आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर हे प्रमाण अजून वाढत जाईल असे वास्तव समोर आले आहे. फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड, रेड मीट, जंक फूड यांचे प्रमाण वाढले असल्याने व आहारात भाज्या, फळे, आणि तंतुमय पदार्थ नसल्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते आहे. त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. नियमित शारीरिक हालचाल नसल्याने स्थूलता आणि शारीरिक निष्क्रियता आल्याने आतड्यांमध्ये घाण साचून आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका वाढत आहे.

दिनचर्या व आपली आधुनिक जीवनशैली सुधारत, आहारात भरपूर फायबर, फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा. व्यायामाची सवय लावावी आणि लठ्ठपणा नियंत्रित ठेवावा. तंबाखू, मद्य आणि जंक फूड टाळावे. वेळच्या वेळी तपासणी करावी. असे डॉ. पुरुषोत्तम  वशिष्ठ यांनी  ‘कर्करोग आतड्याचा’ या अपोलो हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी सांगितले.यावेळी डॉ अरूणेश पुनेथा, डॉ अनिल डिक्रुझ, डॉ. दीपक कुमार गुप्ता, राजेश शिंदे उपस्थित होते.

अपोलो कॅन्सर सेंटर्सच्या 'कोलफिट' कार्यक्रमामध्ये फेकल इम्युनोकेमिकल टेस्टचा समावेश आहे. सीआरसी समजून येण्यासाठी या अभूतपूर्व दृष्टिकोनाचा वापर करण्यात आला आहे. हे एक नॉन-इन्वेसिव, अतिशय अचूक स्क्रीनिंग टूल आहे, ज्यामध्ये मलातील रक्त समजून येते, जे सीआरसीचे संभाव्य प्रारंभिक संकेतक आहे. FIT साठी फक्त एकाच नमुन्याची आवश्यकता असते. FIT उच्च संवेदनशीलता प्रदान करते आणि आहारावर प्रतिबंध घालण्याची गरज नसते. हा एक सुविधाजनक आणि रुग्णांसाठी अनुकूल पर्याय आहे.

डॉ पुरुषोत्तम वशिष्ठ, सिनियर कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,"आपल्याला कोलोरेक्टल कॅन्सरसाठी रीऍक्टिव्ह केयरऐवजी प्रोऍक्टिव्ह स्क्रीनिंगकडे गेले पाहिजे. अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि स्थूलपणा यासारख्या जीवनशैलीमध्ये उद्भवणाऱ्या कारणांमुळे सीआरसीच्या केसेस वाढत आहेत. जास्त फायबर असलेला आहार, नियमित व्यायाम आणि लक्षणांची वाट न पाहता, स्वतःहून तपासण्या करून घेणे या गोष्टी आजार रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कोलफिटसह आम्ही FIT च्या माध्यमातून आजार लवकरात लवकर लक्षात येणे सोपे बनवत आहोत, एक सोपे, नॉन-इन्वेसिव परीक्षण गुंतागुंत कमी करू शकते आणि परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणू शकते."

डॉ राजेश शिंदे, कन्सल्टन्ट एचपीबी, जीआय, थोरॅसिक ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी, अपोलो कॅन्सर सेंटर्स मुंबई यांनी सांगितले,"कोलोरेक्टल कॅन्सर भारतामध्ये युवक आणि वयस्क दोघांमध्ये देखील वेगाने पसरत आहे, तरी देखील उशिरा निदान करण्यात येत असल्याने या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर खूप कमी आहे ही चिंतेची बाब आहे. जिथे स्क्रीनिंग कार्यक्रम चालवले जातात अशा देशांमध्ये अधिक चांगले परिणाम दिसून आले आहेत, जवळपास ५०% सीआरसी केसेस खूप पुढच्या टप्प्यांमध्ये लक्षात येतात, अजून २०% केसेस मेटास्टेसिससह समोर येतात. (लिंक) हा ट्रेंड उलटवण्यासाठी लवकरात लवकर परीक्षण आणि जागरूकता महत्त्वाची आहे. अपोलो कॅन्सर सेंटर्समध्ये आम्ही रुग्णांना मिळणारे परिणाम अधिक चांगले व्हावेत आणि भारतभर सीआरसीचे ओझे कमी करण्यासाठी कोलफिट, अचूक उपचार आणि सर्वसमावेशक देखभालीच्या माध्यमातून आजार लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...