मुलांचे शिक्षण आणि अभ्यासाचा दबाव या मुद्द्यावर आधारित "टेक इट इझी" हा हिंदी चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे
"टेक इट इझी" हा हिंदी चित्रपट ४ जुलै रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित मुंबई. विशेष मुलांवर बनलेला हा चित्रपट समाजाला एक अतिशय महत्त्वाचा संदेश देतो. पालकांच्या दबावाचा मुलांवर होणाऱ्या परिणामावर आधारित प्रोड्यूसर धर्मेश पंडित आणि राइटर डायरेक्टर सुनील प्रेम व्यास यांचा "टेक इट इझी" हा चित्रपट या आठवड्यात ४ जुलै रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. विक्रम गोखले, दीपानिता शर्मा, राज झुत्शी, अनंग देसाई यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी सजवलेला "टेक इट इझी" या चित्रपटाला अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार आणि नामांकने मिळाली आहेत. टेक इट इझीने ग्वाल्हेर चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला आहे, तर जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीतही नामांकन मिळाले आहे. ओशोंच्या "एज्युकेशन टू रिव्होल्यूशन" या पुस्तकापासून प्रेरित होऊन धर्मेश पंडित यांनी "टेक इट इझी" या चित्रपटाची कथा लिहिली आहे. शाळकरी मुलांच्या निष्पाप खांद्यावर पुस्तकांचे इतके वजन लादण्यात आले आहे असे निर्माते ...