सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘स्ट्रेटबॅट’तर्फे ‘एआय’वर आधारित स्मार्ट स्टीकर सादर

देशातील आघाडीचा स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी ब्रँड ‘स्ट्रेटबॅटने ‘एआयवर आधारित स्मार्ट स्टीकर सादर केले. यावेळी ग्लोबल क्रिकेट स्कूलचे सचिन बजाज, ‘स्ट्रेटबॅटचे सह संस्थापक मधुसूदन, ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल (ऑनलाइन), भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे आणि स्ट्रेटबॅटचे सह संस्थापक आणि सीईओ गगन डागा उपस्थित होते. हे स्मार्ट स्टीकर कोणत्याही क्रिकेट बॅटचे रूपांतर परफॉर्मन्स अॅनालिटिक्स साधनात करण्यास सक्षम आहे. अत्याधुनिक सेन्सर टेक्नॉलॉजीने युक्त असलेले हे स्टीकर ‘एलिव्हेट(elev8) तंत्रज्ञानावर आधारित असून, फलंदाजीतील डेटा मिळवून, त्याचे विश्लेषण करून वापराच्या पद्धतीत मोठा बदल घडवून आणते.

फलंदाजाला रिअल टाइममध्ये बॅटचा वेग, स्विंग अँगल, इम्पॅक्ट झोन आदी माहिती मिळणार 

मुंबई। देशातील आघाडीचा स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी ब्रँड असणाऱ्या ‘स्ट्रेटबॅट’ने अद्वितीय आणि क्रांतिकारी ‘एआय’वर आधारित स्मार्ट स्टीकर सादर केले असून, ते कोणत्याही क्रिकेट बॅटचे रूपांतर परफॉर्मन्स अॅनालिटिक्स साधनात करण्यास सक्षम आहे. अत्याधुनिक सेन्सर टेक्नॉलॉजीने युक्त असलेले हे स्टीकर ‘एलिव्हेट’ (elev8) तंत्रज्ञानावर आधारित असून, फलंदाजीतील डेटा मिळवून, त्याचे विश्लेषण करून वापराच्या पद्धतीत मोठा बदल घडवून आणतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेही बॅटच्या मूळ वजनात किंवा अनुभवात कोणताही फरक न करता. हे केवळ एक स्टीकर नसून क्रिकेटसाठी नवीन युगातील ‘एआय’वर आधारित तंत्रज्ञान आहे.
महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल (ऑनलाइन) आणि किरण मोरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘सीसीआय’ येथे झालेल्या कार्यक्रमात या स्टीकरचे सादरीकरण करण्यात आले. कॅमेऱ्याशिवाय चालणाऱ्या ‘स्ट्रेटबॅट’च्या च्या ‘एलिव्हेट’ तंत्रज्ञानावर आधारित हे वजनाने अतिशय हलके स्टीकर फलंदाजाला रिअल टाइममध्ये बॅटचा वेग, स्विंग अँगल, इम्पॅक्ट झोन आदींची माहिती देते.
भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे म्हणाले, की "या एआय तंत्रज्ञानामुळे देशातील युवा खेळाडू आता त्यांच्या खेळाचे अचूक विश्लेषण प्राप्त करू शकतात; एके काळी हा अनुभव केवळ व्यावसायिक खेळाडूंनाच मिळत होता. हे तंत्रज्ञान गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून माझ्या अकादमीत अगदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतही या तंत्रज्ञानाचा वापर करीत असून त्याचा परिणाम दिसून येत आहे. मी टेकसॅव्ही माणूस नाही; पण बडोद्यात हे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर माझे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. बॅटचा वेग आणि वेळेचा मागोवा घेण्यापासून ते हेड पोझिशन आणि बॅलन्सपर्यंत हे तंत्रज्ञान नवख्या खेळाडूंपासून व्यावसायिक खेळांडूपर्यंत प्रत्येक स्तरावरील खेळाडूंना मदत करते. क्रिकेट ऑस्ट्रेलियासारख्या प्रमुख संघटनांकडून याचा अवलंब करण्यात येत आहे. दिवसेंदिवस क्रिकेट आधुनिक होत असून, हे तंत्रज्ञान त्याचाच एक भाग आहे."
या सादरीकरणासोबतच ‘स्ट्रेटबॅट’ने अमेरिकेतील विस्ताराचीही घोषणा केली. कंपनीचे अमेरिकेतही विशेषकरून टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क सारख्या उदयोन्मुख क्रिकेट बाजारांवर लक्ष आहे. अमेरिकेत क्रिकेटला मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे ‘एलिव्हेट’ टेक्नॉलॉजी आता जागतिक युवा खेळाडूंना व्यावसायिक तंत्रज्ञान वापरण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
‘स्ट्रेटबॅट’चे सह संस्थापक आणि सीईओ गगन डागा म्हणाले, की ‘स्मार्ट स्टीकरच्या माध्यमातून आम्ही व्यावसायिक स्तरावरील परफॉर्मन्स ट्रॅकिंग प्रणाली आता सुलभ, स्टायलिश आणि सर्वांनाच उपलब्ध करून दिली आहे. आम्ही केवळ अमेरिकेपुरताच विस्तार करत नसून, मुंबईपासून ब्रुकलिनपर्यंत नेक्स्ट जनरेशन क्रिकेट इंटेलिजन्सचा विस्तार करत आहोत.’ या स्टीकरचे खास वैशिष्ट्य म्हणजे कस्टमायजेबल डिझाइन होय. खेळाडू आता विविध स्टीकर डिझाईन्स आणि ब्रँड कोलॅबरेशन्समधून निवड करू शकतील आणि त्याच वेळी बॅट स्पीड, अँगल्स, इम्पॅक्ट झोन इत्यादींचे रिअल-टाइम ‘एआय’ विश्लेषण मिळवू शकतील.
ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल म्हणाले की, ‘हे खरोखरच जबरदस्त तंत्रज्ञान असून, आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत की एका साध्या स्टिकरच्या मदतीने स्मार्ट बॅट खेळाडू आणि प्रशिक्षक दोघांनाही इतकी सखोल माहिती देऊ शकते. आता खेळाडू स्वतःलाही प्रशिक्षित करू शकतात किंवा प्रशिक्षकांशी दूरस्थ पद्धतीने काम करू शकतात. सराव किंवा सामन्यांमधून मिळणारा डेटा रिअल-टाइम फीडबॅक देण्यासाठी मदत करीत आहे. जशी ट्रॅकमॅनने गोल्फमध्ये क्रांती घडवली; तशीच क्रांती स्ट्रेटबॅट क्रिकेटमध्ये घडविणार आहे."
‘अमेरिकेतील क्रिकेट सध्या कोलंबसच्या म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यात आणि त्यामुळेच तिथे प्रवेश करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे,’ असे ‘स्ट्रेटबॅट’चे सह संस्थापक मधुसूदन यांनी सांगितले. ‘स्ट्रेटबॅट’ हे पूर्णपणे स्वदेशी आणि देशातच विकसित केलेलं तंत्रज्ञान असून, ते जागतिक स्तरावरील सर्वोत्तम खेळाडूंनी स्वीकारले आहे. सर्व स्तरांवरील खेळाडूंना लक्षात घेऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. अमेरिकेत क्रिकेटचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता; विशेषत: भारतीय आणि दक्षिण आशियाई समुदाय, अनेक लीग क्रिकेटचा उदय आणि लॉस एंजेलिस ऑलिंपिकची तयारी पाहता आम्ही तेथे अगदी अग्रणी अ‍ॅथलिट्सपासून ते शेवटच्या घटकापर्यंत  पोहोचण्याची रणनीती आखली आहे. या तंत्रज्ञनाच्या मतीने आम्ही अमेरिकेतील क्रिकेटचे भविष्य घडविण्यासाठी आणि तेथील क्रिकेटचा अविभाज्य भाग होण्यासाठी उत्सुक आहोत,’असेही ते म्हणाले.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मुनज़्जा सबुवाला ही करीना कपूर आणि कतरिना कैफ यांच्यापासून प्रेरित आहे

मॉडेल ते अभिनेत्री अशी वेगाने प्रगती करणारी मुनज़्जा सबुवाला लवकरच अनेक नवीन आणि मनोरंजक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. ती लवकरच रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये तिच्या अभिनय कौशल्याचे प्रदर्शन करणार आहे. मुनज़्जाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि तिच्या संपूर्ण प्रवासात नेहमीच स्वावलंबनाला प्राधान्य दिले. तिच्या सुरुवातीच्या काळात, तिने तिच्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळण्याचे काम केले. तिच्या कमाईचा वापर करून, तिने तिचे फोटोशूट वापरले आणि स्वतःचा पोर्टफोलिओ तयार केला. या आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने तिला पुढे नेले. यानंतर, मुनज़्जाने मॉडेलिंग असाइनमेंट, रॅम्प वॉक, प्रिंट शूट आणि जाहिरात मोहिमांमध्ये सतत काम केले. तिने मिस पुणे ही पदवी जिंकली आणि तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तिने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक प्रतिष्ठित मॉडेलिंग शोमध्ये भाग घेतला, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मॉडेलिंग उद्योगात मजबूत उपस्थिती निर्माण केल्यानंतर, ती आता एक अभिनेत्री म्हणून एका नवीन आणि श...

"मेरे कृष्ण" हे नाटक भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख प्रकरणांचा उलगडा करेल

मुंबई। "मेरे कृष्ण" - भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य प्रवासाचे चित्रण करणारा एक भव्य रंगमंच - सादर केला जाईल. या नाटकात भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत सौरभ राज जैन, राधा आणि महामायाच्या भूमिकेत पूजा बी. शर्मा आणि दुर्योधन आणि कंसाच्या भूमिकेत अर्पित रांका आहेत. हे नाटक राजीव सिंह दिनकर यांनी दिग्दर्शित केले आहे आणि विवेक गुप्ता, राजीव सिंह दिनकर आणि विष्णू पाटील यांनी निर्मिती केली आहे. हे नाटक डॉ. नरेश कात्यायन यांनी लिहिले आहे आणि मूळ संगीत उद्धव ओझा यांनी दिले आहे. २ तास ४५ मिनिटांच्या धावण्याच्या वेळेसह, "मेरे कृष्ण" हा एक तल्लीन करणारा नाट्य अनुभव आहे जो तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील दैवी, मानवी आणि तात्विक पैलूंमधून प्रवास करायला घेऊन जातो. हे नाटक भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रमुख प्रकरणांचे चित्रण करणाऱ्या २० जीवंत दृश्यांमधून उलगडते - वृंदावनातील बालपणापासून ते द्वारकेतील त्यांच्या शेवटच्या क्षणांपर्यंत. कालातीत तत्वज्ञानावर आधारित असले तरी, त्याची कथानक शैली मनोरंजक, दृश्यदृष्ट्या समृद्ध आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी आहे - नाट्य, संगीत,...

रिझवी कुटुंबाच्या मुली, रुमेरा आणि हमजा यांच्या लग्नाच्या उत्सवाची सुरुवात एका भव्य बिस्मिल्लाह समारंभाने झाली

सूफी नाईटमध्ये चादर समारंभ, एक सूफी मेळावा आणि वर मोहम्मद हमजा वारसी यांचा वाढदिवस होता. मुंबई। डॉ. अख्तर हसन रिझवी आणि रुबिना अख्तर हसन रिझवी यांच्या मुली, रुमेरा आणि हमजा यांच्या लग्नाच्या उत्सवाची सुरुवात मुंबईतील ताज लँड एंड हॉटेलमध्ये "बिस्मिल्लाह सेरेमनी" या भव्य समारंभाने झाली. या कार्यक्रमात चादर समारंभ, एक सूफी मेळावा आणि वर मोहम्मद हमजा वारसी यांचा वाढदिवस होता. या जोडप्याचा विवाह शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी मदिना येथे होणार आहे. लग्नाच्या उत्सवांना आधीच सुरुवात झाली आहे. बिस्मिल्लाह समारंभ पूर्णपणे काश्मिरी थीमवर होता, ज्यामध्ये काश्मिरी जेवण, काश्मिरी कहवा आणि काश्मिरी लोकगीते होती. दानिश-दावर (दानिश फारूक दार, दावर फारूक दार) यांनी लाईव्ह नाट सादर केले. वकार खान आणि बँडने त्यांच्या सूफी सादरीकरणाने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. अदनान मंजूरने सारंगी वाजवली. पहाडी गाण्यांची झलक सादर करण्यात आली, ज्यामुळे सुफी वातावरणात भर पडली. कार्यक्रमातील पाहुण्यांमध्ये खासदार वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख, हाजी अराफत शेख, अबू असीम आझमी, हिंदुस्तानी भाऊ,...