मुंबई। भारतातील सर्वाधिक पसंतीचा पॅकेज्ड फळांच्या रसाचा ब्रँड रिअलने गुणवत्ता आणि चवीचा वारसा जपत कॉकटेल मिक्सरची प्रीमियम श्रेणी 'रिअल चियर्स' लाँच करून रिअल पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.
पहिल्या टप्प्यात डाबरने रिअल चियर्स अंतर्गत जामुनटिनी, ग्रीन अॅपल मोजिटो, टॉनिक वॉटर आणि जिंजर एले हे चार आकर्षक प्रकार लाँच केले आहेत. आजच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिअल चियर्स अत्यंत बोल्ड, व्हायब्रण्ट आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये आणले आहे. प्रत्येक मिक्सर विचारपूर्वक निवडलेल्या सर्वोत्तम घटकांपासून बनवला आहे जेणेकरून चवीचे परिपूर्ण संतुलन साधता येईल. एकंदरीत रिअल चियर्स ग्राहकांना उच्च दर्जाचे घटक आणि स्वादिष्ट चवींसह एक मजेदार ज्यूस पिण्याचा दर्जेदार अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.
डाबर इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग उपाध्यक्ष मयंक कुमार यांनी सांगितले की, "रिअलमध्ये आम्ही सतत नाविन्यपूर्ण गोष्टी करून आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यास नेहमीच तयार असतो. या लाँचसह, रिअलने पेय (बेव्हरेज) श्रेणीतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. रिअल चियर्सच्या लाँचमुळे केवळ आमचा उत्पादन पोर्टफोलिओच मजबूत होणार नाही तर ग्राहकांच्या बदलत्या आवडी आणि गरजा देखील पूर्ण होतील. तसेच हे लॉन्च ब्रँडला आजच्या ग्राहकांशी, विशेषतः मिलेनियल्स आणि जनरेशन झेडशी जोडण्यास देखील उपयुक्त ठरेल."
दरम्यान ब्रँडने एक नवीन मोहीम देखील लाँच केली आहे जी रिअल आपला पोर्टफोलिओ कसा मजबूत करत आहे आणि कॉकटेलच्या जगात उच्च-गुणवत्तेच्या पेयांमध्ये आपली तज्ज्ञता कशी आणत आहे हे दर्शवते.
मोनिषा पराशर, जीएम मार्केटिंग – फूड्स डाबर इंडिया लिमिटेड यांनी सांगितले की, "रिअल चियर्सच्या लाँचिंगसह आम्ही कॉकटेल मिक्सरच्या जगात आमची खास गुणवत्ता आणि चव आणली आहे याचा आम्हाला आनंद आहे. रिअल चीअर्स अंतर्गत प्रत्येक मिक्सर वापरण्यास सोपा आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी परिपूर्णतेने डिझाइन केलेला आहे. रिअल चीअर्स तुमच्या कॉकटेल्सना अधिक आकर्षक बनवण्यासाठी सुविधा, गुणवत्ता आणि चव यांचे परिपूर्ण मिश्रण प्रदान करते."
रिअल चीअर्स मिक्सर २५० मिली कॅन फॉरमॅटमध्ये येतात ज्यामुळे ते वापरण्यास अत्यंत सोपे आहेत. रिअल चियर्स टॉनिक वॉटर आणि जिंजर एलेची किंमत ६५ रुपये आहे, तर रिअल चियर्स जामुनटिनी आणि ग्रीन अॅपल मोजिटोची किंमत ९९ रुपये आहे. रिअल चियर्स ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट, बिग बास्केट, झेप्टो यांसारख्या सर्व प्रमुख क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल तसेच हे लवकरच रिटेल चॅनेलवर देखील उपलब्ध होईल.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें