मुंबईच्या आरव अग्रवाल (AIR 10) आणि इश्मीत कौर (AIR 85) यांनी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) अंतर्गत NEET UG 2025 मध्ये मिळवले यश
मुंबई। देशातील आघाडीची टेस्ट प्रिपरेशन संस्था असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने अभिमानाने जाहीर केले की नेरुळ, मुंबईच्या आरव अग्रवालने NEET UG 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 10 (AIR 10) मिळवली असून दादरच्या इश्मीत कौरने AIR 85 मिळवली आहे. हे अपूर्व यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शैक्षणिक शिस्तीचे आणि AESL कडून मिळालेल्या जागतिक दर्जाच्या मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. हे निकाल 14 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून जाहीर करण्यात आले.
विद्यार्थी AESL च्या क्लासरूम प्रोग्रामचा भाग होते, जो खास NEET सारख्या कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय AESL द्वारे मिळालेल्या ठोस शैक्षणिक पाया, संकल्पनांची स्पष्टता आणि सातत्यपूर्ण व शिस्तबद्ध अभ्यास पद्धतीला दिले.
"या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आकाशचे अत्यंत आभारी आहोत. संरचित अभ्यासक्रम, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वैयक्तिक मेंटरिंगमुळे आम्हाला अवघड विषय अल्प वेळेत आत्मसात करता आले. AESL नसते तर हे यश शक्य झाले नसते," असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
AESL चे चीफ अकॅडेमिक आणि बिझनेस हेड डॉ. एच. आर. राव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, "NEET UG 2025 मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जे अपूर्व यश मिळवले आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण मिळवणे हे नक्कीच मोठे यश आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचेच नाही, तर त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचे आणि आमच्या शैक्षणिक टीमच्या समर्पित प्रयत्नांचेही फलित आहे. आम्ही त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत यशाच्या शुभेच्छा देतो."
NEET ही परीक्षा दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते आणि ती भारतातील सरकारी व खासगी वैद्यकीय (MBBS), दंतवैद्यकीय (BDS) आणि आयुष (BAMS, BUMS, BHMS इ.) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्रता परीक्षा आहे. याशिवाय, परदेशात प्राथमिक वैद्यकीय पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही परीक्षा आवश्यक आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें