सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पवित्र पिप्रहवा बुद्ध अवशेष १२७ वर्षांनंतर भारतात परत आणण्यात सरकारला यश

मुंबई: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने १२७ वर्षांनंतर पवित्र पिप्रहवा बुद्ध अवशेष यशस्वीरित्या भारतात परत आणले आहेत. हे अवशेष भगवान बुद्धांच्या नश्वर अवशेषांशी संबंधित असल्याचे मानले जात असून, भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी हा एका ऐतिहासिक क्षण ठरला आहे. अनेक दशलक्ष डॉलर्स किमतीचे हे अवशेष अलीकडेच हाँगकाँगमधील एका लिलावात आढळले होते. खासगी संग्राहकांकडून हे अवशेष विकत घेण्याचा धोका होता. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या मदतीने सांस्कृतिक मंत्रालयाने जलद आणि समन्वित हस्तक्षेप केल्यामुळे हा लिलाव थांबवण्यात आला. त्यानंतर ही कलाकृती भारतीय भूमीत परत आणण्यात आली.

 मूळतः ब्रिटिश सिव्हिल इंजिनिअर विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांनी सध्याच्या उत्तर प्रदेशातील पिप्रहवा येथून १८९८ मध्ये हे अवशेष शोधून काढले होते. बुद्धांच्या अनुयायांनी ईसवीपूर्व तिसऱ्या शतकाच्या आसपास हे अवशेष ठेवले होते, असे मानले जाते. हे अवशेष जगभरातील बौद्ध समुदायासाठी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत. भारतातील सर्वात महत्त्वाच्या पुरातत्वीय शोधांमध्ये या अवशेषांची गणना होते.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हे अवशेष परत आणल्याच्या घटनेचे एक अभिमानास्पद टप्पा म्हणून वर्णन केले आहे. 'आपल्या हरवलेल्या वारशाच्या परतफेडीच्या सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी ही एक आहे आणि आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि पुढाकाराशिवाय हे शक्य झाले नसते,' असे शेखावत म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स' समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या. मोदी म्हणाले की, "हा आपल्या सांस्कृतिक वारशासाठी एक आनंदाचा दिवस आहे. भगवान बुद्धांचे पवित्र पिप्रहवा अवशेष १२७ वर्षांनंतर घरी परतले आहेत, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. आपल्या गौरवशाली संस्कृतीच्या विविध पैलूंचे जतन आणि संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे."

आगामी काही आठवड्यांत या अवशेषांचे औपचारिक अनावरण केले जाईल आणि ते सार्वजनिक प्रदर्शनात ठेवण्यात येतील. परराष्ट्र मंत्रालय (एमईए) आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे २०१६ पासून भारताने केवळ एकट्या अमेरिकेतून ५७८ कलाकृती परत मिळवल्या आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासह, परदेशातील भारतीय उच्चायुक्त आणि दूतावासांशी जवळून समन्वय साधून, ही मंत्रालये भारताच्या प्राचीन वारशाचे अमूल्य अवशेष परत मिळवण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...