माजी ए.सी.पी. आणि बॅ.अ.मु. अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भव्य सुरुवात: मुंबईत सब ज्युनियर बॅडमिंटन नॅशनल्सचे उद्घाटन
मुंबई। बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई सबअर्बन (बॅ.अ.मु.) यांच्या वतीने “योनेक्स सनराईज ऑल इंडिया सब ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन टूर्नामेंट 2025” चे आयोजन गोरेगाव स्पोर्ट्स क्लब, मुंबई येथे 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेला देशभरातील 28 राज्यांमधून एकूण 611 प्रवेशिकांसह उदंड प्रतिसाद लाभलेला आहे.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (एम.बी.ए.) आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बी.ए.आय.) यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या बॅ.अ.मु. यांना केवळ दोन वर्षांत मिळवलेल्या विश्वासामुळे या राष्ट्रीयस्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
ही स्पर्धा 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता सुरु झाली असून, उद्घाटन आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते पार पडले. बॅ.अ.मु. अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, सचिव समीर पाटणकर, कोषाध्यक्ष जॉर्ज वर्गीस आणि सहसचिव रवी दोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजक समितीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या संयुक्त सचिव आणि इनडोअर स्पोर्ट्स कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती राखी सोनिग्रा यांनीही स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
स्पर्धेतील उपांत्य फेरीतील खेळाडूंना, उपविजेत्यांना व अंतिम फेरीतील विजेत्यांना एकूण 6 लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा सारस्वत बँक लिमिटेड, पिरामल कॉर्पोरेट सर्व्हिसेस, क्रीडा भारती आणि वायुपुत्र बिल्डर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स यांच्या सौजन्याने प्रायोजित करण्यात आली आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें