सीधे मुख्य सामग्री पर जाएं

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या अँथे चा 16 वर्षांचा यशस्वी प्रवास

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या अँथे चा 16 वर्षांचा यशस्वी प्रवास – आता सुरू आहे अँथे 2025:
उद्याच्या समस्यांचं समाधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अँथे 2025 ची घोषणा
इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी
₹250 कोटींपर्यंत शिष्यवृत्ती (१००% पर्यंत) आणि ₹2.5 कोटींचे रोख पारितोषिक जाहीर! AESL ने 'आकाश इन्व्हिक्टस एस टेस्ट' लॉन्च केला – शिष्यवृत्ती आणि आकाश इन्व्हिक्टस मध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी
 अँथे परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात 4 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणार आहे.
• ही स्कॉलरशिप Classroom, Aakash Digital आणि इन्व्हिक्टस कोर्सेससाठी दिली जाणार आहे.
• मागच्या वर्षी 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती – एक नवा विक्रम झाला होता.
• NEET UG, JEE Main आणि Advanced चे अनेक टॉपर्स यांनी अँथे पासून आपली तयारी सुरू केली होती – NEET 2025 मधील टॉप 100 मधून 22 आणि JEE Advanced 2025 मधील टॉप 100 मधून 10 विद्यार्थ्यांनी अँथे दिली होती.
• AESL ने आकाश इन्व्हिक्टस एस टेस्ट देखील सुरू केला आहे – ही क्लासेस 8 ते 12 साठी खास राष्ट्रीय स्तरावरील स्कॉलरशिप परीक्षा आहे, ज्यामध्ये JEE च्या अ‍ॅडव्हान्स्ड तयारीसाठी मदत मिळेल. ही परीक्षा 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी होईल.
• नोंदणी सुरू झाली आहे – विद्यार्थी किंवा पालक https://anthe.aakash.ac.in/home या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा जवळच्या Aakash Institute च्या सेंटरला भेट देऊ शकतात.
• इन्व्हिक्टस एस टेस्ट साठी नोंदणीसाठी भेट द्या – https://www.aakash.ac.in/invictus-ace

मुंबई। मागील १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशात रूपांतरित करत आलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) या देशातील अग्रगण्य टेस्ट प्रिपरेटरी संस्थेने आपल्या प्रतिष्ठित उपक्रमाची – अँथे 2025 (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) – घोषणा केली आहे. भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रतीक्षित वार्षिक परीक्षा असलेल्या अँथे 2025 चा उद्देश इयत्ता ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जाण्यास आणि खर्‍या अर्थाने प्रॉब्लेम सॉल्व्हर्स होण्यासाठी सक्षम करणे हा आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अँथे 2025 द्वारे विद्यार्थ्यांना ₹२५० कोटींपर्यंतचे १००% स्कॉलरशिप्स आणि ₹२.५ कोटींच्या रोख पारितोषिकांची संधी दिली जात आहे. ही संधी क्लासरूम, आकाश डिजिटल आणि इन्विक्टस कोर्सेससाठी उपलब्ध आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना NEET, JEE, राज्य CETs, NTSE आणि ऑलिंपियाड्ससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आकाशच्या अनुभवी मार्गदर्शकांकडून दर्जेदार मार्गदर्शन घेण्याचा मार्ग खुला होतो.
या वचनबद्धतेला पुढे नेत, ‘आकाश’ आता इन्व्हिक्टस एस टेस्ट नावाची एक शिष्यवृत्ती परीक्षा देखील सुरू करत आहे. ही परीक्षा 8वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश इन्व्हिक्टस JEE Advanced तयारी कार्यक्रमात प्रवेश देण्यासाठी आयोजित केली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता व शिष्यवृत्ती परीक्षा 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी घेतली जाणार आहे. तीन तासांची ही परीक्षा (सकाळी 10 ते दुपारी 1) ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असेल. अर्ज फी ₹300 आहे. परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% पर्यंत शिष्यवृत्ती आणि आकर्षक रोख बक्षिसे दिली जातील. आकाश इन्व्हिक्टस हा अभ्यासक्रम फक्त निवडक इन्व्हिक्टस सेंटर्स मध्ये उपलब्ध आहे – दिल्ली-एनसीआर, चेन्नई, बेंगळुरू, लखनौ, मेरठ, प्रयागराज, देहरादून, भोपाळ, इंदूर, अहमदाबाद, चंदीगड, रोहतक, हैदराबाद, नमक्कल, कोयंबतूर, भुवनेश्वर, रांची, त्रिची, विशाखापट्टणम, मुंबई, कोलकाता, दुर्गापूर आणि पटना येथे.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे (AESL) सीईओ आणि एमडी दीपक मेहरोत्रा यांनी सांगितलं की, “अँथे हा आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं प्रतीक बनला आहे. मागील 16 वर्षांपासून आम्ही हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा यासाठी मदत करत आलो आहोत, मग त्यांची आर्थिक पार्श्वभूमी किंवा स्थान कुठलेही असो. आकाशमध्ये आम्हाला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये समस्यांचं समाधान शोधण्याची क्षमता आहे – जेवढं त्यांनी विचारपूर्वक आणि धाडसाने आव्हानांचा सामना केला, तेवढं ते यशस्वी ठरतात. अँथे 2025 हाच वारसा पुढे नेत आहे, जिथे पात्र विद्यार्थ्यांना योग्य साधनं, आधार आणि प्रेरणा दिली जाते, जेणेकरून ते खऱ्या अर्थाने चमकू शकतील. आमचं मजबूत नेटवर्क आणि हायब्रिड शिक्षण पद्धतीमुळे दर्जेदार शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि परिणामकेंद्रित बनतं आहे.
या वर्षापासून आम्ही 'इन्व्हिक्टस एस टेस्ट' देखील सुरू करत आहोत, जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हिक्टस कोर्समध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल. हा कोर्स JEE Advanced च्या तयारीसाठी खास डिझाईन केला असून विद्यार्थ्यांची कोर संकल्पनांवरची पकड आणि परीक्षेची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”
अँथे च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांत अनेक टॉप रँकर्स घडले आहेत. 2025 मध्ये 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, ज्यामुळे ही भारतातील सर्वात मोठ्या स्कॉलरशिप परीक्षांपैकी एक ठरली आहे. AESL चे अनेक टॉपर्स त्यांच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात अँथे मधूनच केली आहे. यंदा NEET च्या टॉप 100 मध्ये 22 विद्यार्थी आणि JEE Advanced 2025 च्या टॉप 100 मध्ये 10 विद्यार्थी हे अँथे द्वारेच पुढे आले आहेत.
ही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून घेतली जाईल, जेणेकरून देशभरातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर पर्याय मिळेल. अँथे 2025 ची ऑनलाइन परीक्षा 4 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान होईल आणि विद्यार्थी त्यांना सोयीच्या वेळेत एक तासाचं स्लॉट निवडून परीक्षा देऊ शकतील. ऑफलाइन परीक्षा 5 आणि 12 ऑक्टोबर 2025 रोजी भारतातील 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 415 पेक्षा जास्त आकाश सेंटर्सवर होणार आहे.
अँथे 2025 साठी नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थी https://anthe.aakash.ac.in/home या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात किंवा जवळच्या आकाश सेंटरला भेट देऊ शकतात. परीक्षा शुल्क ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीसाठी ₹300 आहे. लवकर अर्ज करणाऱ्यांना 50% सूट मिळेल. ऑनलाइन परीक्षेसाठी निवडलेल्या तारखेच्या तीन दिवस आधी आणि ऑफलाइन परीक्षेसाठी सात दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र परीक्षा तारखेच्या पाच दिवस आधी मिळेल. अँथे 2025 चे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होतील – इयत्ता 10वीसाठी 24 ऑक्टोबर 2025 रोजी, इयत्ता 7वी ते 9वीसाठी 29 ऑक्टोबर 2025 रोजी, इयत्ता 5वी व 6वीसाठी 1 नोव्हेंबर 2025 रोजी आणि इयत्ता 11वी व 12वीसाठी 4 नोव्हेंबर 2025 रोजी. सर्व निकाल अधिकृत अँथे वेबसाईटवर उपलब्ध असतील.
ही परीक्षा एक तासाची असेल आणि त्यात 40 मल्टिपल चॉईस प्रश्न असतील, जे विद्यार्थ्यांच्या वर्ग आणि करिअरच्या इच्छेनुसार असतील. इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय असतील – फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स आणि मेंटल अबिलिटी. 10वीच्या मेडिकल इच्छुक विद्यार्थ्यांसाठी – फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मेंटल अबिलिटी, तर इंजिनियरिंग इच्छुकांसाठी – फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि मेंटल अबिलिटी. 11वी-12वीच्या NEET इच्छुकांसाठी – फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी, तर इंजिनियरिंगसाठी – फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) आता परीक्षा तयारीला नवीन उंचीवर नेत आहे – दोन महत्त्वाच्या उपक्रमांसह: Aakash Digital 2.0 आणि आकाश इन्व्हिक्टस. Aakash Digital 2.0 हे एक AI-सक्षम, सर्व एकाच ठिकाणी असलेलं ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, जे NEET, JEE आणि ऑलिम्पियाडसाठी वैयक्तिक, परवडणारी आणि प्रभावी कोचिंग उपलब्ध करून देतं. दुसरीकडे, आकाश इन्व्हिक्टस हा एक खास, टॉप JEE Advanced विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेला प्रीमियम प्रोग्राम आहे, ज्यामध्ये छोट्या बॅचेस, देशातील टॉप 500 फॅकल्टी, AI-आधारित इनसाइट्स, एक्सक्लुसिव कंटेंट आणि कठोर टेस्टिंग-रिविजन मॉड्यूल यांचा समावेश आहे. हे फिजिकल + डिजिटल (Phygital) शिक्षण विद्यार्थ्यांना IIT किंवा जागतिक पातळीवरील इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अचूक मार्गदर्शन करतं.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने अँथे 2026 सुरू केले आहे

विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि स्पर्धात्मक यशासाठी तयार होण्यास मदत करणारी सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा. भारतातील सर्वात जुन्या प्रतिभा ओळख परीक्षेने गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना काय सुधारायचे आहे आणि पुढे काय करायचे आहे हे समजण्यास मदत करण्यासाठी शास्त्रीय मूल्यांकन, राष्ट्रीय बेंचमार्किंग आणि वैयक्तिकृत शैक्षणिक अंतर्दृष्टी यांचा मेळ साधते अँथे २०२६ एका दृष्टिक्षेपात: • अँथे ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळ चालणारी प्रतिभा शोध परीक्षा आहे, ज्यामध्ये गेल्या १६ वर्षांत १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. • परीक्षेतील प्रत्येक प्रश्न उद्देश-केंद्रित असून, तो विविध विषयांमधील विशिष्ट संकल्पना आणि क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केलेला आहे. • ही एक व्यापक, शास्त्रीय पद्धतीने तयार केलेली निदान चाचणी आहे, जी केवळ गुणांपलीकडे जाऊन विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, स्पर्धात्मक तयारी आणि परीक्षेतील वर्तणूक समजून घेते. • विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि कामगिरीसाठी १००% पर्यंत श...