मुंबई। प्रेस फोटोग्राफर रमाकांत मुंडे यांना प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर यांच्या हस्ते यावर्षीचा सांस्कृतिक कलादर्पण पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२७ व्या चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव पुरस्कार २०२५ चित्रपट महोत्सवाला प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर, निर्भीड लेखचे संपादक, नाट्यनिर्माते कांतीलाल कडू आणि निर्माते दत्ताजी जलाबे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या कार्यक्रमाला राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रमेश मोरे, लघुपट समीक्षक पद्माकर गांधी आणि लेखक महेंद्र पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी लघुपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोषाध्यक्ष सर्वेश सांडवे, स्पर्धा प्रमुख सुधीर सोमवंशी, व्यवस्थापक विकास मोझर, कार्यकर्ते गणेश तळेकर, लव क्षीरसागर, पराग सारंग, प्रतीक बोळे, आदर्श सातपुते, सागर पतंगे यांनी महोत्सवाचे विशेष आयोजन केले होते. या महोत्सवाचे संचालन तेजस्विनी मुंडे यांनी केले. अभिनेते गौरव मोरे, दिग्दर्शक समित कक्कड, दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर, लेखक संजय नवघिरे, दिग्दर्शक-निर्माते अजय भालेराव आणि तिरुपती बालाजी देवस्थानमचे पुजारी विविध चित्रपटांच्या प्रदर्शनाप्रसंगी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष-संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांनी सर्वांचे आभार मानले.
मराठी तरुणाई स्ट्रीट-आर्टमधील गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवणार मुंबई। झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड (झी) या भारतातील कंटेंट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने त्यांच्या नव्या प्रायोगिक टप्प्याच्या पहिल्या अध्यायाची झी लाइव्हची घोषणा केली. त्याअंतर्गत वर्ल्ड ऑफ वाइब्ज या टॅलेट कंपनीच्या सहकार्याने मराठी वाजलंच पाहिजे (एमपीव्ही) हा पहिला प्रमुख कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी फिनिक्स मार्केट सिटी, पुणे येथे होणार असलेला एमपीव्ही हा केवळ एक लाइव्ह कॉन्सर्ट नाही, तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामधे मराठी तरुणाई संस्कृतीचं प्रतिबिंब झळकणार असून हिप-हॉप, इंडी म्युझिक, स्ट्रीट आर्टमधील नव्या गुणवत्तेसह महाराष्ट्राच्या नव्या पिढीचं दर्शन घडवलं जाणार आहे. क्रॅटेक्स, संजू राठोड, श्रेयस अँड वेदांग, एमसी गावठी आणि पट्या द डॉक अशा ४०+ कलाकारांचा समावेश असलेलं हे फेस्टिवल धमाल उर्जेसह आजच्या तरुणाईची अस्सल आणि लोकल गोष्ट सांगणार आहे. एमपीव्ही हा असा मंच आहे, जिथं परंपरा आणि आधुनिक अभिव्यक्तीचा संगम होईल आणि आजच्या क्रिएटर्सच्या सूर, ...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें