सीधे मुख्य सामग्री पर जाएं

‘कापडिया हॉस्पिटल’ची ‘मिस्सो' प्रणालीसह अस्थिरोग शस्त्रक्रियेत क्रांती

मुंबई। कापडिया हॉस्पिटल’ने गुढघा बदल शस्त्रक्रियेसाठी भारतात रचना झालेली मिस्सो (एमआयएसएसओ) ही प्रगत रोबोटिक प्रणाली स्थापित करुन आपल्या अस्थिरोग शुश्रूषा अधिक उत्तम बनवली आहे. मुंबईत प्रथमच स्थापित झालेल्या या मिस्सो प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया नैपुण्य यांचा संगम असून त्यामुळे शस्त्रक्रियेत उच्च अचूकता येते, रुग्ण जलद बरा होतो आणि लोकांना दर्जेदार आरोग्यसुरक्षा मोठ्या प्रमाणात प्राप्त करता येते.

पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलेली ‘मिस्सो’ प्रणालीची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चलित अचूकता व किमान छेदन दृष्टीकोनामुळे रुग्ण जलद बरे होण्यास तसेच शस्त्रक्रियांची सुधारित फलिते मिळण्यास मदत होते. केंद्रीय उद्योग व पुरवठा मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते सादर झालेल्या मिस्सो प्रणालीने रोबोटिक सांधेबदलात गुणवत्तेचा नवा मापदंड स्थापित केला आहे.

‘मिस्सो’ची रचना व निर्मिती भारतात झाली असून त्यात शस्त्रक्रियांचे त्रिमित मापन (थ्री डी मॅपिंग) करण्यासाठी प्रगत संगणन (ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) व तत्काळ माहितीसाठा (रिअल-टाइम डाटा) यांचा वापर केला जातो ज्यामुळे शल्यविशारदांना अचूक छेद घेण्यास व रोपण करण्यास मार्गदर्शन होते. प्रणालीतील सिक्स-जॉइंट रोबोटिक आर्म, ट्रॅकिंग कॅमेरा व सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे तत्काळ सुधारणा करता येतात आणि सांध्यांची स्थिर व नैसर्गिक हालचाल साध्य होते. किमान छेदन (मिनीमल इन्व्हेजन) दृष्टीकोनामुळे उतिंचे (टिश्यू) नुकसान, रक्तस्त्राव व बरे होण्याचा कालावधी कमी होतो आणि रुग्णांना वेगाने दैनंदिन जीवन सुरळित जगण्यास मदत होते. आत्मनिर्भर भारत धोरणाशी संलग्न असलेली मिस्सो प्रणाली वैद्यकीय तंत्रज्ञानातील भारताच्या अभिनवतेचे प्रतिक असून त्यामुळे जागतिक दर्जाच्या रोबोटिक शस्त्रक्रिया लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोचू शकतील.

‘कापडिया हॉस्पिटल’चे रोबोटिक नी अँड शोल्डर सर्जन डॉ. राहुल मोदी म्हणाले, “मिस्सो प्रणालीने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व शस्त्रक्रिया नैपुण्याचा संगम घडवून भारतातील अस्थिरोग शस्त्रक्रियांची नवी व्याख्या रचली आहे. या स्वदेशी रोबोटिक प्रणालीमुळे अचूकता प्राप्त होते, रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होतो, शस्त्रक्रियेची फलिते सुधारतात आणि रुग्णांना खूप आराम मिळून पुन्हा हालचाल करणे जलद शक्य होते. वैद्यकीय तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे रुग्ण शुश्रूषेच्या गुणवत्तेचा मापदंड उंचावला गेला आहे व अत्याधुनिक अस्थिरोग उपचार अधिक प्रभावी व अधिक लोकांपर्यंत पोचणारे झाले आहेत.”

‘कापडिया हॉस्पिटल’चे संस्थापक, मालक व कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. राजन मोदी म्हणाले, “मिस्सो प्रणालीच्या बहुगुणांमुळे ती आगळी ठरते आणि आम्हाला विविध अस्थिरोग शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने करणे शक्य होते. पारंपरिक रोबोटिक प्रणालींच्या तुलनेत मिस्सो प्रणाली शस्त्रक्रिया कार्यप्रवाहांचे सुसूत्रीकरण करते व विविध प्लॅटफॉर्म वापरण्याची गरज न उरता रुग्णालय साधनसंपत्तीचा कुशल वापर घडवते. डेकेअर नी रिप्लेसमेंट सर्जरींचा समावेश केल्याने रुग्ण लवकर बरे होणे, उच्च कार्य़क्षमता, सुधारित संपर्क, रुग्ण शुश्रूषा दर्जाचे नवे मापदंड यासारखी वैशिष्ट्ये आता आम्ही देऊ शकतो.”

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...