हवामानातील बदला-बद्दल जागरूकतेसाठी 'टाटा टी जागो रे' वचनबद्ध आहे
मुंबई : टाटा टी जागो रे सादर करत आहे नवीन मोहीम आणि यावेळी हा ब्रँड हवामानातील बदलाविरुद्धच्या सुरू असलेल्या लढ्यात योगदान देत आहे. 'प्रत्येक ग्रीन अॅक्शनने फरक पडेल' ही मोहीम एआय-संचालित आहे आणि लोकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात लहान पण अर्थपूर्ण गोष्टी करण्यास प्रेरित करण्याचा उद्देश आहे, जेणेकरून एकत्रितपणे पर्यावरणावर अधिक सकारात्मक प्रभाव पाडू शकतील. ‘टाटा टी जागो रे’ आपल्या काळातील सर्वात मोठ्या संकटाबद्दल - हवामानातील बदलाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ही मोहीम त्यालाच पुन्हा एकदा पुष्टी देते, तसेच सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी ग्राहकांना जागृत करण्यासाठी उत्प्रेरक बनण्याच्या ब्रँडच्या उद्दिष्टाला पुढे नेते.
हवामानातील बदलाविरुद्ध पावले उचलण्यात रस नसणे, त्याविषयी चिंता न वाटणे किंवा कृती करण्याची प्रेरणा नसणे, ही सर्वात मोठी आव्हाने आहेत ज्यामुळे ही समस्या सोडवणे कठीण होते. या समस्येचे गांभीर्य माहिती असूनही, लोक त्यावर कृती करण्याचा प्रयत्न करत नाहीत. अनेकदा असे मानले जाते आणि म्हटले जाते की एका व्यक्तीने काही केल्याने फारसा फरक पडणार नाही. 'जागो रे' अभियानाचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी, ग्राहकांनी केलेल्या प्रत्येक १० ग्रीन ऍक्शन्ससाठी, टाटा टी एक झाड लावण्यास वचनबद्ध आहे.
या मोहिमेत, 'टाटा टी जागो रे'ने त्यांच्या मायक्रोसाइट www.JaagoRe.com वर एक नाविन्यपूर्ण एआय-संचालित व्हॉट्सअॅप आधारित टूल आणले आहे. गुगलच्या जेमिनीसह तयार केलेले, हे टूल ग्राहकांना 'ग्रीन अॅक्शन्स'चा सकारात्मक परिणाम पाहण्यास सक्षम बनवते, जसे की, स्वयंपाक करताना भांड्यावर झाकण ठेवणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, एअर कंडिशनरचे तापमान व्यवस्थापित करणे आणि आंघोळ करताना शॉवरऐवजी बादली वापरणे इत्यादी दैनंदिन कामे. ग्राहक आता टाटा टी जागो रे चॅट टूल वापरून या ग्रीन ऍक्शन करतानाचे फोटो अपलोड करू शकतात. हे एआय टूल ग्रीन ऍक्शन ओळखण्यासाठी प्रगत इमेज रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करते आणि व्यक्तींना त्यांच्या प्रयत्नांचा पर्यावरणावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांबद्दल माहिती देते. यामुळे लोकांना खात्री मिळते की त्यांचे काम अर्थपूर्ण आहे आणि हवामान बदलाशी लढ्यामध्ये ते योगदान देत आहेत.
मुलेन लिंटास यांची संकल्पना असलेल्या फिल्ममध्ये हा संदेश अतिशय प्रभावीपणे देण्यात आला आहे. या फिल्ममध्ये पर्यावरणावर एकत्रितपणे सकारात्मक परिणाम करणाऱ्या दैनंदिन कृतींचे चित्रण केले आहे. फिल्मची सुरुवात होते एक महिला आणि पुरुष पर्यावरणाच्या सद्यस्थितीबद्दल चर्चा करत आहेत, येथे आपल्याला दिसतो एक मथळा जो कमी होत चाललेल्या ग्रीन कव्हरबद्दल भाष्य करतो. एकीकडे मोठ्या व्यक्तींना शंका वाटते पण, मुले मात्र छोट्या-छोट्या कृती रोजच्या रोज करून हवामानातील बदलांविरुद्ध लढाईचे नेतृत्व करत आहेत, जसे की, शॉवरऐवजी बादली वापरणे आणि भांड्यांमध्ये पदार्थ उकळत असताना त्यावर झाकण ठेवणे इत्यादी. मुलांच्या कोरस गायनातून, पर्यावरणासाठी लहान, सामूहिक कृतींचा संदेश मनावर ठसतो, जेव्हा प्रत्येकजण योगदान देतो तेव्हा अर्थपूर्ण बदल साध्य करता येतो यावर भर दिला जातो.
पुनीत दास, अध्यक्ष-पॅकेज्ड बेव्हरेजेस (भारत आणि दक्षिण आशिया), टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स म्हणाले,“टाटा टी जागो रे नेहमीच वर्तमान काळातील महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर समाजाची सामूहिक जाणीव वाढवण्यावर विश्वास ठेवत आले आहे. पृथ्वीचे भविष्य अबाधित राखसाठी हवामान बदलाविरुद्ध लढण्याची गरज आज सर्वात मोठी आहे. हवामान बदलाच्या आव्हानांविरुद्धच्या लढाईत, आपण अनेकदा सामूहिक कृतींच्या शक्तीच्या प्रभावाला कमी लेखतो. टाटा टी जागो रेचा हा नवीन उपक्रम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. रोजच्या रोज लहान कृतींमुळे किती अर्थपूर्ण फरक पडू शकतो हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. गुगल क्लाउडच्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हे अभियान तयार करण्यात आले आहे. आम्ही ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी आमचे संबंध अधिक सखोल करण्यासाठी एआयचा वापर करत आहोत. या उपक्रमाद्वारे, आम्हाला आशा आहे की, चांगल्या भविष्यासाठी अर्थपूर्ण बदल घडवून आणता येतील आणि लोकांकडून सामूहिक कृतीची शक्ती अनलॉक करता येईल, कारण ‘जर आपण सर्वांनी एक-एक करून कृती केली, तर फरक पडेल.'"
बिक्रम सिंग बेदी, व्हाईस चेयरमन-कंट्री एमडी, गुगल क्लाउड इंडिया म्हणाले,“युजर्सनी सबमिट केलेल्या कृतींची पडताळणी करण्याचे आव्हान दूर करण्यासाठी जेमिनीच्या प्रगत इमेज रेकग्निशन क्षमतांचा वापर करून टाटा टी जागो रे च्या नवीन अभियानामध्ये सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. या कृतींचे रिअल-टाइममध्ये विश्लेषण केले जाते आणि युजर्सना नैसर्गिक भाषेत त्वरित अभिप्राय आणि प्रमाणीकरण दिले जाते. हे जबाबदारी आणि कामगिरीची भावना दोन्हीला प्रोत्साहन देते. हे प्रभावी सोल्युशन वैयक्तिक परिणामांचे मापन करण्यास मदत करते, युजर्सच्या कृतींना मूर्त पर्यावरणीय लाभामध्ये रूपांतरित करते.”
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें