सीधे मुख्य सामग्री पर जाएं

ऑडी इंडियाच्या विक्रीत पहिल्‍या तिमाहीत वाढ

२०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीत १२२३ युनिट्सची विक्री करण्‍यात आली 

मुंबई : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीसाठी त्‍यांच्‍या विक्री आकडेवारीची घोषणा केली, जेथे १,२२३ युनिट्सच्‍या विक्रीसह सकारात्‍मक कामगिरी दिसून आली. या विक्रीमध्‍ये २०२४ च्‍या पहिल्‍या तिमाहीच्‍या तुलनेत १७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे, ज्‍यामधून लक्‍झरी कार बाजारपेठेतील ब्रँडची वाढती मागणी दिसून येते.

२०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील प्रभावी निकालांमधून आपला वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओ आणि नवीन पुरवठा साखळी स्थिरतेमधून फायदा घेण्‍याचे ऑडी इंडियाचे यशस्‍वी प्रयत्‍न निदर्शनास येतात. या विकासासाठी प्रमुख योगदानकर्ता म्‍हणजे ऑडी क्‍यू७ आणि ऑडी क्‍यू८ यांसारख्‍या मॉडेल्‍सची सातत्‍यपूर्ण लोकप्रियता. ही कामगिरी गेल्‍या वर्षापासून गतीवर आधारित आहे, जेथे ऑडी इंडियाने भारतातील रस्‍त्‍यांवर १००,००० कार्स धावण्‍याचा टप्‍पा साजरा केला.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ''आम्‍हाला पहिल्‍या तिमाहीच्‍या उल्‍लेखनीय निकालांसह २०२५ ची सकारात्‍मकतेसह सुरूवात करण्‍याचा आनंद होत आहे. गेल्‍या वर्षीच्‍या याच कालावधीच्‍या तुलनेत या वाढीमधून ब्रँड ऑडीमध्‍ये असलेला ग्राहकांचा आत्‍मविश्‍वास आणि आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओची ताकद दिसून येते. २०२४ मध्‍ये पुरवठ्यासंदर्भातील आव्‍हानांची यशस्‍वीपणे पूर्तता केली असल्‍याने आम्‍ही भारतातील लक्‍झरी गतीशीलतेकरिता वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहोत. आम्‍ही अपवादात्‍मक उत्‍पादने व अनुभव वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, तसेच आम्‍ही आगामी वर्षामध्‍ये सकारात्‍मक कामगिरीसाठी उत्‍सुक आहोत.''

ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस या ब्रँडच्‍या पूर्व-मालकीच्‍या कार व्‍यवसायाने आपली विकास गती कायम राखली, जेथे २०२४ मधील याच कालावधीच्‍या तुलनेत २०२५ च्‍या पहिल्‍या तिमाहीत २३ टक्‍के वाढ केली. देशभरातील प्रमुख ठिकाणी २६ केंद्रांसह कार्यरत राहत हा विभाग प्रमाणित पूर्व-मालकीच्‍या लक्‍झरी वेईकल्‍ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याच्‍या ऑडी इंडियाच्‍या धोरणाचा आधारस्‍तंभ आहे.

ऑडी इंडियाने नुकतेच 'ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स' लाँच केली, जी ऑडीच्‍या लाइनअपमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्‍ही आहे आणि या एसयूव्‍हीमध्‍ये लक्‍झरीच्‍या लॅपमधील दैनंदिन उपयुक्‍ततेसह अपवादात्‍मक कार्यक्षमता आहे. या एसयूव्‍हीला ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि २०२५ च्‍या तिसऱ्या तिमाहीपर्यंत संपूर्ण विक्री करण्‍यात आली आहे.

ऑडी इंडिया उत्‍पादन पोर्टफोलिओ: ऑडी ए४, ऑडी ए६, ऑडी क्‍यू३, ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू५, ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन स्‍पोर्टबॅक, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

‘फार्म टू फॉरेन’ उपक्रम महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पटलावर नेणार

असोचॅमच्या 'फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६' मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन  मुंबई। महाराष्ट्राचा ‘फार्म टू फॉरेन’ हा उपक्रम शेतकरी, उत्पादक, उद्योजक आणि जागतिक फॅशन उद्योगाला एकत्र जोडण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रमुख वस्त्रोद्योग आणि निर्यात केंद्र म्हणून नावारूपास येईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ‘द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (ASSOCHAM - असोचॅम) द्वारे मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव २०२६’ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेने “ॲडव्हान्सिंग इंडियाज ५एफ व्हिजन फॉर सस्टेनेबल अँड ट्रेसेबल टेक्स्टाईल व्हॅल्यू चेन्स” या संकल्पनेअंतर्गत आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, उत्पादक, शाश्वतता तज्ज्ञ आणि महत्त्वाचे भागधारक एकत्र आले होते. केंद्र सरकारच्या '५एफ विजन'—फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेनला अनुसरून असलेल्या या उपक्रमात भारताची जागतिक स्पर्धात्मकता मजबूत करणे, ह...

किया इंडियाने नवीन अकॅडमीसह डीलर ट्रेनिंग नेटवर्कचा विस्तार केला

मुंबई। किया इंडिया या देशातील प्रमुख मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आज अहमदाबाद, गुजरात येथील सुपरनोव्हा किया येथे आपल्या नवीन डीलर ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन केले. दरमहा जवळपास २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली ही अकॅडमी विक्री (सेल) आणि सेवा (सर्व्हिस) विभागांमधील कुशल व तज्ज्ञ डीलर टीम्स विकसित करण्याच्या किया इंडियाच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करते. ही अकॅडमी ग्रुप डीलरशिपमधील विक्री आणि सेवा टीम्ससाठी डीलर-नेतृत्वित लेव्हल-१ प्रशिक्षण उपक्रम राबवण्यास सक्षम करते. स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाची पायाभूत सुविधा निर्माण करून किया इंडिया नवीन कर्मचारीवर्गाचे जलद समावेशन, विद्यमान टीम्सच्या कौशल्यामध्ये सतत वाढ आणि मध्यवर्ती प्रशिक्षणावरील अवलंबित्व कमी करणे सुनिश्चित करते. हा दृष्टिकोन डीलरशिप पातळीवर कर्मचाऱ्यांची स्थिरता सुधारण्यासोबत भूमिकांवर आधारित सखोल प्राविण्य निर्माण करण्यास मदत करतो. या उपक्रमामुळे ठिकाण कोणतेही असो, ग्राहकांना स्पष्ट संवाद, जलद सर्व्हिस टर्नअराउंड वेळ, समान सर्व्हिस मानक आणि अधिक सुलभ मालकीहक्काचा अनुभव मिळण्यास मदत होईल. सध्याच्या...

फुजीफिल्म इंडियाने मुंबईत भारतातील पहिले 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी' सुरू केले

भारतातील पहिल्या 'फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी'चे उद्घाटन जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त करण्यात आले, जो छायाचित्रणाच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. ही आकर्षक जागा फुजीफिल्मचा संपूर्ण इमेजिंग पोर्टफोलिओ, क्रिएटर अनुभव आणि समुदाय-आधारित शिक्षण एकाच छताखाली एकत्र आणते. मुंबई। फुजीफिल्म इंडियाने ' फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी 'च्या उद्घाटनाची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील पहिले आणि जागतिक स्तरावरील अकरावे केंद्र आहे, जे फोटोग्राफी आणि इमेजिंगचा एक परिपूर्ण अनुभव देते. हे उद्घाटन जागतिक फोटोग्राफी दिनाच्या (१९ ऑगस्ट) दिवशी होत असून, या वर्षी फोटोग्राफीच्या शोधाला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे स्थित, हे दोन मजली, ५,७९५ चौरस फुटांचे केंद्र फुजीफिल्मच्या संपूर्ण इमेजिंग इकोसिस्टमला एकाच छताखाली एकत्र आणते. केवळ एक अनुभव केंद्र नसून, फुजीफिल्म हाऊस ऑफ फोटोग्राफी ही एक सर्जनशील जागा आहे, जिथे इमेजिंग तंत्रज्ञान, कला आणि कथाकथन एकत्र येतात. हे नवीन फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, कंटेंट क्रिएटर किंवा व्यावसायिक...