सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पोको सी७१ च्‍या विक्रीला फ्लिपकार्टवर सुरूवात

ब्‍लॉकबस्‍टर डिस्‍प्‍ले आणि पॉवर-पॅक वैशिष्‍ट्ये 

मुंबई। सात हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत अल्टिमेट ब्‍लॉकबस्‍टरचा अनुभव मिळणार आहे. पोको सी७१ स्‍मार्टफोन अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासाठी लाँच करण्‍यात आला आहे. या स्‍मार्टफोनमध्‍ये ६.८८ इंच एचडी+ १२० हर्टझ डिस्‍प्‍लेसह वेट टच डिस्‍प्‍ले सपोर्ट आणि डोळ्यांच्‍या संरक्षणासाठी ट्रिपल टीयूव्‍ही सर्टिफिकेशन आहे. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये ३२ मेगापिक्‍सल ड्युअल कॅमेरा आणि विशाल ५२०० एमएएच बॅटरी आहे. हा स्‍मार्टफोन अविश्‍वसनीय किमतीत फ्लिपकार्टवर उपलब्‍ध झाला आहे.

पोको सी७१ ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्‍टोरेज मॉडेलसाठी ६,४९९ रूपयांमध्‍ये आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्‍टोरेज मॉडेलसाठी ७,४९९ रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल, ज्‍यामुळे फ्लॅगशिप-लेव्‍हल वैशिष्‍ट्ये अधिक सहजसाध्‍य होतील.

पोको सी७१ ची निवड का करावी?

सेगमेंटमधील सर्वात मोठा व सर्वात स्‍मूद डिस्‍प्‍ले - अत्‍यंत स्‍मूद स्‍क्रॉलिंग व गेमिंगसाठी ६.८८ इंच एचडी+ १२० हर्टझ डिस्‍प्‍ले.

स्‍लीक, स्‍टायलिश डिझाइन - आकर्षक, लक्षवेधक लुकसाठी गोल्‍डन रिंग कॅमेरा डेको आणि विशिष्‍ट स्प्लिट-ग्रिड डिझाइन. फक्‍त ८.२६ मिमी जाडी, तीन रंगांमध्‍ये उपलब्‍ध: डिसर्ट गोल्‍ड, कूल ब्‍ल्‍यू आणि पॉवर ब्‍लॅक.

ट्रिपल टीयूव्‍ही सर्टिफाईड - सुरक्षित स्क्रिन अनुभवासाठी ब्‍ल्‍यू लाइट रिडक्‍शन, फ्लिकर-फ्री डिस्‍प्‍ले आणि लो मोशन ब्‍लर.

पॉवर-पॅक्‍ड परफॉर्मन्‍स - विनासायास मल्‍टीटास्किंगसाठी १२ जीबी डायनॅमिक रॅम (६ जीबी + ६ जीबी व्‍हर्च्‍युअल) + ऑक्‍टा-कोअर प्रोसेसर.

दीर्घकाळपर्यंत टिकणारी पॉवर - ५२०० एमएएच बॅटरीसह १५ वॅट फास्‍ट चार्जिंग स्‍मार्टफोन दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री देते.

प्रो प्रमाणे फोटोज व व्हिडिओज कॅप्चर करा - ३२ मेगापिक्‍सल ड्युअल कॅमेरासह प्रगत फोटोग्राफी वैशिष्‍ट्ये, फिल्‍म फिल्‍टर्स आणि नाइट मोड.

क्‍लीन अँड सेक्‍युअर अँड्रॉइड १५ - फ्यूचर-रेडी अनुभवासाठी २ मेजर अँड्रॉइड अपडेट्स आणि ४ वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स मिळवा.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...