सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मुंबईत फेडएक्सची इलेक्ट्रिक वाहनांद्वारे डिलिव्हरी सेवा

मुंबई। फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (“फेडएक्स”) ही जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कंपनी मुंबईत लास्ट-माइल डिलिव्हरीसाठी अतिरिक्त इलेक्ट्रिक वाहने (इव्ही) तैनात करून भारतात शाश्वत लॉजिस्टिक्सचे प्रमाण वाढवत आहे. अलीकडेच मुंबईत दाखल केलेल्या १३ टाटा एस इव्हीसह दिल्ली, बंगळूर सहितच्या प्रमुख भारतीय शहरांत कंपनीसाठी कार्यरत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांची एकूण संख्या ५९ वर पोहोचली आहे. हे प्रयत्न २०४० पर्यंत जागतिक स्तरावर कार्बन-न्यूट्रल ऑपरेशन्स साध्य करण्याच्या फेडएक्सच्या लक्ष्याशी सुसंगत आहेत. तसेच जगभरात अधिक शाश्वत पुरवठा साखळी सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

शाश्वतता आणि ब्रॅंड सिनर्जीची सांगड घालण्याच्या प्रयत्नात फेडएक्सने मुंबई, दिल्ली आणि बंगळूर मध्ये फेडएक्स-सीएसके को-ब्रॅंडेड इव्ही सुरू केल्या आहेत आणि जबाबदारीपूर्वक वस्तू पोहोचवण्याची आपली वचनबद्धता बळकट केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अधिकृत पार्टनर म्हणून हा उपक्रम वेग, नेमकेपणा आणि उत्कृष्टता या गुणांवर उभ्या असलेल्या दोन ब्रॅंडमधील दमदार संगतीचे प्रतिनिधित्व करतो. ही को-ब्रॅंडेड वाहने भारतातील कंपनीची उपस्थिती वाढवतात आणि मार्केटमधील त्यांची सध्या असलेली गुंतवणूक अधिक मजबूत करतात.

फेडएक्सच्या इंडिया ऑपरेशन्स आणि प्लॅनिंग आणि इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष सुवेंदू चौधरी म्हणाले, “फेडएक्स ही पहिली जागतिक डिलिव्हरी कंपनी होती, जिने २००३ मध्ये हायब्रिड इलेक्ट्रिक वाहने दाखल केली होती, तर बॅटरी-संचालित वाहनांचा आमचा प्रवास तर त्याही आधी १९९४ मध्ये सुरू झाला होता. हीच परंपरा पुढे नेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि भारतात शाश्वत लॉजिस्टिक्सला चालना देण्यात भूमिका बजावताना आम्हाला अभिमान वाटत आहे. टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याच्या आमच्या व्यावहारिक दृष्टिकोनासह आमच्या ग्राहकांना सेवा प्रदान करत असतानाच कार्बन उत्सर्जन कमीत कमी करण्याची काळजी आम्ही घेत आहोत.”

इलेक्ट्रिक वाहने स्मार्ट, स्वच्छ आणि कार्यक्षम सोल्यूशन्स प्रदान करून लॉजिस्टिक्स क्षेत्रात क्रांती घडवत आहेत. कार्बन उत्सर्जन आणि हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या पलीकडे जाऊन ही वाहने शाश्वत व्यावसायिक पद्धतींसाठी उपभोक्त्यांची वाढती पसंती मिळवत आहेत. शाश्वततेसाठीच्या उपभोक्त्यांच्या अपेक्षा वाढत आहेत. फेडएक्सने केलेल्या एका संशोधना त असे दिसून आले आहे की, ९०% भारतीय उपभोक्ते अशा व्यवसायांना प्राथमिकता देत आहेत, ज्या व्यवसायांत शाश्वत पद्धतींना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इव्हीचा अंगिकार करण्यात एक धोरणात्मक फायदा देखील दडलेला आहे. आपल्या इव्ही वाहनांचा ताफा वाढवण्याचे धोरण चालू ठेवून फेडएक्स अशा स्मार्ट, जबाबदार लॉजिस्टिक्स सोल्यूशन्सना चालना देत आहे, जी सोल्यूशन्स भारतातील पुरवठा साखळीच्या बदलत्या गरजा भागवताना पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव करतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...