फॉर्च्यून होल व्हीट ने महाराष्ट्र-गुजरात बाजारपेठांमध्ये ‘शुद्धतेची खरी पारख’ नावाची टेलिव्हिजन मोहीम सुरू केली
मुंबई : भारतातील अग्रगण्य फूड FMCG कंपन्यांपैकी एक असलेली AWL अग्री बिझनेस लिमिटेड (पूर्वीची अदानी विल्मर लिमिटेड) ने फॉर्च्यून होल व्हीटसाठी महाराष्ट्र आणि गुजरात या मुख्य बाजारपेठांमध्ये ‘शुद्धतेची खरी पारख’ नावाची समर्पित टेलिव्हिजन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि पॅकेज्ड होल व्हीट विभागात उच्च दर्जा पुरवण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेला अधोरेखित करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जे ग्राहक पूर्वापारपणे सुटा गहू खरेदी करतात अशा चोखंदळ ग्राहकांना एका विश्वासार्ह राष्ट्रीय ब्रँडकडून एक सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाचा पर्याय सादर करत सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम विशेषतः डिझाइन केला गेला आहे.
ही TVC एका आपल्या नेहमीच्या किराणा दुकानात चित्रित करण्यात आली आहे. तिथे एक उत्सुक तरुण मुलगी गव्हाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न विचारते आणि त्यातून फॉर्च्यून होल व्हीटच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांवर आधारलेली एक प्रभावी कथा साकारते. या फिल्मद्वारे ग्राहकांना सारखेपणा असलेले धान्य, त्याचा आकार, रंग, आणि ताकद यातून दर्जेदार होल व्हीटची स्पष्ट ओळख पटवून दिली जाते. या गोष्टी फॉर्च्यूनला पॅकेज्ड होल व्हीट विभागात सर्वोच्च मापदंड म्हणून प्रस्थापित करतात.
मुकेश मिश्रा, सीनियर व्हाईस प्रेसिडंट, बिझनेस हेड, सेल्स- मार्केटिंग विभाग AWL अॅग्री बिझनेस लिमिटेड म्हणाले,“ही मोहीम केवळ उत्पादनविषयक माहिती संदेश नाही तर हा भारतीय शेतकरी आणि जागरूक ग्राहकाला मन:पूर्वक केलेला सलाम आहे. या TVCs च्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना खरी गुणवत्ता कुठून येते याच्या प्रवासात सामील होण्यासाठी आमंत्रण देतो. फॉर्च्यून होल व्हीट हे शुद्धता, विश्वास आणि गुणवत्ता यांची ओळख आहे आणि आम्ही ती आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.”
फॉर्च्यून होल व्हीट अत्यंत काळजीपूर्वक निवडलेल्या शेतांमधून खरेदी केला जातो, जिथे धान्य सूर्यप्रकाशात पिकवले होते आणि अचूकतेने कापणी केली जाते. पोषणाच्या उच्च निकषांची पूर्तता होईल आणि सातत्यपूर्ण पोत व चव मिळेल हे सुनिश्चित करत प्रत्येक बॅच कठोर गुणवत्ता चाचण्यांतून जाते. ही मोहीम या अचूक सोर्सिंग आणि टेस्टिंग प्रक्रियेवर प्रकाश टाकते, आणि फॉर्च्यून होल व्हीट मधील प्रत्येक कण हा विश्वासार्ह आहे याची ग्राहकांना खात्री देते.
TVCs सध्या महाराष्ट्र आणि गुजरात मधील टेलिव्हिजन, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, थिएटर्स आणि स्थानिक माध्यमांवर सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे AWL अॅग्री बिझनेसच्या ग्राहक-केंद्रित कथनातील वचनबद्धतेला आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये ब्रँड गुंतवणूक वाढवण्याच्या उद्दिष्टाला बळ मिळत आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें