पीबीपार्टनर्सच्या आरोग्य विम्याने महाराष्ट्रात ५२ टक्के विक्रमी वाढीची नोंद केली; मुंबई ६,००० हून अधिक एजंट्ससह अग्रस्थानी आणि ओपीडी, प्रसूती व ज्येष्ठ नागरिक योजनांना वाढती मागणी
● पीबीपार्टनर्सचा आर्थिक वर्ष २६ मध्ये महाराष्ट्रातील एजंटची संख्या तिप्पट करण्याचा मनसुबा
● महाराष्ट्रातील आरोग्य विमा व्यवसाय आर्थिक वर्ष २५ मध्ये ५२ टक्क्यांनी वाढला
● मुंबई शहरातील ६,००० हून अधिक एजंट भागीदारांसह पीबीपार्टनर्सच्या विकासामध्ये अग्रस्थानी आणि महाराष्ट्रात १७,००० हून अधिक एजंट भागीदार
● प्रसूती, ज्येष्ठ नागरिक, ओपीडी योजनांमध्ये उच्च मागणी
● रिन्यूअल रिटेन्शन प्रोगाम एजंट्सना स्थिर, पेन्शन-सारखे कमिशन्स देतो
● समर्पित क्लेम्स सपोर्ट टीम जलद, सुलभपणे क्लेम पूर्णत्वाची खात्री देते
● प्रेरणादायी यशोगाथा: नाशिकमधील भाजीपाला विक्रेता ज्ञानेश राजेंद्र उगले पीबीपार्टनर्सच्या माध्यमातून टॉप एजंट ठरला
मुंबई। पीबीपार्टनर्स ही पॉलिसीबाजारची पीओएसपी शाखा महाराष्ट्रात झपाट्याने विस्तार करत आहे, जेथे मुंबई अग्रस्थानी आहे. शहरात नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हेल्थ इन्शुरन्सचे नॅशनल सेल्स हेड श्री. नीरज अधाना यांनी राज्यात आरोग्य विम्याच्या वाढत्या अवलंबनाला निदर्शनास आणले. महाराष्ट्रात १७,००० हून अधिक एजंट भागीदार आहेत, ज्यापैकी मुंबईमध्ये ६,००० हून अधिक एजंट भागीदार आहेत, ज्यामुळे पश्चिम भागामध्ये विमा प्रवेशाला गती मिळत आहे.
पीबीपार्टनर्सचे महाराष्ट्रात तिप्पट वाढीचे लक्ष्य असण्यासोबत आर्थिक वर्ष २६ पर्यंत ५०,००० हून अधिक एजंट भागीदार असण्याचा मनसुबा आहे, जेथे मुंबईमध्ये आधीच ६,००० हून अधिक एजंट भागीदार आहेत.
पत्रकार परिषदेची ठळक वैशिष्ट्ये:
विमा खरेदी वर्तणूक: महाराष्ट्रात आरोग्य विम्याच्या मागणीत मोठी वाढ होत आहे, ज्याचे प्रमुख कारण तरुण, जागरूक ग्राहक उच्च-मूल्य असलेल्या, व्यापक योजना निवडत आहेत. ते ओपीडी कव्हर, प्रसूती कव्हर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष पॉलिसी असे विविध पर्याय शोधत आहेत.
''पीबीपार्टनर्सने आर्थिक वर्ष २५ मध्ये महाराष्ट्रात आरोग्य विमा व्यवसायात ५२ टक्क्यांची प्रभावी वाढ केली. या वाढीमधून पीबीपार्टनर्सच्या विश्वासार्ह आणि कार्यक्षम सेवेमध्ये मुंबईकरांनी दाखवलेली वाढती जागरूकता आणि विश्वास दिसून येतो,'' असे पीबीपार्टनर्सचे हेल्थ इन्शुरन्सचे नॅशनल सेल्स हेड नीरज अधाना म्हणाले.
क्लेम्स अनुभव सोपे करण्यामध्ये एजंट भागीदारांची भूमिका: ''पीबीपार्टनर्समध्ये आम्ही क्लेम्सची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी समर्पित क्लेम्स टीम स्थापन केली आहे. ही टीम क्लेम्सची नोंदणी होताच नेटवर्क हॉस्पिटल आणि विमा कंपनी यांच्यात तात्काळ समन्वय साधण्यावर लक्ष केंद्रित करते, विलंब टाळण्यासाठी वेळेवर आणि कार्यक्षम प्रक्रिया सुनिश्चित करते, ग्राहकांकडून आवश्यक कागदपत्रे त्वरित गोळा करते आणि क्लेम नाकारल्यास स्पष्ट आणि वैध स्पष्टीकरण देते,” असे पीबीपार्टनर्सचे हेल्थ इन्शुरन्सचे नॅशनल सेल्स हेड नीरज अधाना म्हणाले.
खात्रीदायी रिन्यूअल कमिशन्स: पीबीपार्टनर्स सर्व एजंट भागीदारांसाठी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करते. रिन्यूअल रिटेन्शन प्रोग्राम खात्री देतो की, ग्राहक आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण करतो तेव्हा पीओएसपी एजंटना दरवर्षी खात्रीपूर्ण कमिशन मिळते. यामुळे आमच्या भागीदारांसाठी स्थिर, पेन्शनसारखा उत्पन्न प्रवाह तयार होतो. हमी नूतनीकरणामुळे अनेक एजंट भागीदार खूप कमी कालावधीत त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या २ ते ३ पट वाढ करू शकतात.
भाजीपाला विक्रेत्यापासून टॉप इन्शुरन्स पार्टनरपर्यंत: नाशिकमधील यशोगाथा: आर्थिक सक्षमीकरणासाठी पीबीपार्टनर्सच्या कटिबद्धतेवर प्रकाश टाकत नीरज अधाना यांनी नाशिक येथील आधी भाजीपाला विक्रेता असलेल्या ज्ञानेश राजेंद्र उगले याची प्रेरणादायी यशोगाथा सांगितली. फक्त दहावीचे शिक्षण घेऊन तो पीबीपार्टनर्समध्ये सामील झाला, ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारचे व्यापक प्रशिक्षण घेतले आणि तीन महिन्यांत भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विमा एजंट्सपैकी एक बनला. त्याच्या स्थानिक नेटवर्कचा फायदा घेत, तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि त्याने त्याचे उत्पन्न १० पट वाढवले. त्याच्यासारख्या गाथा जीवनाच्या सर्व स्तरातील व्यक्तींसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यात पीबीपार्टनर्सच्या परिवर्तनीय क्षमतेला सादर करतात.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें