हीलिंग मीट्स होप: दुर्दम्य इच्छाशक्तीला मानवंदना देत वोक्हार्ड्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलकडून कॅन्सर सर्व्हायवर्स डे चे आयोजन
मुंबई। जगभरात जून महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केल्या जाणाऱ्या कॅन्सर सर्व्हायवर्स डे च्या निमित्त कर्करोगातून सावरलेल्या रुग्णांच्या अपार ताकदीचा व धैर्याचा गौरव करण्यासाठी वोक्हार्ड्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलद्वारे रोजी एका हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “हीलिंग मीट्स होप” या विषयसूत्राभोवती गुंफलेल्या या स्नेहमेळाव्यामध्ये कर्करोगाचा ताठ मानेने व निर्धाराने सामना करणाऱ्या व्यक्तींनी खंबीरपणे केलेल्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकण्यात येईल.
या भावनिक व मनाला उभारी देणाऱ्या प्रसंगी कर्करोगातून बऱ्या झालेल्या व्यक्ती, त्यांचे कुटुंब, कर्करोगतज्ज्ञ व हॉस्पिटलच्या नेतृत्वफळीतील व्यक्ती एकत्र जमणार आहेत. वोक्हार्ड्ट हॉस्पिटल्सची देखभाल लाभलेल्या सर्व्हायव्हर्सच्या प्रेरणादायी वाटचालींसाठी त्यांचा गौरव केला जाईल – यातील प्रत्येक गोष्ट म्हणजे मानवी मनोधैर्याची ताकद व सर्वसमावेशी, सहृदय देखभालीचे महत्त्व यांचे मूर्त प्रतीक आहे.
वोक्हार्ट्ड हॉस्पिटल्स, मुंबई सेंटरचे सेंटर हेड डॉ. विरेंद्र चौहान म्हणाले, “हा सोहळा म्हणजे अविचल धैर्याने कर्करोगाशी लढा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दिलेली मानवंदना आहे. हा क्षण आत्मचिंतनाचा आहे तसाच आपल्या रुग्णांबरोबर फक्त केअरगिव्हर्स म्हणून नव्हे – तर बरे होण्यापर्यंतच्या व त्याहीनंतरच्या त्यांच्या प्रवासातील त्यांचे साथीदार म्हणून त्यांच्यासोबत चालण्याशी जपलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करण्याचा आहे.”
हा कार्यक्रम म्हणजे सर्वसमावेशक ऑन्कोलॉजी उपचार सुविधा अधिक प्रबळ करण्यावर हॉस्पिटलकडून भर दिला जात आहे ही बाब पुन:प्रस्थापित करण्यासाठीचा मंचही असणार आहे. आजाराचे लवकरात लवकर निदान करण्यापासून ते प्रगत निदानपद्धतींपर्यंत ते केमोथेरपीचा आधार व बहुशाखीय कन्सल्टेशन पुरविण्यापर्यंत वोक्हार्ड्ट हॉस्पिटल्स एकात्मिक सेवा पुरविण्याप्रती आपली बांधिलकी अधिकाधिक भक्कम करत आहे, ज्यामध्ये केवळ आजारच नव्हे तर रुग्णांच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घेतली जाते.
कर्करोगाच्या या आयोजनामध्ये अधिक प्रमाणात आढळून येणाऱ्या प्रकारांवर विशेषत्वाने भर दिला जातो, ज्यात डोके व मान, स्तन, उदरांत्र, स्त्रियांशी संबंधित, हाडे तसेच जननेंद्रीय व मूत्रमार्गाच्या अर्थात जेनिटोयुरिनरी कर्करोगाचा समावेश होतो. कर्करोगातून बऱ्या झालेल्या रुग्णांना निदानापासून ते आजारातून बाहेर येण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर तसेच त्यांच्या दीर्घकालीन स्वास्थ्यासाठी सहयोगात्मक देखभाल आणि चिकित्सेच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्टता यांच्या माध्यमातून आधार पुरविणे हे हॉस्पिटलचे लक्ष्य आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने वोक्हार्ड्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल कर्करोगाने प्रभावित व्यक्तींना अनुकंपायुक्त, रुग्ण-केंद्री देखभाल आणि दीर्घकालीन सक्षमतेप्रती आपली समर्पितता पुन:प्रस्थापित करत आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें