आकाशात आपले कौशल्य दाखवणाऱ्या अग्रगण्य महिलांच्या सन्मानार्थ कलेक्शन
मुंबई। टाटाची उपकंपनी असलेल्या कॅरेटलेनने अलीकडेच एक नवे, क्रांतिकारी ज्वेलरी कलेक्शन लॉन्च केले - 'रनवे'. विमान वाहतूक क्षेत्रातील महिलांचा उत्साह, महत्त्वाकांक्षा आणि सौंदर्याचा सन्मान यामध्ये करण्यात आला आहे. या लॉन्चसह कॅरेटलेन हा पहिला भारतीय दागिने ब्रँड बनला आहे जो आकाशात आपले कौशल्य दाखवणाऱ्या अग्रगण्य महिलांचा सन्मान करत आहे.
कॅम्पेन फिल्ममध्ये कमर्शियल पायलट, केबिन क्रू पायलट आणि लढाऊ पायलट यांच्या कथा दाखवल्या आहेत, त्यांनी या कलेक्शनमधून उड्डाणाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचे त्यांचे अनोखे मार्ग शोधले आहेत. या कॅटेगरीतील जगातील पहिले, रनवे कलेक्शन परंपरांच्या चौकटी ओलांडून आकाशाची उंची गाठतो. यात ९ कॅरेट आणि १४ कॅरेट सोने आणि हिऱ्यांमध्ये तयार केलेली २०+ डिझाइन्स आहेत. काही डिझाइन्समध्ये अतिशय आश्चर्यकारक मोबाइल एअरक्राफ्ट मोटिफ्स आहेत. प्रत्येक डिझाइन उड्डाण, धैर्य आणि उंच उडण्याच्या स्वप्नांची कहाणी सांगते.
कॅरेटलेनने मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या सिग्नेचर स्टोअरमध्ये ब्रँडने एका भव्य विशेष कलेक्शन प्रिव्ह्यू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वास्तविक जीवनातील केबिन क्रूंना यासाठी विशेष आमंत्रित केले होते. अभिनेत्री, राजकारणी आणि साहसप्रेमी गुल पनाग यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शान वाढवली. त्या स्वतः देखील एक परवानाधारक खाजगी पायलट आहेत.
सौमेन भौमिक, एमडी, कॅरेटलेन म्हणाले,“भारतातील विमान वाहतूक हा जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आपल्याकडे महिला पायलटची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाच्या काळापासून, विमान वाहतूक कर्मचारी स्टाईलचे आणि उदयोन्मुख, आधुनिक भारताचे प्रतीक मानले जात आहेत. विचारपूर्वक डिझाइन केलेले हे कलेक्शन दररोज आपले आकाश सुरक्षित, अधिकाधिक चांगले आणि स्मार्ट बनवणाऱ्या धाडसी महिलांना सन्मानित करते.”
गुल पनाग म्हणाल्या, “या कलेक्शनने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे. विमान वाहतुकीने मला पंख दिले आणि आता असे दागिने आहेत जे या भावनेला इतक्या स्टायलिश आणि शाश्वत पद्धतीने साजरे करतात. हे कलेक्शन विमान उड्डाण प्रेमींसाठी परिपूर्ण आहे. उड्डाणापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे स्टाईलमध्ये उड्डाण करणे ही आहे!”
विमान वाहतूक, प्रवास आणि अशा अनोख्या डिझाइनमध्ये रस असलेले ग्राहक www.caratlane.com वर ऑनलाइन किंवा भारतातील निवडक स्टोअरमध्ये हे कलेक्शन पाहू शकतात.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें