सीधे मुख्य सामग्री पर जाएं

सलग चार वेळा ९ थरांची सलामी देत बाल गोपाल गोविंदा पथकाची ऐतिहासिक कामगिरी

कांजूरमार्ग पूर्वच्या बाल गोपाल गोविंदा पथकाचा दहीहंडी उत्सवात डंका; ईशान्य मुंबईत अभिमानाची कामगिरी

मुंबई : दहीहंडी उत्सवातील थरार, साहस आणि गोविंदांच्या जिद्दीचे दर्शन घडवत बाल गोपाल गोविंदा पथक, कांजूरमार्ग पूर्व यांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. २०२६ च्या दहीहंडी उत्सवात या पथकाने तब्बल चार वेळा ९ थरांची मानवी मनोरा रचना यशस्वीपणे साकारत आपल्या शिस्तबद्ध आणि दमदार कामगिरीची छाप उमटवली.

विशेष म्हणजे, विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवात बाल गोपाल गोविंदा पथकाने ९ थरांची रचना करत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. पहिल्या प्रयत्नात मोहन चिराठ, नाहूर, दुसऱ्या प्रयत्नात राधा फाउंडेशन, चेंबूर, तिसऱ्या प्रयत्नात विक्रोली, कन्नमवार नगर येथे ९ थर यशस्वीरीत्या रचण्यात आले. तर चौथ्या वेळी कांजूरमार्ग पूर्व येथे ९ थरांचा मनोरा रचना साकारत पथकाने आपल्या कामगिरीवर कळस चढवला.

या ऐतिहासिक यशामागे पथकातील गोविंदांची अथक मेहनत, नियमित सराव, शिस्त, एकजूट आणि परस्परांवरील विश्वास यांचा मोठा वाटा आहे. पथकाला कोच राजू लाखन बाबू पाटणकर आणि कोच विनोद वांगणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदांनी सुरक्षितता, समन्वय आणि अचूक संतुलन यांचा योग्य मेळ साधत ९ थरांची रचना यशस्वी केली.

दहीहंडीच्या मैदानावर उपस्थित नागरिकांनी बाल गोपाल गोविंदा पथकाच्या या कामगिरीचे कौतुक करत जल्लोष केला. सलग चार वेळा ९ थर रचण्याची कामगिरी ही पथकाच्या सातत्याचे आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक ठरली आहे.

ईशान्य मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बाल गोपाल गोविंदा पथकाचे या अभिमानास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

३,१०० भगिनींनी गौरीशंकर चौबे यांच्यासोबत राखी बांधून आणि संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले

मुंबई। दरवर्षीप्रमाणे, द्वारिकामाई चॅरिटी संस्थाने दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मालाड पूर्व येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधनानिमित्त एका भव्य 'रक्षा शक्ती सन्मान' सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे खजिनदार, आचार्य पवन त्रिपाठी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी, सुमारे ३,१०० भगिनींनी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गौरीशंकर चौबे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या सोहळ्यादरम्यान, गौरीशंकर चौबे म्हणाले की, रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर भगिनींशी मनापासून जोडले जाण्याचा आणि त्यांचा आदर व संरक्षण करण्याची शपथ घेण्याचा एक पवित्र प्रसंग आहे. ते म्हणाले की, बहिणींचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद ही समाजसेवेसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केल्याने प्रचंड आनंद आणि आपलेपणाची भावना अनुभवता आली. राखी बांधल्यानंतर, गौरीशंकर चौबे यांनी सर्व बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देत, त्यांना सर्वतोपरी संरक्षण, सन्मान आणि पाठ...

ॲनिमे इंडिया मुंबई २०२६: ४५,००० हून अधिक उपस्थितांची उपस्थिती आणि 'नारुतो'चे दिग्दर्शक हायातो डेट यांची ऐतिहासिक पहिली भारत भेट

● ॲनिमेशनएक्सप्रेस (AnimationXpress) द्वारे आयोजित या तीन दिवसीय संमेलनाने नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर चाहते, निर्माते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणले. ● या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जपानमधील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ होते; यात 'नारुतो' (Naruto) या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शक हायातो डेट यांच्या अत्यंत अपेक्षित अशा पहिल्या अधिकृत भारत भेटीचा समावेश होता. मुंबई। ॲनिमेशनएक्सप्रेसचा उपक्रम असलेल्या ' ॲनिमे इंडिया मुंबई २०२६' ची अधिकृत सांगता ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) प्रदर्शन केंद्रावर झाली. ४५,००० हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात चाहते, निर्माते, कलाकार, सादरीकरण करणारे कलाकार, गेमर्स, कॉस्प्लेअर्स आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले. २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित या संमेलनात ॲनिमे, मांगा (manga), गेमिंग, कॉस्प्ले, जपानी संगीत, व्हॉइस ॲक्टिंग, निर्मात्यांशी संवाद, स्क्रीनिंग, स्पर्धा आणि समुदायाद्वारे आयोजित विविध उपक्रम यांचा समावेश होता. उद्घाटनाच्या दिवशी ...

मेक इन इंडियाला बळ, आरआरपी डिफेन्स भारतासाठी आणणार 'डायमंड' AI सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

मुंबई। भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी ' आरआरपी डिफेन्स लिमिटेड' आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी ' ईएससी बाज ' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' (AI) आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे. काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान? 'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकत...