सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती

मुंबई: नवी मुंबईस्थित एफएमसीजी कंपनी मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, भारतातील प्रसिद्ध शेफ, पाककला तज्ज्ञ आणि रेस्टॉरेंटर शेफ हरपाल सिंह सोखी हे कंपनीसोबत इन्व्हेस्टर आणि ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जोडले गेले आहेत. ते कंपनीच्या प्रमुख ब्रँड इंची (Inchi)चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही काम पाहणार आहेत.
2017 मध्ये स्थापन झालेल्या आणि निखिल भारती, आर. पी. चटर्जी आणि मनीष पार्डीवाला यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंचीने अल्पावधीतच इंडो-चायनीज सेगमेंटमध्ये लोकप्रिय घरगुती ब्रँड म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ब्रँडकडे 100 हून अधिक उत्पादनांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. यामध्ये शेजवान डिप आणि स्प्रेड्स, नूडल्स, सॉसेस, गॉरमे आणि इन्स्टंट सूप्स तसेच खास कुकिंग मसाल्यांचा समावेश आहे. या उत्पादनांमुळे घरच्या घरी रेस्टॉरंटसारख्या इंडो-चायनीज पदार्थांची चव सहज अनुभवता येते.
या धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करताना मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर निखिल भारती म्हणाले,“उत्पादनांची मोठी आणि ग्राहकांना आवडणारी श्रेणी असलेल्या ब्रँड इंची आणि कंपनीच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही आता वेगवान विकासासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. आमच्या उत्पादनांप्रमाणेच सर्व स्तरातील ग्राहकांना आवडणारा आणि इंडो-चायनीज कॅटेगरीवर मनापासून विश्वास ठेवणारा ब्रँड फेस आम्ही शोधत होतो. शेफ हरपाल यासाठी अगदी योग्य व्यक्ती आहेत. त्यांच्या सहभागामुळे आणि धोरणात्मक सहकार्यामुळे पुढील 5 वर्षांत आमचा व्यवसाय ₹500+ कोटींपर्यंत नेण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
ही हाय-प्रोफाइल भागीदारी केवळ पारंपरिक सेलिब्रिटी एंडोर्समेंटपुरती मर्यादित राहणार नाही. ब्रँडचा चेहरा म्हणून काम करण्यासोबतच शेफ हरपाल हे सक्रिय क्युलिनरी पार्टनर म्हणूनही योगदान देतील. उत्पादनांमध्ये नाविन्य, रेसिपी डेव्हलपमेंट आणि भारतातील घराघरात रेस्टॉरंट-स्टाइल इंडो-चायनीज पदार्थ अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील.
आपल्या गुंतवणुकीबाबत आणि भागीदारीबाबत शेफ हरपाल सिंह सोखी म्हणाले, “मला हे फक्त आणखी एक एंडोर्समेंट असावे असे वाटत नव्हते. ज्या ब्रँडच्या व्हिजनवर माझा मनापासून विश्वास आहे, अशाच ब्रँडमध्ये मला गुंतवणूक करायची होती. निखिल आणि मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सची टीम आजच्या ग्राहकांना अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेते. या व्हिजनमध्ये माझा क्युलिनरी अनुभव आणि कौशल्य आणण्याची मला मोठी संधी दिसली.”
इंडो-चायनीज फूड सेगमेंटमधील आपल्या दीर्घ अनुभवासह शेफ सोखी इंचीला महत्त्वपूर्ण बाजारपेठेची माहिती आणि ग्राहकांचा विश्वास मिळवून देतील. ही भागीदारी इंचीला या कॅटेगरीतील एक प्रमुख ब्रँड म्हणून अधिक मजबूत करण्यासोबतच शेफ सोखी यांच्या वाढत्या उद्योजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...

स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही वित्तीय समावेशनाचा भाग असावेत: राज्यपाल

३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार  मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप दे...

आयटेलने लॉन्च केला 'सिटी ३०० ५जी' स्मार्टफोन

परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दमदार बॅटरी परफॉर्मन्स  मुंबई: भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेल ने आयटेल सिटी ३०० ५जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. तरुण आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केलेला हा स्मार्टफोन १४,९९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे. परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दिवसभर साथ देणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्सपासून मुक्त सॉफ्टवेअरचा अनुभव देण्याचा सिटी ३०० ५जी चा प्रयत्न आहे. सिटी ३०० ५जी मध्ये १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा हलकेफुलके गेम खेळणं अधिक सहज आणि प्रतिसादक्षम होतं. टी८२०० ऑक्टा-कोर ६एनएम ५जी प्रोसेसरमुळे रोजच्या कामांसाठी विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो. अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन एनआरसीए तंत्रज्ञानासह १० ५जी बँड्सना सपोर्ट करतो. दिवसभर चालणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्स नसलेला इंटरफेस यामुळे फोन वापरण्याचा अनुभव स्वच्छ, सोपा आणि त्रासमुक्त राहतो. त्यामुळे फीचर्सने भरलेला, पण बजेटमध्ये बसणारा स्मार्ट...