आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त खावडा फेज IV-Cचा संदेश — माहितीपूर्ण समुदायच उभारतात विकासाचा मजबूत पाया
माहितीच्या बळावर शेतकरी सशक्त; वर्गाबाहेरील साक्षरतेचा नवा अर्थ
जमिनीचे कागदपत्र असोत वा नुकसानभरपाईची प्रक्रिया; योग्य माहिती शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम करते
पालघर: साक्षरता म्हटले की डोळ्यासमोर येते ती शाळा, पुस्तक आणि वाचन-लेखनाची दुनिया. मात्र आजच्या काळात साक्षरतेचा अर्थ त्यापलीकडे गेला आहे. आपल्या हक्कांची माहिती असणे, आवश्यक कागदपत्रे समजून घेणे, सरकारी प्रक्रिया जाणून घेणे आणि अफवा व तथ्य यातील फरक ओळखणे, हीदेखील साक्षरतेचीच एक महत्त्वाची बाजू आहे.
विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीत ही माहिती त्यांच्या जमिनीशी आणि उपजीविकेशी थेट जोडलेली असते. जमिनीच्या नोंदी समजून घेणारा, मालकी हक्काबाबत जागरूक असणारा, नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती असणारा आणि आपल्या हक्कांची जाणीव असलेला शेतकरी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो.
याच विचारातून खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने समुदाय संवादामध्ये माहिती आणि जागरूकतेला महत्त्व दिले आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त कंपनीने “माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी” हा संदेश अधोरेखित केला आहे.
कागदपत्रांपासून मालकी हक्कापर्यंत
पारेषण प्रकल्पाच्या मार्गातील जमीनधारकांसाठी नुकसानभरपाईची प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे असते. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, मालकी हक्काची पडताळणी का केली जाते आणि जमिनीच्या नोंदींचे महत्त्व काय आहे, याची माहिती असल्यास प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होते.
भिवंडी तालुक्यातील पोटहिस्सा सर्वेक्षण हे याचे एक उदाहरण आहे. अनेक कुटुंबांमध्ये जमिनीची प्रत्यक्ष वाटणी झालेली असते; मात्र अधिकृत ७/१२ उताऱ्यावर जमीन संयुक्त मालकीची नोंद असू शकते. अशा परिस्थितीत नुकसानभरपाईच्या वेळी प्रत्येकाचा हिस्सा निश्चित करण्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात.
ही बाब स्पष्ट करण्यासाठी खावडा 4Cने तालुका निरीक्षक भूमी अभिलेख (TILR) आणि भिवंडीचे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांच्याशी समन्वय साधला. १६ गावांमधील ११५ सर्वे क्रमांकांपैकी १५ गावांतील १०५ सर्वे क्रमांकांचे मॅपिंग अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करण्यात आले.
या सर्वेक्षणामुळे राइट ऑफ वे (Right of Way) कॉरिडॉरचा महत्त्वपूर्ण भाग खुला होण्यास मदत झाली आणि पडताळलेल्या मालकी हक्काच्या नोंदींच्या आधारे नुकसानभरपाईची प्रक्रिया पुढे नेता आली.
गैरसमजांवर तथ्यांची मात
शेतकरी सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक नुकसानभरपाई नव्हे. पारेषण टॉवर का उभारले जातात? त्यांची वीजपुरवठ्यातील भूमिका काय आहे? पारेषण वाहिन्यांबाबत कोणते गैरसमज आहेत? अशा प्रश्नांची अचूक माहिती समुदायांपर्यंत पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
खावडा 4Cच्या समुदाय संवादामध्ये पारेषण पायाभूत सुविधांची भूमिका स्पष्ट करण्याबरोबरच प्रचलित गैरसमज दूर करून तथ्याधारित माहिती देण्यावर भर दिला जात आहे.
यामुळे प्रकल्प आणि समुदाय यांच्यातील संवाद केवळ कामाच्या प्रगतीपुरता मर्यादित न राहता, माहिती, पारदर्शकता आणि सहभाग यावर आधारित होत आहे.
“माहितीमुळे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढतो”
निनाद पितळे, वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्रुप हेड – कॉर्पोरेट अफेयर्स, खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड, म्हणाले,
“साक्षरता ही केवळ वाचता-लिहिता येण्यापुरती मर्यादित नाही; आपल्या हक्कांची, जबाबदाऱ्यांची आणि आपल्या उपजीविकेवर थेट परिणाम करणाऱ्या प्रक्रियांची माहिती असणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. खावडा 4Cमध्ये आमचा विश्वास आहे की, माहिती असलेला शेतकरी म्हणजे सक्षम शेतकरी. कागदपत्रे, नुकसानभरपाई प्रक्रिया आणि पारेषण पायाभूत सुविधांची वस्तुस्थिती याबाबत समुदायांना माहिती देऊन, आम्ही शेतकऱ्यांना अधिक आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने निर्णय घेण्यास सक्षम करत आहोत.”
वीज निर्मितीच्या ठिकाणांपासून ती घरे, शेती, व्यवसाय, शाळा, रुग्णालये आणि उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी मजबूत पारेषण पायाभूत सुविधा आवश्यक असतात. या व्यवस्थेची भूमिका समुदायांना समजणे तितकेच महत्त्वाचे आहे.
खावडा 4Cसाठी समुदाय जागरूकता ही एकदाच केली जाणारी मोहीम नसून, सातत्याने माहिती देणे, समजावून सांगणे आणि संवाद साधण्याची प्रक्रिया आहे.
कारण माहितीच्या बळावर शेतकरी अधिक सक्षम होतो आणि सक्षम समुदायच विकासाचा मजबूत पाया घडवतो.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें