मुंबई: एम३एम इंडिया आणि हुरुन इंडिया यांनी ‘एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' चे १५वे संस्करण प्रसिद्ध केले. सध्याचे वास्तव्याचे ठिकाण किंवा पासपोर्ट विचारात न घेता भारतात जन्मलेल्या किंवा लहानाचे मोठे झालेल्या आणि १,००० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींची ही यादी आहे. ही संपत्ती गणना २४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या स्थितीनुसार करण्यात आली आहे, त्यावेळी प्रति अमेरिकन डॉलरचा विनिमय दर (एक्स्चेंज रेट) ९५.६३ रुपये होता.
एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ मध्ये १६३ शहरांमधील १,८१० व्यक्तींचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १२८ ने वाढली आहे, तसेच यातील १०६ शहरे भारतातील आहेत. या कालावधीत निफ्टी ५० मध्ये ३.९ टक्के आणि सेन्सेक्समध्ये ५.८ टक्के घसरण झाली असली, तरी या सर्वांची एकत्रित संपत्ती १२.८ टक्क्यांनी वाढून १८७.५ लाख कोटी रुपयांवर (१.९६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स) पोहोचली आहे. भारतात आता विक्रमी ३९१ डॉलर अब्जाधीश असून गेल्या वर्षापेक्षा ही संख्या २७ ने अधिक आहे. गौतम अदानी (६४) आणि कुटुंबियांनी ९.२३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांनी ८.६३ लाख कोटी रुपये संपत्ती असलेल्या मुकेश अंबानी (६९) आणि कुटुंबाला मागे टाकले आहे. तर एल. एन. मित्तल (७६) आणि कुटुंबियांनी आठ स्थानांची झेप घेत ३.३९ लाख कोटी रुपयांसह तिसरे स्थान मिळवले आहे. शहरांमध्ये ४६५ श्रीमंतांसह मुंबई आघाडीवर आहे, त्यानंतर नवी दिल्ली (२३६) आणि बेंगळुरू (१२९) यांचा क्रमांक लागतो. औद्योगिक उत्पादने १६६ प्रतिनिधींसह सर्वाधिक श्रीमंत असणारे क्षेत्र ठरले आहे, त्यानंतर केमिकल्स (१४२) आणि फार्मास्युटिकल्सचा (१३६) क्रमांक लागतो. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राने ३.०७ लाख कोटी रुपये संपत्ती असलेल्या १९ प्रतिनिधींसह यादीत पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. यादीतील जवळपास ७० टक्के म्हणजेच विक्रमी १,२६६ उद्योजक स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेले आहेत, तसेच यादीत १३१ महिलांचा समावेश असून ही संख्या गेल्या वर्षी १०० होती.
डॉ.पायल बन्सल कनोडिया, अध्यक्षा-विश्वस्त, एम३एम इंडिया प्रमोटर-एम३एम फाउंडेशन म्हणाल्या, "एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट हे भारत कशा प्रकारे संपत्तीची निर्मिती, संचयन आणि पुनर्रचना करत आहे, याचे महत्त्वाचे वार्षिक मोजमाप बनले आहे. एम३एमसाठी, हुरुनसोबत आमचा सहयोग केवळ एका यादीशी नाव जोडण्यापुरता मर्यादित नाही, तर भारताच्या विकासाच्या पुढील टप्प्याला आकार देणाऱ्या आर्थिक घटकांना आणि उद्योजकीय प्रवासाला समजून घेण्यासाठी संशोधन-आधारित प्रयत्नांना पाठबळ देण्याशी संबंधित आहे. २०२६ एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट भारताच्या संपत्ती-निर्मितीच्या प्रवासातील सखोलता आणि गतिशीलता सादर करते. १,८१० व्यक्तींपैकी ७० टक्के व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे आलेल्या असणे आणि ३४७ नवीन व्यक्तींचा समावेश होणे, यावरून स्पष्ट होते की, तरुण उद्योजक आणि महिलांच्या वाढत्या सहभागासह भारतातील उद्योजकीय परिसंस्था विस्तारत आणि वैविध्यपूर्ण होत आहे. प्रमोटर म्हणून, मी या श्रीमंतांच्या यादीकडे केवळ संपत्तीचे मोजमाप म्हणून पाहत नाही, तर भारताच्या आर्थिक वाटचालीला आकार देणारी क्षेत्रे, शहरे आणि उद्योजकीय प्रवासाचा वेध घेणारी ही एक संधी आहे. मी या वर्षीच्या नवीन प्रवेशकर्त्यांचे आणि यादीत स्थान मिळवलेल्या सर्व संपत्ती निर्माणकर्त्यांचे अभिनंदन करते. एम३एमसाठी, हुरुनसोबत सहयोग हे बदल नोंदवण्याची आणि भारतातील उद्योगजगत पुढे कोणत्या दिशेने जात आहे हे समजून घेण्याची सामायिक कटिबद्धता आहे."
अनस रहमान जुनैद, संस्थापक-चीफ रिसर्चर हुरुन इंडिया म्हणाले,"एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ एका वर्षाला सादर करते, ज्यामध्ये संपत्तीच्या निर्मितीने शेअर बाजारालाही मागे टाकले. निफ्टी ५० मध्ये ३.९ टक्के आणि सेन्सेक्समध्ये ५.८ टक्के घसरण झालेली असतानाही संचित संपत्ती १२.८ टक्के वाढून १८७.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संरक्षण, उत्पादन, हरित ऊर्जा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे घटक भारतीय संपत्तीचे स्रोत आणि संपत्ती निर्माण करणाऱ्या व्यक्ती या दोन्हीमध्ये बदल घडवून आणत आहेत. भारतात विक्रमी ३९१ डॉलर अब्जाधीश आहेत, ज्यामध्ये ७६ नवीन व्यक्तींचा समावेश आहे. २०१४ च्या विनिमय दरानुसार, याच संपत्तीसह आपल्याकडे ५५९ अब्जाधीश असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने स्वतंत्र उद्योगाच्या रूपात ३.०७ लाख कोटी रुपये संपत्ती असलेल्या १९ व्यक्तींसह पदार्पण केले आहे, ज्यामध्ये १५ नवीन व्यक्ती आहेत. भारतातील संपत्ती निर्मितीचा प्रवास समजून घ्यायचा असेल, तर एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट उत्तम सुरुवात आहे."
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें