रेड हेल्थ आणि डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम मुंबई। डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई आणि रेड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य मुंबईत पहिली ५जी-सक्षम अॅडवान्स्ड लाइफ सपोर्ट (एएलएस) रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या आपत्कालीन आरोग्यसेवेतील महत्वपूर्ण सेवेचे उदघाटन प्रदीप चव्हाण, पोलिस उपायुक्त, मुंबई (वाहतूक पूर्व विभाग) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेड हेल्थचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभदीप सिंग, डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर कुलकर्णी आणि हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. ही क्रांतिकारी 5G-सक्षम रुग्णवाहिका सेवा आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद तंत्रज्ञानामध्ये एक महत्त्वपूर्ण झेप आहे, जी मध्य मुंबईला पुढील पिढीच्या आरोग्यसेवा वितरणाच्या अग्रस्थानी नेते. या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक ५जी कनेक्टिव्हिटीचा वापर केला जातो, ज्यामुळे रिअल-टाइम वैद्यकीय डेटा ट्रान्समिशन, रिमोट तज्ञ सल्लामसलत आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके व रुग्णालय सुविधा...