सीधे मुख्य सामग्री पर जाएं

गोदरेजकडून ‘हर घर सुरक्षित २०२५’ अंतर्गत ‘अपघाती आमंत्रण’ उपक्रमाचा प्रारंभ

स्मार्ट होम क्षेत्राला चालना देण्यासाठी गोदरेजची नवी नियो डिजिटल लॉक्स श्रेणी सादर, या क्षेत्रात २० टक्के वाढीचे लक्ष्य

मुंबई: लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्यूशन्ल हा गोदरेज एन्टरप्रायजेसच ग्रुपचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. गेल्या आठ वर्षांपासून लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्सकडून ‘हर घर सुरक्षित’ हा उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केला जात आहे. यंदा या उपक्रमाचे 9 वे पर्व आहे. आठव्या आवृत्तीच्या निमित्ताने लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्यूशन्स यांनी व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची विस्तार योजना जाहीर केली आहे. हा विस्तार एलएएसच्या स्मार्ट होम सेगमेंटमध्ये जलद गतीची वाढ साधण्याची आक्रमक योजना दर्शवतो. या योजनेत डिजीटल लॉक्सच्या विस्तृत श्रेणीमध्ये दहापट वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवते. देशातील मोठ्या स्तरातील प्रीमीयम ग्राहकांना स्मार्ट सुरक्षा उपाय मिळण्याकरिता हा ब्रँण्ड आता त्यांच्या मेड इन इंडिया डिजीटल लॉक्सच्या श्रेणीमध्ये डिझाइन आणि किमतीच्या नावीन्यतेवर लक्ष केंद्रित करत आहे. गोदरेजने डिजीटल लॉक्सच्या विभागात ३६ टक्के वार्षिक चक्रवाढ नोंदवली आहे. या उल्लेखनीय वाढीमुळे लॉक्स एण्ड आर्किटेक्टरल ही कंपनी बाजारात आघाडीच्या स्थानावर पोहोचली आहे. 

‘हर घर सुरक्षित’ या उपक्रमाचा भाग म्हणून कंपनीने नुकतेच ‘अपघाती आमंत्रण एप्लिकेशन’ या डिजीटल एप्लिकेशनचे अनावरण केले. वापरकर्त्यांनी सोशल मिडीयावर आपली वैयक्तिक माहिती गरजेपेक्षा जास्त शेअर केल्यास घराच्या सुरक्षिततेला कितपत धोका निर्माण होऊ शकतो, याबद्दल हे एप्लिकेशन माहिती देते. हे एप्लिकेशन मेटाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. वापरकर्त्यांच्या माहितीचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अपघाती आमंत्रणासंबंधित स्कोर दिला जातो. सोशल मिडीयावर वापरकर्ताय कितपत सक्रीय आहे, त्या आधारावर खास सूचनाही दिल्या जातात. ही मोहिम पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. या मोहिमेतून जागरुकता घडवण्यासाठी वास्तविक जीवनातील घटनांचाही संदर्भ देण्यात आला आहे. आजच्या डिजीटल युगात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी सजग आणि जबाबदार वर्तनातूनच मिळते.

गेल्या पाच वर्षांत भारतात सोशल मिडीयाशी संबंधित सायबर गुन्ह्यांध्ये जवळपास तिप्पटीने वाढ झाली आहे. सायबर गुन्ह्यांचे जाळे वाढत असल्याने प्रत्येकाने आपल्या डिजीटल सुरक्षिततेकडे काटोकोरपणे लक्ष द्यावे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गोदरेजने नव्या डिजिटल लॉक्सची नवी श्रेणी बाजारात आणली आहे. हे श्रेणी किफायतशीर दरात उपलब्ध आहे. निओ डिजीटल लॉक्स हे संपूर्णपणे नवीन रेंज आहे. आधुनिक भारतीय घरांच्या सुरक्षिततेसाठी ही कल्पक पायरी मानली जाते. आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि किफायतशीर दर यांचा संगम असलेल्या या लॉक्समध्ये इन-बिल्ट व्हिडिओ डोअर फोन, वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, विविध प्रवेश पद्धती, चोरी होण्यापूर्वीचा अलार्म आणि आपत्कालीन पॉवर बॅकअप यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. ही रेंज ८ हजार ९९९ रुपयांपासून उपलब्ध होते. ही निओ रेंज विविध सोयीसुविधांसह सुरक्षा आणि स्टाईल शोधणा-या शहरी ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.

या नव्या डिजीटल श्रेणीविषयी गोदरेज एन्टरप्रायजेस ग्रुपचे एलएएस विभागाचे व्यापार प्रमुख श्याम मोटवानी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “गेल्या आठ वर्षांपासून हर घर सुरक्षित उपक्रमाद्वारे आम्ही घरगुती सुरक्षिततेला सामूहिक जबाबदारी म्हणून निभावत आहोत. आता अपघाती आमंत्रण एप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही ही मोहिम डिजीटल क्षेत्रातही विस्तारत आहोत. निओ डिजिटल लॉक्स रेंजचे लोकार्पण हे आधुनिक भारतीय घरांसाठी बुद्धिमान सुरक्षिततेची नवी व्याख्या देणारे आणि स्मार्ट होम श्रेणीती वेगाने वाढणारे महत्त्वाचे पाऊल आहे. ”  

गोदरेजची हर घर सुरक्षित मोहिम घरगुती सुरक्षिततेच्या उपायांबद्दल जागरुकता वाढवत आहे. ही मोहिम ग्राहकांना स्मार्ट सुरक्षा उपायांचा वापर वाढवा, असे आवाहन करत आहे. आजपर्यंत १.७ लाखाहून अधिक घरांमध्ये या मोहिमेच्या पुढाकारातून सुरक्षित तपासण्या झाल्या आहेत. यंदाच्या आर्थिक वर्ष २०२६मध्ये २१ हजारांहून अधिक तपासण्या झाल्या आहेत. या प्रयत्नांमुळे दरवर्षी दोन अंकी वाढीचा विक्रम नोंदवला जात आहे. गेल्या वर्षी डिजीटल सुरक्षा उपायांचा स्वीकार तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. ही वाढ लक्षात घेता गोदरेज घरगुती सुरक्षिततेमध्ये आपले अस्तित्व सक्षम नेतृत्वासह मजबूत करत आहे.

Link to the app – 
https://accidental-invitation.in/

Link to the film –

·  https://youtu.be/xFCQ4RNDL9c

·  https://youtu.be/eu8tks9EHQg

·  https://youtu.be/_aR4xoSMEAs

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...