सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्‍या विद्यार्थ्‍यांचे सुयश

जनाटिक्‍स ऑटोमेशन स्किल चॅलेंज २०२५ मध्‍ये चमकदार कामगिरी केली 

मुंबई: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने घोषणा केली की, त्‍यांच्‍या टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (टीटीटीआय)च्‍या विद्यार्थ्‍यांनी प्रतिष्ठित जनाटिक्‍स ऑटोमेशन स्किल चॅलेंज २०२५ मध्‍ये प्रथम व द्वितीय स्‍थान पटकावले आहे. पुण्‍यातील जेएसपीएम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग येथे १२ व १३ नोव्‍हेंबर रोजी आयोजित करण्‍यात आलेला हा दोन-दिवसीय इव्‍हेण्‍ट उदयोन्‍मुख ऑटोमेशन टॅलेंटसाठी सर्वात मोठे राष्‍ट्रीय व्‍यासपीठ आहे. या स्‍पर्धेमध्‍ये भारतभरातील २००० हून अधिक इंजीनिअरिंग, डिप्‍लोमा व आयटीआय विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला.

एकूण १२ टीम्‍सनी राष्‍ट्रीय स्‍तरावर वाटचाल केली, ज्‍यामध्‍ये टीटीटीआयच्‍या तीन टीम्‍सचा समावेश होता. पुनीत कुमार, अजय बारिक व भास्‍कर जी. नरसिंगोल यांचा समावेश असलेल्‍या 'टायटन्‍स' टीमने प्रथम स्‍थान पटकावले, तर अंकिता पुजारी, शीतल ए. आणि प्रथम एस. आर. यांचा समावेश असलेल्‍या 'वॉरियर्स' टीमने द्वितीय स्‍थान पटकावले, तसेच त्‍यांना 'बेस्‍ट प्रेझेन्‍टेशन' पुरस्‍कारासह सन्‍मानित देखील करण्‍यात आले. जनाटिक्‍सच्‍या टेक्विकलचे एव्‍हीपी श्री. के. गणपती सुब्रमण्‍यम, बजाज ऑटो लि.चे उपाध्‍यक्ष सुधाकर गुडीपती आणि फॅमिक टेक्‍नॉलॉजीजचे अध्‍यक्ष श्री. चार्बेल नासर यांच्‍या हस्‍ते विजेत्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. 

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरच्‍या फायनान्‍स अँड अॅडमिनिस्‍ट्रेशनचे कार्यकारी उपाध्‍यक्ष जी. शंकरा म्‍हणाले, ''आम्‍हाला जनाटिक्‍स ऑटोमेशन स्किल चॅलेंज २०२५ मध्‍ये टीटीटीआयच्‍या विद्यार्थ्‍यांनी संपादित केलेल्‍या उल्‍लेखनीय कामगिरीचा अत्‍यंत अभिमान वाटतो. आम्‍हाला त्‍यांच्‍या यशस्‍वी प्रवासाचा आनंद होत आहे, तसेच आम्‍ही या टप्‍प्‍यापर्यंत पोहोचण्‍यासाठी त्‍यांनी घेतलेल्‍या अथक मेहनतीचे कौतुक करतो. टीटीटीआय आपल्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये स्‍पर्धात्‍मक उत्‍साह, नाविन्‍यता, जिज्ञासूवृत्ती आणि समस्‍या निवारण क्षमतेला चालना देण्‍यावर प्रबळ भर देते. टीटीटीआयच्‍या माध्‍यमातून आम्‍ही ग्रामीण भागातील तरूणांना जागतिक दर्जाचे टेक्निशियन्‍स बनवण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत. यासह आम्‍ही स्किल इंडिया मिशन आणि विकसित भारत २०४७ अशा राष्‍ट्रीय प्राधान्‍यक्रमांप्रती अर्थपूर्णपणे योगदान देण्‍याचा प्रयत्‍न करतो.''  

टीकेएमने प्रबळ स्किलिंग फ्रेमवर्क डिझाइन केले आहे, ज्‍यामध्‍ये प्रगत उत्‍पादन पद्धतींसह प्रत्‍यक्ष प्रशिक्षणाचा समावेश आहे. २००७ मध्‍ये टीकेएमच्‍या बिदादी प्‍लांटमध्‍ये स्‍था‍पना करण्‍यात आलेले टीटीटीआय या परिसंस्‍थेचा पाया आहे. पूर्णत: निवासी तीन वर्षांचा प्रोग्राम दर्जेदार शिक्षण, टेक्निकल प्रशिक्षण आणि वैयक्तिक विकासाच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील तरूणांना सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. १,४०० हून अधिक पदवीधर आणि १०० टक्‍के प्‍लेसमेंट ट्रॅक रेकॉर्डसह टीटीटीआयच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी राष्‍ट्रीय व जागतिक कौशल्‍य प्‍लॅटफॉर्म्‍सवर सातत्‍याने उत्‍कृष्‍ट कामगिरी केली आहे.  

टीटीटीआयच्‍या ची-तोकू-ताय संकल्‍पनेशी (ची - शैक्षणिक, तोकू - बौद्धिक विकास, ताय - आरोग्‍यदायी शरीर) संलग्‍न राहत विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा, वेबिनार्स व प्रत्‍यक्ष शैक्षणिक प्‍लॅटफॉर्म्‍समध्‍ये सहभाग घेण्‍यास प्रेरित केले जाते, जे त्‍यांची मानसिकता, शिस्‍तबद्धता व टीमवर्कला अधिक निपुण करतात.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...