मुंबई। ताज लँड्स एंडजवळील ऐतिहासिक बांद्रा फोर्ट गार्डनवर उगवत्या सूर्याच्या साक्षीने, ‘श्री सत्य साई रन अँड रायड संडेज ऑन सायकल’ या उपक्रमाने मुंबईत उत्साह, ऊर्जा आणि श्रद्धेची लाट उसळली. सदगुरू श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील श्री सत्य साई सेवा संस्था आयोजित या भव्य उपक्रमाला युवक आणि क्रीडा मंत्रालयाने ‘फिट इंडिया’ मोहिमेच्या माध्यमातून देशव्यापी पाठिंबा दिला आहे.
या कार्यक्रमाला शासन, उद्योग क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर पाहुणे आणि नेत्यांनी उपस्थिती लावली, त्यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता:
• हरी रंजन राव – सचिव, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार
• निमिष पांड्या – अखिल भारतीय अध्यक्ष, श्री सत्य साई सेवा संस्था
• राजन नवानी – अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जेटसिंथेसिस
• पांडुरंग चाटे – प्रादेशिक संचालक, भारतीय क्रीडा प्राधिकरण
• विश्वास नांगरे पाटील – अतिरिक्त पोलिस महासंचालक, (ACB) महाराष्ट्र
• आर. मुकुंदन – व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, टाटा केमिकल्स
• नंदकुमार तिरुमलाई – मुख्य वित्त अधिकारी, टाटा केमिकल्स
• दिलीप जोशी – अभिनेते
• नारायण सेतुरामन – व्यवस्थापकीय संचालक, सॅनमार मेटल मॅट्रिक्स
सुमारे ४५०० हून अधिक सहभागी धावणे आणि सायकलिंग या दोन्ही प्रकारांसाठी ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा विविध गटांमध्ये सहभागी झाले, ज्यामुळे सकाळचा वेळ एकात्मता आणि सामूहिक उत्साहाच्या उत्सवात परिवर्तित झाला.
या उपक्रमाबद्दल बोलताना निमिष पांड्या, अखिल भारतीय अध्यक्ष, श्री सत्य साई सेवा संस्था, भारत यांनी सांगितले, “श्री सत्य साई रन अँड रायड हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो कृतीतून अंत:करणांना जोडणारा एक आंदोलन आहे. भगवान श्री सत्य साई बाबांच्या जन्मशताब्दीचा उत्सव साजरा करताना, आम्ही त्यांचा निःस्वार्थ प्रेम, एकता आणि सेवाभावाचा संदेश पुढे नेत आहोत. आज मुंबई फक्त धावण्यासाठी किंवा सायकल चालवण्यासाठी एकत्र आली नाही, तर या शाश्वत मूल्यांना पुन्हा अधोरेखित करण्यासाठी एकत्र आली आहे.”
राजन नवानी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, जेटसिंथेसिस यांनी सांगितले, “श्री सत्य साई रन अँड रायड हा उपक्रम श्रद्धा आणि फिटनेस या दोन्हींच्या संगमातून अधिक मजबूत समाज कसा घडू शकतो, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सर्वसमावेशकता, सेवा आणि एकोप्याला दिलेले या कार्यक्रमाचे महत्त्व हे भारताच्या विविधतेत एकता आणि ध्येयपूर्ण प्रगती.आत्म्याचे प्रतिबिंब आहे ”
हरी रंजन राव, सचिव, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांनी सांगितले, “अशा प्रकारचे उपक्रम ‘फिट इंडिया’ आणि युवक सशक्तीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुंदररीत्या सुसंगत आहेत. श्री सत्य साई सेवा संस्था करुणेच्या माध्यमातून फिटनेस, भक्तीच्या माध्यमातून शिस्त आणि सेवाभावाच्या माध्यमातून सामर्थ्य वाढविण्याच्या एकाच ध्येयाखाली नागरिकांना एकत्र आणत आहे, हे प्रेरणादायी आहे.”
लक्ष्मीकांत शर्मा, राष्ट्रीय युवा समन्वयक आणि श्री सत्य साई युनिटी रनचे राष्ट्रीय प्रभारी यांनी सांगितले, “हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर नियोजित ६० कार्यक्रमांपैकी १५वा कार्यक्रम आहे. मुसळधार पावसात आणि हा मोफत उपक्रम असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग पाहून मन आनंदित झाले. लोक एकतेच्या भावनेने धावले आणि भगवान श्री सत्य साई बाबांनी दिलेला प्रेम, सेवा आणि एकता यांचा संदेश दृढपणे जगासमोर मांडला.”
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें