सीधे मुख्य सामग्री पर जाएं

डेन्व्हर फॉर मेन आणि शाहरुख खान यांनी ‘सेंट ऑफ सक्सेस’ या नवीन अभियानाच्या माध्यमातून यशाचा नवा अर्थ सांगितला

●     शाहरुख खानला दर्शविणाऱ्या डेन्व्हर फॉर मेनच्या ‘सेंट ऑफ सक्सेस’ या नवीन अभियानात ही कल्पना मांडली आहे की, खरे यश प्रसिद्धी किंवा प्रतिष्ठेत नसून विनम्र आणि साधे राहण्यात असते.

●     या फिल्ममध्ये एक सामान्य दैनंदिन क्षण दाखवला आहे, ज्यात वागण्यातून अहं डोकावतो. हे पाहताना आपल्याला स्मरते की, तुम्ही इतरांना कशी वागणूक देता यातून तुमचा खरा मोठेपणा दिसतो.

मुंबई। भारतातील आघाडीच्या आणि सर्वात प्रतिष्ठित पुरुषांच्या ग्रूमिंग ब्रॅंडपैकी एक डेन्व्हर फॉर मेन या ब्रॅंडने आपल्या गाजलेल्या ‘सेंट ऑफ सक्सेस’ अभियानाच्या दुसऱ्या अध्यायाचे अनावरण केले, ज्यामध्ये बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान दिसणार आहे. या नव्या फिल्ममधून ‘द रियल सेंट ऑफ सक्सेस’चे या ब्रॅंडच्या जुन्या तत्वज्ञानाचा आणखी प्रसार केला आहे. यश कसे प्राप्त केले याच्या पलीकडे जात तुम्ही ते कसे निभावता याचा शोध या फिल्ममध्ये घेतला आहे. ‘यश डोक्यात जाऊ देऊ नये, ते हृदयात गेले पाहिजे’ या विचाराभोवती गुंफलेल्या सदर अभियानातून डेन्व्हरची ही मान्यता दिसून येते की, तुम्ही किती उंच गेलात यावरून यश कळत नाही तर उंचावर जाऊनही तुमचे पाय किती जमिनीवर आहेत यातून ते कळते.

या कॅम्पेन फिल्ममध्ये एक दैनंदिन परिस्थिती दाखवली आहे, जेव्हा माणसाच्या वागण्यातून त्याचा अहंकार आणि लहान-मोठेपणाचा अभिमान दिसून येतो. हा क्षण अस्सल आणि आपल्या परिचयाचा वाटावा असा आहे. कोणतेही मोठे इशारे न करता किंवा उपदेश न देता शाहरुख विचारांचा आवाज बनतो आणि प्रेक्षकांना स्मरण देतो की, यश स्वतःचा मोठेपणा दाखवण्यात नाही, तर विनम्र आणि दयाळू राहण्यात आहे. जाहिरातीतील कथानक खरेखुरे आणि जवळचे वाटते. त्यात आधुनिक महत्त्वाकांक्षेचे प्रतिबिंब दिसते. या जाहिरातीतून प्रत्येकाला हेच सांगितले आहे की, यश हृदयात राहिले पाहिजे, तिथेच त्याला राहू द्या.

डेन्व्हरसाठी होत गेलेला हा बदल त्यांच्या ब्रॅंडच्या प्रवासातील स्वाभाविक प्रगती आहे. बऱ्याच काळापासून यशाचा उदो उदो केल्यानंतर – चिकाटी, लवचिकता आणि कठोर परिश्रमातून मिळालेले यश – आता हा ब्रॅंड याचा शोध घेत आहे की यश मिळाल्यानंतर त्याने कसे वागले पाहिजे. या सखोल शोधामुळे डेन्व्हरच्या परिचयाला भावनिक जोड मिळते. हा केवळ ग्रूमिंगचा ब्रॅंड नसून त्यापेक्षा जास्त असल्याची ब्रॅंडची स्थिती अधिक मजबूत होते. एक असा ब्रॅंड, जो आत्मविश्वासासोबत चारित्र्य आणि स्टाइलसोबत अर्थपूर्णतेवर भर देतो.

शाहरुख खानचे डेन्व्हरशी असलेले नाते याच तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे. सामान्य स्थितीमधून सुरुवात करून जागतिक प्रसिद्धी मिळवण्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रवासातून लक्षावधी लोकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होतात. पण आपल्याला भिडते, ती त्याची प्रसिद्धी नाही, तर त्याची विनम्रता. जीवनातील सर्व थरांमधील लोकांना तो ज्या आपलेपणाने आणि सन्मानाने वागवतो ते आपल्याला आवडते. त्याच्यातील ही अस्सलता त्याला डेन्व्हरचा हा संदेश लोकांपर्यंत नेण्यासाठी योग्य चेहरा बनवते, की खरे यश हे टाळ्यांच्या कडकडाटात नसून ज्या विनम्रतेने तुम्ही आपल्या सिद्धी सांभाळता त्यामध्ये आहे.

सदर अभियानाविषयी टिप्पणी करताना HSPL (डेन्व्हर फॉर मेनची प्रमोटर कंपनी)चे मॅनिजिंग डायरेक्टर आणि अध्यक्ष सौरभ गुप्ता म्हणाले, “यश हे डेस्टिनेशन नाही, ती एक शिस्त आहे. डेन्व्हरमध्ये आमचा हा ठाम विश्वास आहे की, माणूस किती उंच जातो यावरून त्याचे मोठेपण सिद्ध होत नाही, तर उंच गेल्यानंतरही तो किती साधा, जमिनीवर राहतो यावरून त्याचे मोठेपण ठरते. हे अभियान आमच्या याच मान्यतेचे प्रतिबिंब आहे. हे अभियान स्मरण देते की, यशाचा संबंध ताकद किंवा पदाशी नाही तर उपस्थिती, सौम्यता आणि सहानुभूतीशी आहे. शाहरुख खानच्या माध्यमातून आम्ही हा विचार जिवंत करत आहोत- कृत्रिमतेतून नाही, तर प्रामाणिकपणातून. त्याचा वैयक्तिक प्रवास आमच्या या मान्यतेचे मूर्त रूप आहे- नम्रतेसह चिकाटी आणि सहृदयतेसह सिद्धी. कारण, शेवटी, जे यश जीवनाला स्पर्श करत नाही, ते यश कसले!”

या अभियानासह डेन्व्हर फॉर मेन सचोटी, उद्देश आणि विनम्रता हे गुण असणाऱ्या पुरुषांचा गौरव करण्याच्या या ब्रॅंडची परंपरा पुढे नेत आहे. त्यांच्या प्रीमियम फ्रॅग्रन्सेसची आणि ग्रूमिंग एसेन्शल्सची रेंज आधुनिक भारतीय पुरुषाशी साधर्म्य दाखवते – असा पुरुष जो दिखाव्यापेक्षा गुणांना अधिक महत्त्व देतो आणि अस्सल सुगंधाप्रमाणे यश देखील तेच खरे असते, जे सौम्यतेने दरवळते आणि आपल्या उपस्थितीतून बोलते, ताकदीतून नाही.

लिंक: https://www.instagram.com/reel/DQgq8vsjK7u/?igsh=MXZ2aW43eHNyMDk3aQ==

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...