सीधे मुख्य सामग्री पर जाएं

अपोलोने महाराष्ट्रात पुणे येथे तिसरे रुग्णालय सुरु केले

४०० बेड्सची क्षमता असलेले हे रुग्णालय क्वाटर्नरी देखभाल सेवासुविधा प्रदान करेल

पुणे: आशियातील आघाडीची एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणारी संस्था, अपोलो हॉस्पिटल्सने पुण्यातील स्वारगेट येथे आपले नवे हॉस्पिटल सुरु केले. या हॉस्पिटलची सुरुवात टप्प्याटप्प्याने होईल, सध्या २५० बेड्स उपलब्ध आहेत. राज्यातील या भागात आरोग्य देखभाल गरजांना ध्यानात ठेवून त्या पूर्ण करण्यासाठी आरोग्य सेवा क्षमता अजून जास्त वाढवण्याची अपोलो हॉस्पिटल्सची योजना आहे.

अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी रेड्डी यांनी सांगितले,"अपोलोमध्ये आमचे मिशन आहे, भारताच्या बरोबरीने संपूर्ण जगासाठी आरोग्य सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणणे. 'हील इन इंडिया - हील बाय इंडिया' व्हिजनने प्रेरित होऊन आम्ही असे स्थान निर्माण करत आहोत जिथे जगभरातील लोकांना करुणा आणि सामर्थ्य यांच्या बरोबरीनेच क्लिनिकल उत्कृष्टतेचे लाभ मिळत आहेत. आमची इच्छा आहे की पुणे आणि भारतातील प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा निवास सदैव राहो."

अपोलो हॉस्पिटल्सने आपल्या पुढील विस्तारासाठी पुण्याची निवड केली कारण त्यांनी ओळखले की या क्षेत्रातील लोकांच्या आरोग्यसंबंधी गरजा बदलत आहेत. त्यांनी आपल्या विस्तार योजना अशा पद्धतीने बनवल्या आहेत की नवीन, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरातील विविध लोक, समुदाय आणि संबंधित हितधारकांची ते अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकतील.

अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रीता रेड्डी यांनी सांगितले,"अपोलो हॉस्पिटल्स पुणेमध्ये आम्ही क्लिनिकल उत्कृष्टता, करुणामय देखभाल आणि अथक नावीन्य यांच्या बळावर निर्माण केलेला, चार दशकांहून अधिक काळापासून चालत आलेला वारसा पुढे नेत आहोत. हे नवे हॉस्पिटल आरोग्य सेवांपर्यंत पोहोच आणि गुणवत्ता यांना पुढे नेण्याच्या आमच्या अचल बांधिलकीचे प्रतीक आहे, हे हॉस्पिटल सुरु करून आम्ही रुग्णांनी गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान करत आहोत."

अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती सुनीता रेड्डी यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल अपोलोच्या वाढत्या राष्ट्रीय विस्तारामध्ये उचलण्यात आलेले एक धोरणात्मक पाऊल आहे, जे भारतातील एका सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या आरोग्य सेवा बाजारपेठांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त लोकांना उच्च स्तरीय क्वाटर्नरी देखभालीचे लाभ देण्यासाठी आमची एकात्मिक आरोग्य इकोसिस्टिम शहरात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रात आरोग्य देखभालीचे  मजबूत आणि भविष्यासाठी सज्ज नेटवर्क तयार करण्यासाठी पुण्यातील क्लिनिकल टॅलेंटसोबत सहयोग करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."

अपोलो हॉस्पिटल्सचे समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ. मधू ससिधर यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल सुरक्षा विज्ञान, पुराव्यांवर आधारित प्रॅक्टिस आणि एका अशा संस्कृतीच्या पायावर उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्व निर्णय रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात. जसजसे आम्ही पुढे जाऊ, रुग्णांच्या देखभालीप्रती आमची बांधिलकी मजबूत होत जाईल, जी उच्च दर्जा, पारदर्शक परिणाम, करुणा आणि क्लिनिकल दृढतेच्या माध्यमातून प्रदान केली जाईल."

अपोलो हॉस्पिटल्स पुणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा कर्माकर यांनी सांगितले,"पुणे शहरामध्ये आमचे नवे हॉस्पिटल क्लिनिकल उत्कृष्टतेप्रती अपोलोची बांधिलकी दर्शवते, इतकेच नव्हे तर एका अशा शहराच्या विकास आणि कल्याणमध्ये योगदान देत आहे जे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचे केंद्र म्हणून भारताच्या भविष्याला आकार देत आहे."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...