सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मोबाईल आणि भावनिक दूरावा ठरत आहे आधुनिक वैवाहिक जीवनातील मोठे संकट - प्रिया काकडे

विवाहबाह्य संबंधांच्या तपासासाठी खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सींची मागणी वाढली

मुंबई। मालाडमधील एका प्रतिष्ठित डॉक्टर दांपत्याच्या वैवाहिक तणावामागील सत्य उघड करण्याचे काम सुप्रसिद्ध खाजगी गुप्तहेर प्रिया काकडे यांनी कौशल्याने पार पाडले. कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर आणि त्यांची दंतवैद्य पत्नी यांच्यातील छोट्या वादांमुळे वाढलेला संशय अखेर विवाहबाह्य संबंधांपर्यंत पोहोचला.

डॉक्टर परदेशात असताना सुनेच्या वर्तणुकीबद्दलच्यातक्रारींनंतर त्यांनी स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या प्रिया काकडे यांची मदत घेतली. तपासात महिला डॉक्टरचे दोनहून अधिक पुरुषांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले, ज्याचे स्पष्ट पुरावे मिळाले.

सामाजिक प्रतिष्ठा आणि मुलांच्या भविष्यासाठी दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. प्रिया काकडे यांच्या गोपनीय आणि व्यावसायिक तपासामुळे हे कुटुंब सन्मानाने या संकटातून बाहेर पडले, तर या घटनेने वैवाहिक जीवनातील विश्वास आणि पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

पती पत्नीच्या नात्यामध्ये मोबाईल आणि सोशल मीडिया दुरावा निर्माण करत असल्याबरोबर विवाह बाह्य संबंध असल्याचा संशय वाढत आहे. घटस्फोट घेण्यासाठी केवळ संशय घेण्यापेक्षा हाती ठोस पुरावे असावेत असे जोडीदाराला वाटत असल्यामुळे विवाहबाह्य संबंधांचे पुरावे गोळा करण्यासाठी खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीजची मदत घेण्याकडे कल वाढला असल्याचे स्विफ्ट डिटेक्टीव्ह एजन्सीजच्या संचालिका प्रिया काकडे यांनी सांगितले.

प्रिया काकडे म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यात विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोटापर्यंत पोहचणार्‍यांचे प्रमाण साधारणत: ५० टक्क्यांपर्यंत आहे. लग्न झाल्यावर अवघ्या काही महिन्यांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी आमची मदत घेतली जाते आहे. काही केसेसचे जर अवलोकन केले तर आयटी क्षेत्र असो कि बँकिंग टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात पती-पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. नोकरीमुळे एकमेकांना वेळ देणे कमी झाल्यामुळे भावनिक गोष्टींमध्ये भागीदार शोधला जातो आणि पुढे हे संबंध वाढतात. जोडीदाराशी बांधिलकी असलीच पाहिजे हा विचार तरुणांमध्ये बदलताना दिसतो. त्याच्यात किंवा तिच्यात आता तितकासा रस नाही, समाधान, आनंद देणारे दुसरे कोणीतरी आहे, हा आता तरुणांचा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. त्यातच सोशल मीडियाचा अतिवापर आणि इतर ठिकाणी भावनिक गुंतवणूक होऊन विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. अशावेळी जोडीदार फक्त एकमेकांवर आरोप करत राहतात. घटस्फोट घेण्यासाठी केवळ संशय असण्यापेक्षा पुरावे गोळा करण्यात जोडीदार खाजगी डिटेक्टीव्ह एजन्सीजची मदत घेतात. अशावेळी गोष्टी टोकाला गेल्या की मग घटस्फोटाचा निर्णय घेतात.

एका डॉक्टर दाम्पत्याचा घटस्फोटाचा अनुभव सांगताना प्रिया काकडे म्हणाल्या की, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून पत्नी पतीकडे दुर्लक्ष करीत होती नंतर मुलाचा जन्म झाल्यापासून त्याचे संगोपन करायला टाळाटाळ करायला लागली. रात्री उशिरापर्यंत बायको सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहायची, रात्रभर मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली हॉस्पिटलला जाण्याच्या बहाण्याने बायकोच्या घराबाहेर जाण्याने नवरा हैराण झाला होता. तिला जाब विचारला गेले की मानसिक छळ, शारीरिक छळ, हुंडाबळीची केस टाकेन अशा धमक्या पत्नीकडून सासरच्यांना सारख्या मिळायच्या. त्यामुळे शेवटी तिचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागताच त्यांनी खाजगी डिटेक्टिव्हची मदत घेत पुरावे गोळा केले. त्यानंतर न्यायालयात पुरावे सादर करून घटस्फोट घेतला. तिच्या वागण्याचे विचित्र पुरावे असल्याने तिला पोटगी आणि मुलाचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे उच्च शिक्षित आणि श्रीमंत वर्गामध्ये देखील याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत असल्याचे काकडे म्हणाल्या.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...