सीधे मुख्य सामग्री पर जाएं

मलबार गोल्ड अँड डायमंड्सचा 'ब्राइड्स ऑफ इंडिया' अभियान

आलिया भट्ट, प्रार्थना बेहेरे, करीना कपूर खान अभियानात सामील

मुंबई: प्रत्येक भारतीय वधू तिच्यासोबत भावनांचे एक जग घेऊन जाते. त्यात तिच्या स्वतःच्या अनेक आठवणी असतात. ती ज्या रीतिरिवाजांना बघत मोठी झाली, ती ज्या संस्कृतीशी संबंधित आहे, ज्या आठवणी तिने हृदयाच्या जवळ जपल्या आहेत आणि तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एकाची ओळख ठरतील असे दागिने, या सगळ्या गोष्टी त्यात असतात. जगातील सर्वात मोठ्या सोने आणि हिऱ्यांच्या रिटेल चेनपैकी एक असलेल्या मलबार गोल्ड अँड डायमंड्सने भारतातील समृद्ध, सांस्कृतिक वारशातील वधूच्या दागिन्यांचे महत्त्व फार पूर्वीपासून समजून घेतले आहे. वधूच्या श्रेणीतील दागिन्यांमध्ये मलबार गोल्ड अँड डायमंड्सने विचारपूर्वक क्युरेट तसेच विकसित केलेले डिझाइन एकत्र आणले आहेत. ज्यामुळे प्रत्येक वधूच्या परंपरांचा आदर करणारे शुद्धता, हेतू आणि कारागिरीने तयार केलेले दागिने सुनिश्चित होतात. वधूच्या कारागिरीतील सखोल कौशल्यासह, ब्रँडने देशभरातील वधूंच्या विशिष्ट परंपरांचा आदर करणारे डिझाइन तयार करण्याचा एक अतुलनीय वारसा निर्माण केला आहे.

एक महत्त्वाचा टप्पा गाठत, मलबार गोल्ड अँड डायमंड्सने आज त्यांच्या प्रमुख ब्राइड्स ऑफ इंडिया अभियानाच्या 15व्या आवृत्तीचे अनावरण केले, जी भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अपेक्षित ब्राइडल प्रॉपर्टींपैकी एक म्हणून ओळखली जाते. या वर्षीच्या आवृत्तीत 22 वधू आणि 10 सेलिब्रिटी एकत्र आले आहेत - प्रार्थना बेहेरे, आलिया भट्ट, करीना कपूर खान, एनटीआर, कार्ती, अनिल कपूर, श्रीनिधी शेट्टी, रुक्मिणी मैत्र, सब्यसाची मिश्रा आणि मानसी पारेख, हे सर्व या मोहिमेचा विस्तार, वैविध्य तसेच भावनिक खोली दर्शवते. शुभजीत मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेल्या या जाहिरातीचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. या जाहिरातीत भारताच्या वेगवेगळ्या भागातील वधू संस्कृतींचे सार टिपणारे तसेच प्रत्येक वधूच्या कथेला आकार देणाऱ्या विधि, भावना तसेच वारसा साजरे करणारे दृश्य आणि संगीतमय कथानक एकत्र आणले आहे.

एम.पी.अहमद (अध्यक्ष, मलबार गोल्ड अँड डायमंड्स) म्हणाले,“दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ब्राइड्स ऑफ इंडिया उपक्रम म्हणजे या देशातील वधूंप्रति आमची कृतज्ञता आहे. आणि हे 15वे वर्ष तर आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्वतःचे स्वातंत्र्य जपतानाच वधू परंपरेचा देखील कसा आदर करतात हे आम्ही अनेकदा अधोरेखित केले आहे. ही आवृत्ती त्या परंपरांची खोली दर्शवते - आठवणी, विधि आणि नातेसंबंध जे तिची ओळख आहे. पारदर्शकता आणि गुणवत्ता हमीसाठी मलबारची असलेली वचनबद्धता लक्षात घेता, प्रत्येक कुटुंबाला अर्थपूर्ण आणि विश्वासार्ह दागिने निवडण्याचा आत्मविश्वास वाटावा अशी आमची इच्छा आहे.”

महाराष्ट्रीयन वधू शतकानुशतकांच्या जुन्या परंपरेला आधुनिकतेशी जोडते. खेळकर पण शांत, आनंद आणि गांभीर्य यांचे अनोखे मिश्रण त्यात दिसते. तिचा वारसा ती आत्मविश्वासाने पुढे नेत असते. मलबार गोल्ड अँड डायमंडचे दागिने तिच्या याच वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहेत - तेजस्वी, भावपूर्ण आणि मराठी वधूच्या कालातीत ओळखीचा सन्मान करण्यासाठी डिझाइन केलेले.

प्रार्थना बेहेरे (सिने अभिनेत्री) म्हणाली,"महाराष्ट्रीयन विवाह हे अर्थपूर्ण प्रतीकांनी परिभाषित केले जातात - नथ, मुंडावळ्या, हिरव्या बांगड्या, हे अलंकार आयुष्यातील एका नवीन अध्यायाचे प्रतीक आहेत. या तपशीलांमध्ये सांस्कृतिक अभिमान आहे. हे सगळे तपशील ब्राइड्स ऑफ इंडियामध्ये अगदी बारकाईने उतरतात, आपल्या परंपरांचे सार अधोरेखित करते आणि आजच्या वधूशी नैसर्गिकरित्या जोडले जाऊ शकतील अशा डिझाइन सादर करते."

सिने अभिनेत्री आलिया भट्ट म्हणाली, "लग्नात प्रत्येक वधू स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपण्याचा प्रयत्न करते, कोणतीही परंपरा तिच्या नजरेतून कशी दिसते, त्या पद्धतीने ती व्यक्त करते. ब्राइड्स ऑफ इंडिया याचेच प्रतिनिधित्व करते. दागिन्यांच्या माध्यमातून मलबार हेच सुंदरपणे टिपते जे अर्थपूर्ण, समकालीन आणि तिच्या स्वतःच्या कथेशी जोडलेले आहे, असे तिला वाटते."

करीना कपूर खान म्हणाली, "प्रत्येक वधू ज्या परंपरांसोबत वाढते त्याच परंपरा जपते आणि लग्नाच्या प्रत्येक विधितून आणि क्षणातून तो वारसा जिवंत करते. ब्राइड्स ऑफ इंडियाबद्दल मला जे आवडते ते म्हणजे, वधूला केंद्रस्थानी ठेवून मलबार या कथांना एका सांस्कृतिक छत्राखाली एकत्र आणते. या मोहिमेचा भाग असणे मला नेहमीच खास वाटले आहे कारण ते आपले मूळ विसरत नाहीत आणि प्रामाणिकपणा तसेच अभिजाततेने ते साजरे करतात."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...