कॅशबॅक ऑफर्स आणि झिरो डाऊन-पेमेंट योजना उपलब्ध मुंबई। सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी ए२७ ५जी स्मार्टफोनची विक्री सुरू झाल्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन आता सॅमसंग आऊटलेट्स, भागीदार स्टोअर्स, सॅमसंग डॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन लाइट ग्रीन, लाइट पिंक व ब्लॅक या तीन रंगांमध्ये आणि तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए२७ ५जी हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून, या सर्व मॉडेल्सवर ३,००० रुपयांचा 'मल्टी-बँक आणि यूपीआई कॅशबॅक' ऑफर दिला जात आहे. या ऑफरनंतर, फोनच्या सुरुवातीच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची नेट इफेक्टिव्ह प्राईस २८,९९९ रुपये आहे. त्याचा दुसरा व्हेरियंट ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज सह येतो, ज्याची नेट इफेक्टिव्ह प्राईस ३१,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर, या सिरीजमधील सर्वात टॉप व्हेरियंट ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफरनंतर ३७,४९९ रुपये या नेट इफेक्टिव्ह प्राईसवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. गॅलेक्सी ए२७ ५जी मध्ये ६.७ इंच, १२० हर्ट्झ सुपर एएमओएईडी डिस्प्ले ...