ग्राहकांसाठी खास लॉन्च ऑफर्स – डायमंडवर मिळवा 30% सूट आणि मेकिंग चार्जवर मिळवा 20% सूट मुंबई: भारतातील आघाडीची लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँड ज्वेलबॉक्सने मुंबईच्या मध्यवर्ती भागात आपले ११वे स्टोअर सुरू केल्याची घोषणा केली आहे. हे नवीन स्टोअर शॉप नं. 3, हवेली सोसायटी, गुलमोहर रोड, बोरिवली (पश्चिम) येथे सुरु करण्यात आले आहे. भारताची फॅशन राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईत प्रवेश करणे हा ज्वेलबॉक्ससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. डिझाइन-केंद्रित आणि आधुनिक खरेदीदारांसाठी त्यांची अत्याधुनिक ज्वेलरी आता अधिक जवळ उपलब्ध होणार आहे. देशभरात दक्षिण, पूर्व आणि उत्तर भारतात यशस्वीपणे स्टोअर्स चालवल्यानंतर, मुंबईतील हे नवीन स्टोअर पश्चिम भारतातील त्यांच्या विस्ताराचे प्रमुख पाऊल ठरले आहे. बोरिवली पश्चिम ही जागा धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाची आणि सज्ज ग्राहकवर्ग असलेली असल्यामुळे, हे स्टोअर डेली वेअर, गिफ्टिंग आणि सेलिब्रेशन ज्वेलरीसाठी परिसरातील पसंतीचं ठिकाण ठरणार आहे. स्टोअर लॉन्चबाबत ज्वेलबॉक्सच्या सह-संस्थापक विदिता कोचर जैन म्हणाल्या, “मुंबई आमच्या विस्तारयोजनेच...