सीधे मुख्य सामग्री पर जाएं

फेडएक्सचा मॅजिक बस इंडिया फाउंडेशनसह सहयोग

सायबर सेफ इंडिया मोहिमेची सुरुवात 

मुंबई। शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील आघाडीची ना-नफा संस्था मॅजिक बस इंडिया फाउंडेशनने जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडएक्स एक्सप्रेस (फेडएक्स) सोबत सहयोगाने सायबर सेफ इंडिया कॅम्पेन सुरू केली आहे. या देशव्‍यापी उपक्रमाचा तरुणांना आणि समुदायांना डिजिटल जगात सुरक्षितपणे व जबाबदारीने नेव्हिगेट करण्यासाठी ज्ञानासह सुसज्ज करून सायबर गुन्ह्यांना रोखण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम डिजिटल जागरूकता वाढवण्यासाठी आणि विशेषतः आव्हानात्मक पार्श्वभूमी असलेल्या समुदायांना विश्वसनीय साधने व प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास प्रेरित करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्‍नई, हैदराबाद, पुणे व कोलकाता यांसह १३ राज्ये आणि २९ शहरांमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे. मॅजिक बसची १३० हून अधिक उपजीविका केंद्रे व १००० हून अधिक महाविद्यालयांच्या विद्यमान नेटवर्कचा वापर करून हा उपक्रम दोन लाखांहून अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत-जास्त प्रभाव पाडेल. याव्यतिरिक्‍त, सुरक्षित डिजिटल पद्धतींची व्यापक समज आणि अवलंब वाढवण्यासाठी पथनाट्ये, डिजिटल सुरक्षा सत्रे, जागरूकता शिबिरे आणि स्थानिक सायबर गुन्हे अधिकाऱ्यांशी सहयोग यांसारख्या आकर्षक साधनांद्वारे समुदाय-स्तरीय पोहोचवर भर दिला जाईल.

फेडएक्स, मध्यपूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका येथील मार्केटिंग, ग्राहक अनुभव व एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन नवनीत टाटीवाला म्हणाले, ''आजच्या हायपरकनेक्टिव्ह जगात सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता हे आपले सर्वात मोठे संरक्षण आहे. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार १.३ दशलक्ष नागरिकांनी नोंदवलेल्या फसवणूकीच्या प्रकरणांद्वारे ४३.८६ अब्ज रुपयांपेक्षा जास्त रक्‍कम सुरक्षित करण्यात आली आहे, ज्‍यामधून सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी जागरूकता आणि त्वरित अहवाल देण्याचे महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येतात . फेडएक्समध्‍ये आम्‍हाला लोकांना सतर्क राहण्यास, सुरक्षित राहण्यास आणि डिजिटल जगात अधिक आत्मविश्वासाने नेव्हिगेट करण्यास मदत करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्याचा अभिमान आहे."

मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे ग्लोबल सीईओ जयंत रस्तोगी म्हणाले, ''भारत डिजिटल-केंद्रित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना सुरक्षित आणि माहितीपूर्ण डिजिटल सहभाग आवश्यक बनला आहे. फेडएक्ससोबतच्या सहयोगाने आम्हाला सायबरसुरक्षा जागरूकता वाढवण्यास सक्षम केले आहे, जे आमची जीवन कौशल्‍ये आणि रोजगार उपक्रमाशी विनासायासपणे संलग्‍न आहे. सायबर सेफ इंडिया मोहीम सर्वसमावेशक डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाला साकार करण्याच्या दिशेने पाऊल आहे, ज्यामुळे तरुण आणि समुदाय डिजिटल जगात सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी सुसज्ज आहेत याची खात्री मिळते. यामधून उज्‍ज्‍वल भविष्याप्रती आमची समान कटिबद्धता दिसून येते, जेथे डिजिटल प्रवेशामधून डिजिटल सुरक्षितता मिळेल, प्रत्येक कुटुंबाला वाढत्या कनेक्टेड जगात प्रगती करण्‍यास सक्षम करेल.''

भारताच्या राष्ट्रीय डिजिटल सुरक्षा प्राधान्यांशी सुसंगत हा उपक्रम संचार व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अंतर्गत सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडवान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक)च्या सहयोगाने राबविला जात आहे आणि प्रादेशिक पोहोच व समन्वयाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सायबर सेल्सशी देखील संलग्‍न असेल.

मॅजिक बस आणि फेडएक्स यांच्यातील हा सहयोग भारताच्या भविष्यातील कर्मचारीवर्गाला डिजिटली कनेक्टेड करण्‍यासोबत डिजिटली जागरूक, सुरक्षित आणि स्थिर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही मोहीम सर्वात जास्त गरज असलेल्या ठिकाणी जागरूकता निर्माण करून आणि सायबर सुरक्षित भारत घडवण्यास मदत करून सर्वसमावेशक नाविन्‍यतेचा आधारस्तंभ म्हणून काम करते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...