ग्राहकांसाठी खास लॉन्च ऑफर्स – डायमंडवर मिळवा 30% सूट आणि मेकिंग चार्जवर मिळवा 20% सूट
मुंबई: भारतातील आघाडीची लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँड ज्वेलबॉक्सने मुंबईच्या मध्यवर्ती भागात आपले ११वे स्टोअर सुरू केल्याची घोषणा केली आहे. हे नवीन स्टोअर शॉप नं. 3, हवेली सोसायटी, गुलमोहर रोड, बोरिवली (पश्चिम) येथे सुरु करण्यात आले आहे. भारताची फॅशन राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईत प्रवेश करणे हा ज्वेलबॉक्ससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. डिझाइन-केंद्रित आणि आधुनिक खरेदीदारांसाठी त्यांची अत्याधुनिक ज्वेलरी आता अधिक जवळ उपलब्ध होणार आहे.
देशभरात दक्षिण, पूर्व आणि उत्तर भारतात यशस्वीपणे स्टोअर्स चालवल्यानंतर, मुंबईतील हे नवीन स्टोअर पश्चिम भारतातील त्यांच्या विस्ताराचे प्रमुख पाऊल ठरले आहे. बोरिवली पश्चिम ही जागा धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाची आणि सज्ज ग्राहकवर्ग असलेली असल्यामुळे, हे स्टोअर डेली वेअर, गिफ्टिंग आणि सेलिब्रेशन ज्वेलरीसाठी परिसरातील पसंतीचं ठिकाण ठरणार आहे.
स्टोअर लॉन्चबाबत ज्वेलबॉक्सच्या सह-संस्थापक विदिता कोचर जैन म्हणाल्या, “मुंबई आमच्या विस्तारयोजनेचा नेहमीच एक भाग होता. या शहराची शैली, आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती — हे सगळं आमच्या ब्रँडच्या तत्त्वांशी जुळतं. बोरिवली वेस्टमधील आमच्या नवीन स्टोअरद्वारे, आम्ही एका नव्या पिढीला डिझाइन-फर्स्ट ज्वेलरीचा अनुभव देण्यास उत्सुक आहोत.”
उबदार, मिनिमलिस्टिक डिझाइनमध्ये साकारलेल्या या स्टोअरमध्ये सोलिटेअर रिंग्सपासून ते दररोज वापरता येतील अशा सिंपल डिझाइन्स, पुरुषांसाठी खास कलेक्शन आणि विशेष प्रसंगांसाठी ज्वेलरी अशा विविध प्रकारची लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी प्रदर्शित करण्यात आली आहे. स्टोअरची रचना इंट्युटिव्ह व शॉपिंग अनुभव अधिक चांगला करण्यावर लक्ष केंद्रित करून करण्यात आली आहे. जिथे गुणवत्ता, कारागिरी आणि शाश्वतता यांचा परिपूर्ण संगम दिसून येतो.
लॉन्च सेलिब्रेशन दरम्यान, मर्यादित कालावधीसाठी डायमंडवर 30% सूट आणि मेकिंग चार्जवर 20% सूट देण्यात येत आहे. येणाऱ्या सण आणि लग्नाच्या हंगामात, शहरी प्रोफेशनल्स, तरुण जोडपी आणि फॅशन-सेन्स असलेले ग्राहक यांच्याकडून मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.
विदिता पुढे म्हणाल्या, “मुंबईतील आमचं स्टोअर ही केवळ एक नवीन जागा नाही, तर तो शहराचा गाभा आहे. लॅब-ग्रोन डायमंडविषयी जागरूकता वाढत असताना, आम्हाला अभिमान आहे की आम्ही ग्राहकांना एलिगन्स, एथिक्स आणि अॅक्सेसिबिलिटी यामध्ये कोणताही तडजोड न करता पर्याय देत आहोत.”
आपल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्टोअर्सच्या पातळीवर मुंबई स्टोअरचा परफॉर्मन्स नेण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवून, ज्वेलबॉक्स स्थानिक पातळीवर जागरूकता वाढवणे, उत्कृष्ट सेवा देणे आणि ५-स्टार खरेदीचा अनुभव देण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. याद्वारे ग्राहकांची निष्ठा वाढवणारे आणि रेफरलवर आधारित वृद्धीला चालना मिळेल.
भारताचा पहिला लक्झरी ब्रँड म्हणून, जो फक्त लॅब-ग्रोन डायमंड्सवर लक्ष केंद्रित करतो, ज्वेलबॉक्स सातत्याने नवोन्मेष, शाश्वतता आणि एव्हरग्रीन डिझाइन यांच्या जोरावर फाइन ज्वेलरीची नवी व्याख्या घडवत आहे.
ज्वेलबॉक्सबद्दल
ज्वेलबॉक्स हा भारतातील सर्वात विश्वासार्ह लॅब-ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँड आहे. त्यांनी ‘कॉन्शस लक्झरी’ या संकल्पनेचा अग्रदूत म्हणून या ब्रँडने नैतिक पद्धतीने मिळवलेल्या आणि उच्च दर्जाच्या फाइन ज्वेलरीसह बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मे 2022 मध्ये विदिता कोचर जैन आणि निपुण कोचर या भावंडांनी स्थापन केलेल्या या ब्रँडने कारागिरी, शाश्वतता आणि सहज उपलब्धता यांचा सुंदर संगम घडवला आहे.
ज्वेलबॉक्स हे रोजच्या वापरासाठी तसेच खास प्रसंगांसाठीही सौंदर्यपूर्ण डिझाइन्स सादर करतं. रिटेल स्टोअर्स आणि मजबूत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यांच्यामार्फत ब्रँड संपूर्ण भारतात वेगाने विस्तारत आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें