सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भारतातील पहिला एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर ब्रँड 'दिलसे' लाँच

मुंबई। मुंबईतील प्रतिष्ठित एक्‍स्‍पेरिमेण्‍टल थिएटर, एनसीपीए येथे १५ जुलै रोजी आयोजित करण्‍यात आलेल्‍या लाइव्‍ह नाट्य प्रदर्शनादरम्‍यान दिलसे, द हॅप्‍पीनेस कलेक्टिव्‍ह प्रायव्‍हेट लिमिटेड हा भारतातील पहिला एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर (ई२सी) ब्रँड लाँच करण्‍यात आला.

"दिलसे - द लव्ह थिएट्रिकल" असे शीर्षक असलेले हे दोन तासांचे तल्लीन करणारे सादरीकरण पारंपारिक ब्रँड इव्हेंट नव्हते, तर सखोल भावनिक अनुभव होता, ज्यामध्ये मूळ कविता, लाइव्‍ह म्‍युझिक, नाट्यकथन आणि सिनेमॅटिक दृश्ये यांचे संयोजन पाहायला मिळाले.

हर्षवर्धन चौहान यांनी या शोची संकल्‍पना मांडण्‍यासोबत लेखन देखील केले. तसेच त्‍यांनी मुख्‍य पात्राची भूमिका देखील बजावली. या शोमध्ये मूळ कविता, नाट्य संवाद, लाइव्‍ह म्‍युझिक, धार्मिक कथाकथन आणि चित्रपटातील दृश्ये यांचा समावेश होता, ज्‍यामधून भावनिक अनुभव मिळाला. प्रत्येक संवाद, प्रत्येक गीत, प्रत्येक संगीतमय मोटिफ या क्षणासाठी तयार करण्यात आले होते.

सुमित शर्मा दिग्दर्शित, दिलीप रावत आणि राहुल भल्ला यांच्या संगीतासह, या कार्यक्रमात तरुण खेम यांचे कथन, देविका सिंग, तोशी रावल, रिया भल्ला आणि रविंदर पाठक यांचे भावपूर्ण गायन आणि अमन उप्पल, दिया राजपूत, गौतम आणि द दिलसे गर्ल अँड एन्सेम्बल यांचे आकर्षक सादरीकरण होते. हा कार्यक्रम दोन भागांमध्ये विभागला गेला: मीडिया, निर्माते आणि सांस्कृतिक संरक्षकांसाठी इन्‍व्‍हाइट-ओन्‍ली प्रीमियर, त्यानंतर डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटोद्वारे सार्वजनिक प्रदर्शन.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्थित असलेल्‍या अभिनेत्री चित्रगंधा सिंग म्‍हणाल्‍या, ''या कार्यक्रमामध्‍ये अत्‍यंत वास्‍तविक अनुभव मिळाला. प्रत्‍येक परफॉर्मन्‍स प्रामाणिक व अत्‍यंत वैयक्तिक वाटला. दिलसेने असा अनुभव दिला, जेथे भावना व्‍यक्‍त होण्‍यासह खऱ्या अर्थाने जाणवल्‍या. मी अशा प्रामाणिक गोष्टीचा भाग होऊ शकल्‍याने स्‍वत:ला भाग्‍यशाली मानते.''

दिलसे - द लव्ह थिएट्रिकलसह भारतातील वाणिज्य क्षेत्रात नवीन श्रेणी एक्‍स्‍पेरिअन्‍सेस-टू-कंझ्युमर (ई२सी)चा उदय झाला. प्रत्‍यक्ष उत्पादनांची विक्री करणाऱ्या समकालीन ब्रँड्सच्‍या तुलनेत दिलसे कामगिरी, साऊंड, आवाज, डिझाइन आणि डिजिटल कथाकथन यांद्वारे भावनिक अनुभव देते. ही उत्‍साहपूर्ण चळवळ आहे, जी रूपांतरण नाही तर संबंधाच्‍या माध्‍यमातून भारतातील वाणिज्‍याला नवीन आकार देत आहे.

दिलसेचे संस्‍थाप‍क व निर्माता हर्षवर्धन चौहान म्‍हणाले, ''हे फक्‍त लाँच नव्‍हते तर आत्‍मीय करार होता. या कथानकामधील प्रत्येक शब्द आपल्‍या लुप्‍त व शांत भावनांमधून आला आहे. मला रंगमंच नको होता. मला आरसा हवा होता. आणि या परफॉर्मन्‍सच्‍या माध्‍यमातून आम्‍ही अभिनय साकारला नाही तर जुन्‍या आठवणींना उजाळा दिला. आम्‍ही भावनांना व्‍यक्‍त करण्‍यासोबत त्‍यामधील अर्थाला सादर केले. भारतात मोठ्या जल्‍लोषात ब्रँड्स निर्माण होताना दिसण्‍यात आले आहे, पण दिलसे उत्‍साहपूर्ण भावनेसह निर्माण करण्‍यात आला आहे. आमची उत्‍पादने परिधान करण्‍यासोबत जाणवली जातील. रंगमंचावर हे फक्‍त नाटक नव्‍हते तर आठवण होती.''

लाँच प्रदर्शनाला मिळालेल्‍या यशानंतर दिलसे आता २३ जुलै २०२५ रोजी दिलसे अॅपच्‍या सॉफ्ट लाँचसह आपले स्‍थान दृढ करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामागे भारतातील पहिले आत्‍मीय डिजिटल क्षेत्र म्‍हणून दर्जा स्‍थापित करण्‍याचा दृष्टिकोन आहे. ऑगस्‍ट २०२५ पासून ब्रँड उत्‍पादने व वीअरेबल्‍स लाँच करण्‍यास सुरूवात करेल, जी ई२सी अनुभवाला अधिक दृढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने भावी डॉक्टरांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने भावी डॉक्टरांचा सन्मान करून राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला; NEET मधील आपल्या ३७ वर्षांच्या वारशावर प्रकाश टाकला AESL ने MBBS करत असलेल्या माजी आकाशियन आणि तरुण वैद्यकीय व्यावसायिकांचा सत्कार केला, तसेच भारताच्या आरोग्यसेवा कर्मचारी वर्गाला घडवण्याच्या आपल्या ३७ वर्षांच्या वारशावर प्रकाश टाकला मुंबई। राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून, भारतातील सर्वात प्रसिद्ध परीक्षा तयारी संस्था असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) ने, डॉक्टर म्हणून कारकीर्द घडवलेल्या माजी आकाशियनचा आणि नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये MBBS च्या प्रगत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. हा सत्कार देशाच्या आरोग्यसेवा क्षेत्रावरील संस्थेच्या चिरस्थायी प्रभावाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. हा प्रसंग डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या घडवण्याच्या AESL च्या समृद्ध परंपरेचे प्रतिबिंब होता. AESL जवळपास चार दशकांपासून भारतातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीशी संबंधित आहे आणि गेल्या काही वर्षांत ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कठीण प्रवेश पर...

किया इंडियाकडून ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ चे आयोजन

मुंबई। ग्राहकांना वैविध्‍यपूर्ण आणि फायदेशीर मालकीहक्क अनुभव देण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ कर किया इंडियाने किया ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६ ची घोषणा केली आहे. हा कॅम्प ३ जुलै ते १२ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ग्राहकांना जागतिक दर्जाची विक्रीपश्चात सेवा, वेईकलची सर्वसमावेशक केअर आणि विशेष फायदे सहज उपलब्ध करून देण्यावर ब्रँडचा असलेला भर लक्षात घेऊन हा उपक्रम ३६५ शहरांमधील कियाच्या ५२१ अधिकृत सर्व्हिस वर्कशॉप्समध्ये राबवला जाईल. या सर्व्हिस कॅम्पदरम्यान किया इंडिया ग्राहकांसाठी अनेक विशेष फायदे देत आहे. यामध्ये कार केअर सर्व्हिसेसवर २० टक्‍के सूट, एक्सटेंडेड वॉरंटी पॅकेजवर १० टक्‍क्‍यांपर्यंत सूट, रिटेल रोडसाइड असिस्टन्स (आरएसए) प्लॅन्सवर १० टक्‍के सूट, पार्ट्स व लेबर चार्जवर (मजुरी) १० टक्‍के सूट आणि किया जेन्युइन अॅक्सेसरीजवर १० टक्‍के सूट समाविष्ट आहे. कियाच्या अधिकृत सर्व्हिस नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सोयीस्कर, उत्तम सुरक्षा आणि किफायतशीर दरात वेईकलची देखभाल करता यावी, यासाठी या मूल्यवर्धित सेवा डिझाइन केल्या आहेत. या उपक्रमाबाबत मत व्‍यक...

किया इंडियाकडून जून महिन्यातील आजपर्यंतच्‍या सर्वोच्च विक्रीची नोंद

१९ टक्के वाढीसह २४,५५२ युनिट्सची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आपल्या स्थापनेपासून जून महिन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च विक्री जाहीर केली आहे. जून २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या २०,६२५ युनिट्सच्‍या तुलनेत यंदा जून महिन्यात २४,५५२ युनिट्सची घाऊक विक्री झाली आहे, ज्‍यामध्‍ये वार्षिक १९ टक्‍के वाढ नोंदवण्यात आली आहे. या प्रबळ कामगिरीमधून कंपनीचा सातत्यपूर्ण विकास आणि कंपनीच्‍या प्रगत उत्पादन श्रेणीला ग्राहकांकडून मिळणारी चांगली पसंती दिसून येते. वर्ष २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत किया इंडियाने १,६३,७४९ युनिट्सची विक्री केली, जी कंपनीची पहिल्‍या सहामाहीमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या १,४२,१३९ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यात वार्षिक १५.२ टक्‍के वाढ नोंदवली गेली आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींनुसार उत्पादने उपलब्ध करून देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर दिसून येतो. कॉम्पॅक्ट एसयूव्ही, मिड-सादझ एसयूव्ही, रिक्रिएशनल वेईकल्‍स आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी स...