सीधे मुख्य सामग्री पर जाएं

'गायत्री-एआय'च्या भारतातील पहिल्या 'एआय'आधारित 'वेलनेस सेंटर'चे उद्घाटन

मुंबई। भारताच्या वेलनेस क्षेत्रासाठी एका ऐतिहासिक पर्वणी ठरलेल्या 'गायत्री-एआय'ने सोमवार, ७ जुलै रोजी मुंबईतील अंधेरी येथे त्यांचे 'एआय' आधारित क्वांटम वेलनेस सेंटर सुरू केले. 'क्वालिमाइंड्स कॉर्प सर्व्हिसेस लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि फार्मा उद्योगातील एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक श्री. के. आनंद वेंकट राव, तसेच बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत क्वांटम वेलनेस सेंटरचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतात अतिशय सुलभ आणि एआय-आधारित सकल रोगनिवारक उपचार पद्धतीच्या (थेरपी) एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे.
नव्याने उद्घाटन झालेल्या केंद्रात एनएलएस बायोरेसोनन्स ४डी निदानोपयोगी औषधेमुक्त आरोग्य पुनर्वसन उपकरण मेटाट्रॉन मेटापॅथिया, मेटाट्रॉन झेड १०० प्लाझ्माहील एक्स४, नारिया चेअर (टेस्लाटेकपेक्षाही श्रेष्ठ), स्केलर ३६० क्यूआय कॉइल™️, झेड-१०० क्वांटम बायो-स्टिम्युलेटर आणि प्रगत हायड्रो-कोलन उपचार प्रणाली यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे समर्थित असलेल्या उपचारात्मक कल्याण मापदंडाद्वारे एकत्रित केले आहेत, जे वैयक्तिक आणि भविष्यसूचक उपचार प्रदान करतात.
'गायत्री-एआय'मध्ये आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आरोग्याची निरंतर जबाबदारी घेण्यास सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवतो," असे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. धर्मप्रकाश त्रिपाठी म्हणाले. 'जिथे मानवी कौशल्यांद्वारे वैज्ञानिक कल्पकतेची जोड देऊन महत्त्वपूर्ण आणि आवश्यक उपचार दिले जातात, अशा दृष्टिकोनाचे 'गायत्री एआय' हे एक प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. 'गायत्री-एआय'च्या संस्थापक श्रीमती शोभना डीपी त्रिपाठी म्हणाल्या, 'सुदृध आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव, असे नाही - तर ते संतुलन, जीवनशक्ती आणि उद्देश आदींचा सहवास असते', असे 'गायत्री एआय'च्या संस्थापक शोभना डीपी त्रिपाठी म्हणाल्या. 'आमची परिसंस्था तंत्रज्ञान, अंत:स्फूर्ती आणि करुणा यांना एकत्रित करून त्या प्रवासाला अर्थपूर्णपणे सहकार्य करते', असेही त्यांनी पुढे नमूद केले.
क्वालिमाइंड्स कॉर्प सर्व्हिसेसचे एमडी आणि सीईओ, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे माजी उपाध्यक्ष, लुपिनचे माजी अध्यक्ष, ग्लेनमार्कचे माजी अध्यक्ष, कॅडिला (झायडीज) चे माजी उपाध्यक्ष आणि जागतिक प्रमुख आणि 'निकोलस पिरामल'चे माजी उपाध्यक्ष श्री. के. आनंद वेंकट राव उद्घाटन सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, 'भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पारंपरिक आरोग्य मूल्यांना कसे सक्षम बनवता येते याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे गायत्री-एआय आहे'. हे केंद्र संपूर्ण भारतात आरोग्य सक्षमीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अग्रगण्य वेलनेस केंद्राच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला चार चांद लावण्यासाठी ईशा कोपीकर आणि निहारिका रायजादा सेलिब्रिटी उपस्थित होत्या. या सर्वांच्या चमकदार उपस्थितीने हा उद्घाटन सोहळा अधिकच उजळून निघाला. उपस्थित मान्यवरांना एनएलएस बायोरेसोनन्स, क्यूआय कॉइल™️ स्केलर उपचार, प्लाझ्माहील एक्स४, एचएचओ इनहेलेशन आणि प्रगत हायड्रो-कोलन उपचार प्रणालीसारख्या वैशिष्ट्यीकृत उपचारांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच केंद्रातील अत्याधुनिक सुविधांचा  धावता आढावा घेऊन, संस्थापक, वैद्यकीय सल्लागार आणि तज्ज्ञांशी संवाद साधण्यात आला.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...