मुंबई। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाशी (एमएमआरडीए) ऐतिहासिक सहकार्य करत आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने (एजीआय) शिंपोली मेट्रो स्टेशनचे नामकरण करण्याचे अधिकार मिळवले आहेत. यलो लाईन २ए वरील हे स्थानक आता अधिकृतपणे आदित्य कॉलेजेस शिंपोली स्टेशन म्हणून ओळखले जाईल. बोरिवलीच्या केंद्रस्थानी असलेले व नवीन नामकरण झालेले हे स्थानक दररोज हजारो प्रवाशांच्या येण्या-जाण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे.
यावेळी आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष आणि संस्थापक विश्वस्त डॉ. हरिश्चंद्र एस. मिश्रा, तसेच संस्थेचे विश्वस्त आशिष एच. मिश्रा आणि आदित्य एच. मिश्रा उपस्थित होते. यांच्यासह ग्रुपचे धोरणात्मक सल्लागार डॉ. राजन सक्सेना, डॉ. सक्सेना यांच्याकडे शैक्षणिक नेतृत्वाचा समृद्ध अनुभव आहे असून त्यांनी एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएसचे (मुंबई) माजी कुलगुरू, आयआयएम इंदूरचे संस्थापक संचालक आणि एसपीजेआयएमआर आणि आयसीएफएआय बिझनेस स्कूलचे माजी संचालक म्हणून काम केले आहे. आदित्य कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे (एसीए) मार्गदर्शक गुरुनाथ दळवी, आदित्य समूहाच्या शैक्षणिक नेतृत्वापैकी आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचे (एआयएमएसआर) संचालक आणि मॅनेजमेंट स्टडीजचे डीन डॉ. बाळकृष्ण परब, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे (एआयबीएसएम) संचालक प्रो. मुकुंद प्रसाद आणि आदित्य कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे (एसीए) प्राचार्य जमशेद भिवंडीवाला, बोरिवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दित्य ग्रुपचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर पाहुणे यावेळी उपस्थित होते.
या स्टेशनच्या कामकाजात मुंबईतील एक आघाडीची शैक्षणिक संस्था असलेल्या एजीआयची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या स्थानकावरील डिजिटल डिस्प्ले, प्लॅटफॉर्म साइनेज (मार्गदर्शक सूचना) आणि इंटरॅक्टिव्ह कम्युटर झोनची अंमलबजावणी एजीआय कऱणार आहे. तसेच ब्रँडिंग आणि संपर्काच्या माध्यमातून ती जनमानसात आपली उपस्थिती आणखी मजबूत करणार आहे. अशा प्रकारचे मेट्रो ब्रँडिंग उपक्रम हाती घेणारी एजीआय ही मुंबईतील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे.
एजीआयचे विश्वस्त आशिष एच. मिश्रा म्हणाले, "या परिवर्तनकारी उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या शहरासोबतचे आमचे दीर्घकालीन संबंध आणि त्याच्या विकासात अर्थपूर्ण योगदान देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब भागीदारी या भागीदारीत पडले आहे."
या धोरणात्मक सहकार्यामुळे केवळ प्रवाशांचा अनुभव समृद्ध होतो, असे नव्हे तर तर सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि शाश्वत गतिशीलतेला पाठिंबा देण्यासाठी एजीआयच्या कटिबद्धतेलाही बळ मिळते. या स्थानकाचे संचालन महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) वतीने करण्यात येते. यापूर्वी पहाडी एकसार या नावाने ते ओळखले जात होते. त्याचे नाव बदलून १० एप्रिल २०२३ रोजी शिंपोली असे करण्यात आले. हे स्थानक जनतेसाठी २ एप्रिल २०२२ रोजी खुले झाले.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें