गोदरेज कॅपिटल आणि सेल्सफोर्स यांनी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली
मुंबई। गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची आर्थिक सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने आज सेल्सफोर्स या #1 एआय सीआरएम कंपनीसोबत एक महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या सहकार्याचा उद्देश गोदरेज कॅपिटलच्या उपकंपन्यांना डिजिटल कर्ज व्यवहारासाठी अधिक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि भारतातील ग्राहकांना उत्तम सेवा अनुभव मिळवून देणे आहे. या भागीदारीची अंमलबजावणी करण्यासाठी डेलॉइट इंडिया ला सहयोगी भागीदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, जेणेकरून सेल्सफोर्स चे प्रगत तंत्रज्ञान गोदरेज कॅपिटलच्या कर्ज व्यवहार प्रणालीमध्ये सहज आणि वेगाने लागू करता येईल.
नवीन तंत्रज्ञान आणि जेनएआय-आधारित उपाययोजना लवकर स्वीकारण्यात आणि नाविन्यपूर्णतेवर भर देण्यात गोदरेज कॅपिटल नेहमीच अग्रेसर राहिली आहे. सेल्सफोर्स सोबतची ही भागीदारी डिजिटल युगात भविष्यकालीन, डिजिटलदृष्ट्या सक्षम कर्ज प्रणाली तयार करण्याच्या सामायिक दृष्टिकोनाला चालना करते. डेलॉइटच्या तांत्रिक रूपांतरणातील अनुभवामुळे या भागीदारीतून गोदरेज कॅपिटलच्या उत्पादन कार्यक्षमतेत वाढ, ग्राहक अनुभवात सुधारणा आणि जोखीम व्यवस्थापन अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
या भागीदारी अंतर्गत, गोदरेज कॅपिटल आपली लोन ओरिजिनेशन सिस्टम (एलओएस) एकत्र करून ती सेल्सफोर्सच्या उच्च दर्जाच्या एआय-आधारित प्लॅटफॉर्म्सवर स्थानांतरित करून तिच्या कर्ज देण्याच्या पायाभूत सुविधा वाढवत आहे. हे सर्व विद्यमान ग्राहक व्यवस्थापन प्रणाली (सीआरएम) सोबत जोडले जात आहे. यामुळे अर्जापासून ते कर्ज वितरणापर्यंत संपूर्ण कर्ज प्रक्रिया अधिक स्मार्ट, वैयक्तिकृत आणि सोपी होईल. यामुळे निर्णय घेण्याची गती वाढेल, अचूकता सुधारेल आणि भारतभरातील ग्राहक व उद्योगांसाठी कर्ज सेवा अधिक मजबूत होईल.
सेल्सफोर्सच्या एआय-आधारित माहितीचा उपयोग करून, गोदरेज कॅपिटल अधिक लवचिक आणि डेटा-आधारित कर्ज देण्याच्या प्रक्रिया विकसित करत आहे. यामुळे स्मार्ट क्रॉस-सेलिंग सेवा (वेगवेगळ्या सेवा/उत्पादनांची विक्री), अधिक अचूक जोखीम व्यवस्थापन आणि मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक ग्राहक अनुभव देणे शक्य होईल. संपूर्ण उत्पादन, चॅनेल्स आणि ग्राहक संपर्कांच्या आधारे ग्राहकांची 360 अंशांची एकत्रित माहिती मिळाल्यामुळे, कंपनी उत्तम ग्राहक सेवा, जलद कामकाज आणि कमी मॅन्युअल हस्तक्षेपासह कर्ज प्रक्रिया अधिक प्रभावीपणे सुरू ठेवू शकते.
मनीष शहा (व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, गोदरेज कॅपिटल) या भागीदारीवर बोलताना म्हणाले, “गोदरेज कॅपिटलमध्ये आम्ही तंत्रज्ञानाला प्रथम प्राधान्य देतो आणि जनरेटिव एआय मध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहोत. याचाच उपयोग करून आम्ही आमच्या आर्थिक सेवा मोठ्या प्रमाणावर वाढवत आहोत. एआयवर आधारित जागतिक आघाडीची कंपनी असलेल्या सेल्सफोर्स सोबतची आमची ही भागीदारी, आमच्या या प्रयत्नांना आणखी बळ देईल. त्यामुळे आम्ही अधिक स्मार्ट कर्ज सेवा देऊ शकू, कार्यक्षमता वाढवू शकू आणि ग्राहकांसाठी वैयक्तिक सेवा व जलद प्रक्रिया उपलब्ध करून देऊ शकू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही भागीदारी तंत्रज्ञानाचा उपयोग करून आर्थिक सेवांमधील प्रत्यक्ष समस्या सोडवण्यावर आणि भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या सर्वसमावेशक व लवचिक कर्ज प्रणाली उभारण्यावर लक्ष केंद्रीत करते.”
अरुंधती भट्टाचार्य (प्रेसिडेंट व सीईओ, सेल्सफोर्स – दक्षिण आशिया) म्हणाल्या, "आर्थिक सेवा क्षेत्र एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, जिथे तंत्रज्ञान केवळ प्रणाली सुधारत नाही, तर संस्था ग्राहकांशी कसे संवाद साधतात, निर्णय कसे घेतात आणि सेवा कशा देतात, हे पूर्णपणे बदलत आहे. आजच्या डिजिटल-प्रथम जगात, भविष्यात यश त्यांनाच मिळेल जे बुद्धिमत्ता, लवचिकता आणि विश्वास यांच्या आधारावर पुढे जातील. या बदलामध्ये एआय फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे – जे जलद निर्णय, ग्राहकांची सखोल समज आणि मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक सेवा देण्यासाठी मदत करते. गोदरेज कॅपिटल या क्षेत्रात एक धाडसी नवोपक्रम करणारी कंपनी म्हणून पुढे येत आहे – जी ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या दृष्टिकोनासह डिजिटल-प्रथम मानसिकता स्वीकारते. ते केवळ भारतातील एमएसएमईसाठीच नव्हे, तर प्रत्येक कर्जदार, उद्योजक आणि कुटुंबासाठी कर्ज सेवा नव्या प्रकारची कर्ज सेवा तयार करत आहेत – जे देशाच्या प्रगतीला चालना देतात. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या सोबत एक एआय-सक्षम, एकत्रित प्लॅटफॉर्मद्वारे सहकार्य करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, जो डेटा, बुद्धिमत्ता आणि वेग यांना एकत्र आणून समावेशक विकासाची नवी दिशा उघडतो."
अश्विन बल्लाळ (पार्टनर, डेलॉइट इंडिया) म्हणाले,“गोदरेज कॅपिटलसोबत या महत्त्वाकांक्षी परिवर्तनाच्या प्रवासात भागीदार होऊन आम्हाला आनंद होत आहे. सेल्सफोर्सच्या एआय-आधारित प्लॅटफॉर्म्सचे एकत्रीकरण आणि गोदरेज कॅपिटलचा डिजिटल-प्रथम दृष्टिकोन एकत्र आल्यामुळे भारतातील कर्ज सेवा नव्याने घडवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. आमचे क्षेत्रातील सखोल ज्ञान, यशस्वी अंमलबजावणीचा अनुभव आणि जागतिक दर्जाच्या पद्धती यामुळे गोदरेज कॅपिटलला एक लवचिक, मोठ्या प्रमाणात वापरता येणारी आणि भविष्यासाठी तयार असलेली डिजिटल प्रणाली तयार करण्यात मदत होईल, जी खऱ्या अर्थाने व्यवसायावर सकारात्मक परिणाम करेल."
गोदरेज कॅपिटल आपल्या व्यवसायाचा विस्तार करत असून, भविष्यासाठी उपयुक्त आणि मोठ्या प्रमाणावर वापरता येणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे. कंपनीची अंतर्गत टीम विविध विभागांमध्ये जनरेटिव एआय आधारित उपाय विकसित करत आहे, जे कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करत आहेत. या प्रयत्नांना अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने सक्षम नावाचा एक विशेष एंटरप्राइज-ग्रेड जनरेटिव एआय आणि मशीन लर्निंग (एमएल) प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हा प्लॅटफॉर्म एआय विकसित करण्याची प्रक्रिया एकत्र करतो, सुरक्षित एलएलएम (लार्ज लँग्वेज मॉडेल) जोडणी शक्य करतो आणि संपूर्ण व्यवस्थापन सुलभ करतो, जेणेकरून BFSI (बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स) क्षेत्रासाठी अधिक स्मार्ट आणि ग्राहक-केंद्रित उपाय देता येतील.
सतत सुरू असलेल्या उत्पादन नवकल्पनांच्या भाग म्हणून, सेल्सफोर्स आपल्या एंटरप्राइज एआय क्षमतेचा विस्तार एजंटफोर्सच्या माध्यमातून करत आहे. एजंटफोर्स हा सेल्सफोर्स चा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे, जो कंपन्यांना अशा एआय एजंट्स तयार करून वापरण्याची सुविधा देतो, जे वेगवेगळ्या व्यवसाय विभागांमध्ये स्वतंत्रपणे काम करू शकतात आणि निर्णय घेऊ शकतात. एजंटफोर्स ही सेल्सफोर्स चा पुढचा टप्पा आहे, जिथे एआय एजंट्स मानवी कर्मचाऱ्यांसोबत काम करतात आणि एक डिजिटल वर्कफोर्स तयार करतात, जी मानवी क्षमतेला अधिक बळ देते आणि अतिशय वेगाने व बुद्धिमत्तेने परिणाम देते. जगातील नंबर 1 सीआरएम सेल्सफोर्स आता एआय तंत्रज्ञानाने अधिक सक्षम झाले आहे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें