सीधे मुख्य सामग्री पर जाएं

डॉ. शतावरी चंद्रकांत वैद्य यानी उतक्रुष्ट नृत्य आविष्कार "गणेश वंदना" सादर करून जीएसटी डे कार्यक्रमाची सुरवत

मुंबई। नरिमन पॉइंट स्थित बिर्ला मातोश्री सभागृह मधे 8वां जीएसटी डे कार्यक्रम जीएसटी एंड सेंट्रल एक्साइज रेवेन्यू डिपार्टमेंटनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला संगीतकार अन्नू मलिक, फिल्म प्रोड्यूसर बोनी कपूर, मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे हे उपस्थित होते.     
या कार्यक्रमात डॉ. शतावरी चंद्रकांत वैद्य, भरतनाट्यम टीचर, आर्टिस्ट, नृत्य रचनाकार, यानी उतक्रुष्ट नृत्य आविष्कार "गणेश वंदना" सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरवत केली.
यांच्य साथिला श्रीमती रसिका पाठक (गुरु) यानी उत्कृष्ठ साथ दिली. रसिका पाठक यांचा अभिनय अप्रतिम झाल.
तसेच या कार्यक्रमात श्रद्धा भालेराव, लहरी शिरसाट, त्रिपर्णा वैद्य, श्रावणी मिठबावकर यानी बहारदार नृत्य केली.
श्रीमती शतावरी चंद्रकांत वैद्य, २० वर्षापासून बोरिवलीच्या रहिवाशी आहेत. ह्या बोरिवलीत, पुणे गेली ३० वर्षे भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य शिकवण्याचे कार्य नित्यनेमाने करीत आहेत. ह्या ऑफ़िस सांभाळून नृत्य शिकवण्याचे कार्य अविरत करत आहेत. त्यांना भरतनाट्यम शास्त्रीय नृत्या मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, केंद्र शासकीय, राज्य शासकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कॉर्पोरेट अवॉर्ड्स अश्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 
त्यांना नुकताच भारतीय शास्त्रीय नृत्यात डॉक्टरेट साउथवेस्टन अमेरिकन विद्यापीठाकडून (शास्त्रीय नृत्य भरतनाट्यममधील स्पेशलायझेशन), दादासाहेब फाळके पुरस्कार शास्त्रीय नृत्यासाठी, आयफा पुरस्कार डोर क्लासिकल नृत्य, आयरन लेडी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 
संत रविदास मेमोरियल आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याना मिळाला आहे. तसेच शास्त्रीय नृत्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सुपर वूमन नॅशनल अवॉर्ड त्याना मिळाला आहे. त्यांनी अनेक शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम केले आहेत. तसेच त्यांनी अनेक शास्त्रीय नृत्य, बॉलिवूड, सेमी क्लासिकल, लोक नृत्य, युथ फेस्टिवल, यात नृत्य कोरिओग्राफी केली आहे तसेच समीक्षकाची भूमिका निभावली आहे.  

श्रीमति शतावरी वैद्य, यानि सुमारे 105, भरतनाट्यम शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे, तसेच 100 च्या वर नृत्याच्या रचना केल्या आहेत. त्याचा साम टेलिविज़न वर “तेजस्विनी” या सदरा खाली नृत्या साठी इंटरव्यू प्रदर्शित होता.   

त्यांनी अनेक हिंदी, मराठी, गुजराथी, भोजपुरी चित्रपटात कामे केली आहेत. तसेच अनेक हिंदी आणि मराठी सिरीयल, तसेच अनेक हिंदी, मराठी, गुजराथी ऍडव्हर्टिसमेंट केल्या आहेत. तसेच अनेक शास्त्रीय लोकनृत्यांना, कॉर्पोरेट इव्हेंट्स, युथ फेस्टिवल, कोरियोग्राफी केली आहे. त्यांच्या कार्या बद्दल सकाळ, तरुण भारत, टाइम्स ऑफ इंडिया, नवा भारत टाइम्स, वृत्तमानस अश्या अनेक वृतपत्रां मध्ये उल्लेख आला आहे. त्यांची नृत्याची तपस्चर्या अतिशय सन्मानाची गोष्ट आहे.
नृत्या साधने बरोबर, श्रीमति शतावरी वैद्य, यानि बोरीवली वेस्ट, मधे 2012 साली श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ट्रस्टची स्थापना केली. शास्त्रीय भरतनाट्यम या नृत्ययाचे चे क्लाससेस सेंट. रॉक हाई स्कूल मधे  अनेक वर्षा पासून चालवत आहेत. ज्या मूलान मधे अनेक गुण आहेत परंतु त्याना स्टेज वर जाण्याची संधि मिळत नाही, अशा मुलाना स्टेज उपलब्ध करून देणे, त्यांच्या कला गुणाना वाव देणे, मुलांना प्रोत्साहन देणे अशी अनेक कार्य समजीक स्तरावर या करीत आहेत. या ट्रस्ट च्या माध्यमातून यानि अनेक गरजू मुलाना भरतनाट्यम शास्त्रीय नृत्याचे मोफत शिक्षण देणे, नृत्याचे प्रोग्राम चे आयोजन करणे, व्यवस्थापन करणे, संगीत आणि नृत्य चॅरिटी शो करणे, मुलांसाठी नृत्य, गायन, संगीत, रेखाचित्र स्पर्धाचे आयोजन करणे, तसेच अनेक समारंभात भाग घेणे. तसेच ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत मेडिकल कैम्प घेणे, फ्री बुक वाटप, तसेच स्त्रियांसाठी अनेक सेमिनार, मुलान साठी करियर गाइडंस, शास्त्रीय नृत्याचे वर्क शॉप घेणे, अशी बरीच कार्य करीत असतात. शास्त्रीय नृत्या बरोबर समाजाची आपुलकी व सेवा अश्या त्यांच्या कौतुकास्पद कार्यचा आढावा हा बोरिवलीकराना अभिमाना ची गोष्ट असेल.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...