रेड हेल्थ आणि डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम
मुंबई। डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई आणि रेड हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य मुंबईत पहिली ५जी-सक्षम अॅडवान्स्ड लाइफ सपोर्ट (एएलएस) रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या आपत्कालीन आरोग्यसेवेतील महत्वपूर्ण सेवेचे उदघाटन प्रदीप चव्हाण, पोलिस उपायुक्त, मुंबई (वाहतूक पूर्व विभाग) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेड हेल्थचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभदीप सिंग, डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर कुलकर्णी आणि हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.
ही क्रांतिकारी 5G-सक्षम रुग्णवाहिका सेवा आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद तंत्रज्ञानामध्ये एक महत्त्वपूर्ण झेप आहे, जी मध्य मुंबईला पुढील पिढीच्या आरोग्यसेवा वितरणाच्या अग्रस्थानी नेते. या रुग्णवाहिकेत अत्याधुनिक ५जी कनेक्टिव्हिटीचा वापर केला जातो, ज्यामुळे रिअल-टाइम वैद्यकीय डेटा ट्रान्समिशन, रिमोट तज्ञ सल्लामसलत आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके व रुग्णालय सुविधांमध्ये विनासायास समन्वय शक्य होते.
मध्य मुंबईत सुरू करण्यात आलेल्या या पहिल्या ५जी-सक्षम प्रगत रूग्णवाहिका सेवेमधून आरोग्यसेवा नाविन्यतेमध्ये अग्रस्थानी असण्याप्रती शहराची कटिबद्धता दिसून येते. ही अत्याधुनिक आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच्या केअरमध्ये अनपेक्षित क्षमतांची भर करते, ज्यामुळे आपत्कालीन स्थितीत महत्त्वपूर्ण वैद्यकीय हस्तक्षेप त्वरित सुरू होण्याची खात्री मिळते. ५जी तंत्रज्ञानामुळे तज्ञ डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधता येतो, ज्यामुळे गंभीर क्षणी रिअल-टाइम मार्गदर्शन मिळण्यासोबत निर्णय घेता येतो.
रेड हेल्थचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभदीप सिंग म्हणाले, “मुंबईच्या आपत्कालीन आरोग्यसेवेच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्य मुंबईत सुरू करण्यात आलेली पहिली ५जी-सक्षम अॅडवान्स्ड लाइफ सपोर्ट रूग्णवाहिका सेवा आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञानातील शक्तिशाली प्रगती आहे. दुर्दैवाने, कोणतीही वैद्यकीय आणीबाणी येते तेव्हा घाबरणे हा मानवी स्वभाव आहे. अशा परिस्थितीत काय करावे, कोणाला कॉल करायचा यासारखे मुलभूत निर्णय घेताना देखील व्यक्ती गोंधळून जातात. आता सुव्यवस्थित आपत्कालीन सेवा आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण ‘गोल्डन अवर'चा योग्य उपयोग करण्याची प्रबळ संधी देतात, जेथे हे गोल्डन अवर कधी-कधी पुढील उपचारांचे यश किंवा अपयश ठरवते.''
डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. समीर कुलकर्णी म्हणाले, “मध्य मुंबईत पहिली ५जी-सक्षम अॅडवान्स्ड लाइफ सपोर्ट रूग्णवाहिका सेवा सुरू करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, जी आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यामधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कधी-कधी वाहतूक कोंडीमुळे विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये पोहोचणे आव्हानात्मक ठरू शकते. वैद्यकीय आणीबाणीनंतचा काळ गोल्डन अवर मानला जातो, जो जीवनदायी वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया हस्तक्षेपासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा गंभीर स्थितीमध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि रुग्णवाहिका पथकाने त्वरित केलेली कृती व्यक्तीचा जीव वाचवण्यामध्ये निर्णायक ठरू शकते. रुग्णवाहिकांमधील ही ५जी क्षमता रिअल-टाइम डेटा ट्रान्समिशन, दुरून देखरेख आणि रूग्णवाहिकेमधून हॉस्पिटलमध्ये जात असताना तज्ञांसोबत सल्लामसलत करण्याची सुविधा देईल. रुग्ण घरातून बाहेर पडल्यापासून निदान आणि उपचारांसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. मध्य मुंबईतील रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत आमच्यावर अवलंबून असतात. त्या गंभीर क्षणांमध्ये रुग्णांना आवश्यक असलेली त्वरित आणि प्रभावी केअर सेवा मिळावी, याची खात्री घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.''
प्रदीप चव्हाण, पोलिस उपायुक्त, मुंबई (वाहतूक पूर्व विभाग) म्हणाले, “डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल आणि रेड हेल्थ यांनी मध्य मुंबईत अद्वितीय पहिलीच ५जी-सक्षम रुग्णवाहिका सेवा सुरू करून प्रशंसनीय पाऊल उचलले आहे. ही प्रगत सेवा जलद आणि अधिक कार्यक्षम आपत्कालीन प्रतिसाद सुनिश्चित करून जनतेला फायदा व्हावा यासाठी डिझाइन केली आहे. रस्ते अपघातांसारख्या गंभीर परिस्थितीत रुग्णाला घटनास्थळापासून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लागणारा वेळ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. अशी आधुनिक आणि सुसज्ज रुग्णवाहिका सेवा सुरू केल्याबद्दल मी डॉ. एल.एच. हिरानंदानी हॉस्पिटल आणि रेड हेल्थ यांचे अभिनंदन करतो, ज्याचा नागरिकांना खूप फायदा होईल असा माझा विश्वास आहे.''
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें