सीधे मुख्य सामग्री पर जाएं

स्वस्त कर्ज, विमा आणि पेन्शनही वित्तीय समावेशनाचा भाग असावेत: राज्यपाल

३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी बँकिंग क्षेत्र बनणार मुख्य आधार 

मुंबई: "वित्तीय समावेशन हे केवळ बँक खाती उघडणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित न राहता, विशेषतः ग्रामीण कुटुंबे, महिला आणि लहान उद्योजकांसाठी परवडणारे कर्ज, विमा आणि पेन्शन कवच सुनिश्चित करण्यापर्यंत विस्तारले पाहिजे," असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत केले. 'असोचॅम'च्या नॅशनल कौन्सिल फॉर बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर लेंडिंग कंपनीजच्या २१ व्या वार्षिक शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. "रेझिलियन्स, रीइन्व्हेंशन अँड इंडियाज राइज" या संकल्पनेखाली आयोजित या परिषदेत भारताच्या विकास आकांक्षांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्थांच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली.

उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा पुढे म्हणाले, "बँका आणि वित्तीय संस्था या केवळ कर्ज आणि वित्तीय सेवा पुरवठादार नाहीत; तर त्या राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राला नवे रूप देत असताना, आपण एक अशी स्थिर, नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक वित्तीय प्रणाली उभारली पाहिजे, जिथे कर्ज उत्पादक क्षेत्रांपर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान जनतेची सेवा करेल आणि वित्तीय संधी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विस्तारतील." 

भारताच्या दीर्घकालीन आर्थिक आकांक्षांमध्ये बँकिंग क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकताना इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल कुमार गोयल म्हणाले, "२०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताचे बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र हे मुख्य उत्प्रेरक ठरू शकते. या महत्त्वाकांक्षेला पाठबळ देण्यासाठी या क्षेत्राने आर्थिक विकासाच्या संधी खुल्या करणे, उत्पादकता वाढवणे, डिजिटल परिपक्वता साध्य करणे आणि मजबुती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नवीकरणीय ऊर्जा, सेमीकंडक्टर्स आणि एमएसएमई यांसारख्या नवोदित क्षेत्रांसाठी वित्तपुरवठा मजबूत करणे, एआईचा वापर करणे आणि सायबर सुरक्षा समाविष्ट करणे या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल."

'असोचॅम'चे अध्यक्ष निर्मल के. मिंडा यांनी सुशासनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, "भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास सुनिश्चित करत पायाभूत सुविधा, एमएसएमई वाढ, उत्पादन, गृहनिर्माण, कृषी आणि नवोदित उद्योगांना पाठबळ देण्यात वित्तीय संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. डिजिटलायझेशन, फिनटेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगात विश्वास, पारदर्शकता, मजबूत सुशासन, सायबर सुरक्षा आणि जबाबदार कर्जवाटप हेच वित्तीय प्रणालीचे आधारस्तंभ राहिले पाहिजेत."

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६, मुग्धा गोडसे हिने पुरस्कार प्रदान केले

मुंबई: रिअल्टी क्वार्टर, एक अग्रगण्य रिअल इस्टेट मीडिया, प्रकाशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने, आपला ९वा रिअल इस्टेट एंड कंस्ट्रक्शन इंडस्ट्री लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ यशस्वीरित्या आयोजित केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवी पवन चौहान यांनी सुरू केलेल्या या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात, कंपनीच्या प्रकाशनाची नऊ वर्षे आणि प्रॉपर्टी एक्स्पो व गुंतवणूकदार मेळाव्यांच्या आयोजनातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १७ वर्षांच्या उपस्थितीचा उत्सव साजरा करण्यात आला. या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली, ज्याला श्री. चौहान, कंपनी संचालक शाइस्ता अन्सारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. असोसिएट डायरेक्टर सिद्धांत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केलेली "बी२बी आणि बी२सी साठी एकात्मिक दृष्टिकोन आणि रिअल इस्टेटचा दृष्टिकोन २०२६" या विषयावरील माहितीपूर्ण पॅनल चर्चा हे या सायंकाळचे मुख्य आकर्षण होते. पॅनेलमध्ये सुहेल खंडवाणी (खंडवाणी ग्रुप), डॉ. अजय एल. दुबे (मीरा-भयंदर प्रॉपर्टी डीलर्स वेल्फेअर असोसिएशन), चिंतन वसानी (वाइझबिझ रियल्टी), संजीव गुप्ता...

मिन्त्राचा बिग फॅशन फेस्टिव्हल

८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, १००+ नवीन लॉन्च आणि २१,००० उदयोन्मुख लेबल्सचा सहभाग मुंबई: सणासुदीच्या खरेदी हंगामाची सुरुवात करत मिन्त्राने आपल्या प्रमुख बिग फॅशन फेस्टिव्हलची (बीएफएफ) घोषणा केली आहे. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांसाठी ८ दशलक्षांहून अधिक स्टाइल्स, हजारो ब्रँड्स आणि १०० हून अधिक नवीन ब्रँड्स व कलेक्शन्स उपलब्ध असतील. यासोबतच २१,००० उदयोन्मुख ब्रँड्स आणि लेबल्स सहभागी होत असून, त्यापैकी १३,००० ब्रँड्स प्रथमच बीएफएफमध्ये सहभागी होत आहेत. मिन्त्राच्या प्रमुख शेरॉन पैस म्हणाल्या, “बिग फॅशन फेस्टिव्हल हा भारताच्या उत्सवी कॅलेंडरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा बनला आहे. प्रादेशिक विक्रेते आणि लघुउद्योगांना सक्षम करण्यापासून ते जागतिक आणि भारतीय फॅशन व लाइफस्टाइल ब्रँड्समधील सर्वोत्तम उत्पादने लाखो घरांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तो संपूर्ण इकोसिस्टमला जोडतो. एआय आणि विस्तारित डिलिव्हरी नेटवर्कच्या मदतीने आम्ही ८० दशलक्षांहून अधिक ग्राहकांसाठी फॅशन अधिक सुलभ, वैयक्तिकृत आणि अखंड बनवत आहोत.” यंदाच्या बीएफएफमध्ये पुरुष व महिलांचे एथनिक वेअर, पुरुषांचे कॅज्युअल वेअर, महिला...

आयटेलने लॉन्च केला 'सिटी ३०० ५जी' स्मार्टफोन

परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दमदार बॅटरी परफॉर्मन्स  मुंबई: भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी ब्रँड्सपैकी एक असलेल्या आयटेल ने आयटेल सिटी ३०० ५जी स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली. तरुण आणि महत्त्वाकांक्षी ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केलेला हा स्मार्टफोन १४,९९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे. परवडणाऱ्या किमतीत ५जी कनेक्टिव्हिटी, स्मूथ डिस्प्ले, दिवसभर साथ देणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्सपासून मुक्त सॉफ्टवेअरचा अनुभव देण्याचा सिटी ३०० ५जी चा प्रयत्न आहे. सिटी ३०० ५जी मध्ये १२० हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहणं, सोशल मीडियावर स्क्रोल करणं किंवा हलकेफुलके गेम खेळणं अधिक सहज आणि प्रतिसादक्षम होतं. टी८२०० ऑक्टा-कोर ६एनएम ५जी प्रोसेसरमुळे रोजच्या कामांसाठी विश्वासार्ह परफॉर्मन्स मिळतो. अधिक चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हा फोन एनआरसीए तंत्रज्ञानासह १० ५जी बँड्सना सपोर्ट करतो. दिवसभर चालणारी बॅटरी आणि अनावश्यक अॅप्स नसलेला इंटरफेस यामुळे फोन वापरण्याचा अनुभव स्वच्छ, सोपा आणि त्रासमुक्त राहतो. त्यामुळे फीचर्सने भरलेला, पण बजेटमध्ये बसणारा स्मार्ट...