सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टाटा सिएराने नवीन इंधन कार्यक्षमता मापदंड स्‍थापित केला

मुंबई। टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स (टीएमपीव्‍ही)ची नवीन वेईकल टाटा सिएराने उल्‍लेखनीय टप्‍पा संपादित केला आहे, जेथे १२ तासांमध्‍ये अधिकतम इंधन कार्यक्षमता संपादित करण्‍यासाठी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्‍ये प्रवेश केला आहे. नॅट्रॅक्‍स इंदौर येथे प्रमाणित ड्राइव्‍हमध्‍ये सिएराने २९.९ किमी/लीटरची अपवादात्‍मक इंधन कार्यक्षमता दिली, ज्‍यासह मागील राष्‍ट्रीय मापदंड मागे टाकले. पिक्सल मोशन टीमने हे यश मिळवले. टीमने ३० नोव्‍हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजल्‍यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत १.५ लीटर हायपेरियन-पॉवर्ड सिएरा ड्राइव्‍ह केली, जेथे ड्रायव्‍हर बदलण्‍यासाठी फक्‍त एकदाच थांबा घेण्‍यात आला. याच दिवशी या विक्रमाला अधिकृतरित्‍या मान्‍यता देण्‍यात आली.

या यशामधील प्रमुख बाब आहे नवीन १.५ लीटर हायपेरियन पेट्रोल इंजिन, जे सुधारणा, कार्यक्षमता किंवा ड्रायव्हिंग क्षमतेबाबत तडजोड न करता उच्‍च कार्यक्षमता देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. यामधील प्रगत कम्‍बशन सिस्‍टम, टॉर्क-संपन्‍न परफॉर्मन्‍स बँड आणि घर्षण अनुकूल रचनेने संपूर्ण ड्राइव्‍हदरम्‍यान सतत इंधन वितरण व स्थिर कामगिरीची खात्री दिली. या यशामधून हायपेरियन पॉवरट्रेनची अभियांत्रिकी नाविन्‍यता आणि क्षमता दिसून येते.

या यशाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍सचे चीफ प्रॉडक्‍ट ऑफिसर मोहन सावरकर म्‍हणाले, ''सिएरा प्रवासामध्‍ये इतक्‍या लवकर राष्‍ट्रीय स्‍तरावर कार्यक्षमता विक्रम स्‍थापित करणे आमच्‍यासाठी अभिमानास्‍पद क्षण आहे. हायपेरियन इंजिन प्‍लॅटफॉर्म पेट्रोल पॉवरट्रेन्‍स संपादित करू शकणाऱ्या बाबींमधील मर्यादांना दूर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे आणि हा महत्त्वपूर्ण टप्‍पा त्‍या प्रयत्‍नांना सार्थ ठरवतो. तसेच, हे यश ग्राहकांसाठी सिएराचे मूल्‍य तत्त्व अधिक प्रबळ करते आणि बाजारपेठेत प्रगत, कार्यक्षम व भविष्‍याकरिता सुसज्‍ज तंत्रज्ञान सादर करण्‍याप्रती टीएमपीव्‍हीच्‍या कटिबद्धतेला सादर करते.''

टाटा सिएराने नॅट्रॅक्‍स, इंदौर येथे विशिष्‍ट चाचणी स्थिती अंतर्गत २२२ किमी/तासचा टॉप स्‍पीड देखील संपादित केला, ज्‍यामधून समांतर ड्राइव्‍हमध्‍ये १.५ लीटर हायपेरियन इंजिनची कार्यक्षमता दिसून येते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...