सीधे मुख्य सामग्री पर जाएं

३५०० हून अधिक सहभागींसह ‘मुंबईहॅक्‍स २०२५’ चे यशस्वी आयोजन

जगातील सर्वात मोठी एजेंटिक एआय हॅकेथॉन बनली 

मुंबई: मुंबईतील नेस्‍को येथे इतिहास रचण्‍यात आला. टेक आंत्रेप्रीन्‍युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (टीईएएम) आणि शहरातील तंत्रज्ञान परिसंस्‍था प्रबळ करण्‍याचा मनसुबा असलेला ना-नफा तत्त्वावर आधारित उपक्रम मेड इन मुंबई यांनी मुंबईहॅक्‍स २०२५ चे आयोजन केले. स्‍वत:चा विक्रम मोडून काढत हा इव्‍हेण्‍ट जागतिक स्‍तरावर सर्वात मोठा एजेंटिक एआय हॅकेथॉन बनला आहे. या इव्‍हेण्‍टची व्‍याप्‍ती व महत्त्वाकांक्षेमधून भारतातील एआय इनोव्‍हेशन हब म्‍हणून मुंबईचा वाढता दर्जा दिसून आला. आघाडीची जागतिक तंत्रज्ञान कंपनी एचसीएलटेकने हा इव्‍हेण्‍ट सादर केला होता.

नाविन्‍यतेला नव्‍या उंचीवर नेलेल्‍या तीन विजेत्‍या टीम्‍समध्‍ये १ कोटी रूपयांचे रोख पारितोषिक आणि रिवॉर्ड्स विभागण्‍यात आले. दर्शन खापेकर, श्रावणी रासम, आदिल शाल व अल्फिया सिद्दीक (हेल्थटेक); हिमांशू शर्मा व हेमिश जैन (फिनटेक); आणि सेजल चौधरी, सुप्रिया नायक, शांभवी पाटील व आकृती सिंग (मिसइन्‍फॉर्मेशन) यांचा सर्व महिलांचा समूह. हे सर्व त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमध्‍ये अपवादात्‍मक कौशल्‍य दाखवत आहेत.

या दोन-दिवसीय उत्‍साहवर्धक इव्‍हेण्‍टमध्‍ये एचसीएलटेक टायटल स्‍पॉन्‍सर होते, तर बँकिंग सहयोगी आयडीएफसी फर्स्‍ट बँकेने त्‍यांचे एमडी व सीईओ वैद्यनाथन यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत आपली सक्रिय भूमिका दाखवली. ३,५०० हून अधिक नवप्रवर्तक, तसेच ९०० महिलांच्‍या उल्‍लेखनीय समूहाने (२७ टक्‍के सहभागी) या इव्‍हेण्‍टमध्‍ये सहभाग घेतला, जेथे त्‍यांनी एआयच्‍या मर्यादांना दूर करण्‍याचा, तसेच फिनटेक, हेल्‍थटेक व मिसइन्‍फॉर्मेशन डिटेक्‍शन या तीन ट्रॅक्‍समध्‍ये उल्‍लेखनीय सोल्‍यूशन्‍स शोधण्‍याचा प्रयत्‍न केला. या इव्‍हेण्‍टमध्‍ये प्रेरणेची भर करत उद्योगांमधील उद्योजकांनी मार्गदर्शकांची भूमिका बजावली, दिवसरात्र सहभागींना प्रशिक्षित केले, तज्ञ मार्गदर्शन व पाठिंबा दिला आणि फायनालिस्‍ट्सना शॉर्टलिस्‍ट करण्‍यामध्‍ये मदत केली. 

तंत्रज्ञानामध्‍ये महिलांसाठी नवीन महत्त्वपूर्ण टप्‍पा स्‍थापित करत मुंबईतील सर्व महिला असलेल्‍या टीमने मिसइन्‍फॉर्मेशन ट्रॅकमध्‍ये विजय मिळवला, ज्‍यामधून भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे वाढते नेतृत्‍व दिसून येते. या उल्‍लेखनीय इव्‍हेण्‍टने निदर्शनास आणले की¸ भारतातील हुशार व्‍यक्‍तींना एका दृष्टिकोनासह एकत्र आणले तर अशक्‍य देखील शक्‍य होते आणि तो दृष्टिकोन म्‍हणजे तंत्रज्ञानामध्‍ये क्रांती घडवून आणणे.

इव्‍हेण्‍टमध्‍ये निर्णायक क्षण ठरलेल्‍या अनपेक्षित पुढाकारामध्‍ये आयडीएफसी फर्स्‍ट बँकेचे एमडी व सीईओ श्री. वैद्यनाथन सहभागींची आवड व पुढाकार पाहून प्रभावित झाले आणि त्‍यांनी स्‍वत: मंचावरच टॉप १०० टीम्‍सना प्रति सदस्य ३,००० रुपयांचे व्हाउचर देण्याची घोषणा केली. या पुरस्‍काराने टॉप १० टक्‍के सहभागींना प्रशंसित केले, ज्‍यामधून इव्‍हेण्‍टचा स्‍पर्धात्‍मक उत्‍साह आणि नाविन्‍यतेला चालना देण्‍यासोबत तंत्रज्ञान उद्योजकांच्‍या भावी पिढीला पाठिंबा देण्‍याप्रती आयडीएफसी फर्स्‍ट बँकेची दृढ कटिबद्धता दिसून येते.

''मुंबईहॅक्‍स हॅकेथॉनमधून चळवळीमध्‍ये बदलली आहे, जी भारतातील एआय राजधानी म्‍हणून मुंबईच्‍या ओळखला आकार देत आहे,'' असे आयोजक विवेक खेमानी म्‍हणाले. ''सर्वात मोठा एजेंटिक एआय इव्‍हेण्‍ट, तसेच वास्‍तविक विश्वातील आव्‍हानांचे निराकरण करणारे सोल्‍यूशन्‍स निर्माण करणाऱ्या अपवादात्‍मक टॅलेंटना पाहून नाविन्‍यता प्रगत होणारी परिसंस्‍था घडवण्‍याप्रती आमचे मिशन अधिक प्रबळ झाले आहे. आमचे नेक्‍स्‍ट-जनरेशन टेक प्रोफेशनल्‍स निश्चितच जागतिक ट्रेलब्‍लेझर्स बनण्‍यास सज्‍ज आहेत. सर्व विजेत्‍यांचे त्‍यांच्‍या दूरदर्शी सोल्‍यूशन्‍ससाठी अभिनंदन.''


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

टाटा सिएरा आता आयकॉनिक 'डार्क' श्रेणीमध्ये उपलब्ध

मुंबई। टाटा.कार्स या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने टाटा सिएरा डार्क श्रेणीच्या लाँचची घोषणा केली. हा भारतातील आयकॉनिक प्रीमियम मिड-एसयूव्हीचा एक अधिक ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण लुक आहे. १३.९९ लाख रुपये* या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेल्‍या सिएरा डार्कमध्ये खास तयार केलेल्या फ्रीसियन ब्लॅक एक्सटीरियरसह प्रीमियम व्हायलेट एक्लिप्स इंटिरियर केबिन थीम आणि आकर्षक पर्पल क्रोम डिटेलिंग आहे. हे डिझाइन सिएराची वैशिष्ट्यपूर्ण आणि आलिशान ओळख कायम ठेवत या वेईकलला वेगळा, आकर्षक लूक प्रदान करते.  भारतातील प्रीमियम मिड-एसयूव्ही सेगमेंट निर्माण करण्यात सिएराचा मोलाचा वाटा राहिला आहे. हीच परंपरा पुढे नेत टाटा सिएरा डार्क या लेजेंडरी (प्रसिद्ध) ब्रँडला पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम, अत्याधुनिक आणि अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. सिएराची मूळ आयकॉनिक ओळख, रस्त्यावरील रुबाबदार उपस्थिती आणि सर्वसमावेशक आधुनिक वैशिष्टये कायम ठेवत ही वेईकल टाटा.कार्स च्या अत्यंत लोकप्रिय डार्क श्रेणीचा वारसाही पुढे नेते. ही श्रेणी आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्यपूर्ण लुक आणि अनोख्या आकर्षणासाठी ग्राहकांच्या पसंत...