सीधे मुख्य सामग्री पर जाएं

ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसच्‍या उत्‍पादनाला सुरूवात

मुंबई। किया इंडियाने देशातील मिड-एसयूव्‍ही श्रेणीमधील आपले नेतृत्‍व दृढ करत आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील त्‍यांच्‍या अत्‍याधुनिक उत्‍पादन प्‍लांटमध्‍ये ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसच्‍या उत्‍पादनाला सुरूवात केली, जो कंपनीच्‍या भारतातील कार्यसंचानांसाठी महत्त्‍वपूर्ण टप्‍पा ठरला. किया इंडिया २ जानेवारी २०२६ रोजी ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसच्‍या किमतींची घोषणा करेल.

नवी सेल्‍टोस भारतातील सर्वात लोकप्रिय व मापदंड स्‍थापित करणाऱ्या मिड-एसयूव्‍हीच्‍या अधिक मोठी, अधिक आकर्षक आणि प्रगतीशील जनरेशनल उत्‍क्रांतीला सादर करते. भारतातील एसयूव्‍ही ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या नवीन सेल्‍टोसमध्‍ये एैसपैस जागा, आकर्षक नवीन डिझाइन, अधिक राइड आरामदायीपणा, आत्‍मविश्वासपूर्ण हाताळणी, प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आणि नेक्‍स्‍ट-जनरेशन डिजिटल तंत्रज्ञान आहे, जेथे जागतिक मानकांसह भारतातील रस्‍ते व जीवनशैलीसाठी डिझाइन करण्‍यात आलेले सोल्‍यूशन्‍स आहेत.

''ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसचे लाँच किया इंडियासाठी अभिमानास्‍पद टप्‍पा आहे. सेल्‍टोसने दीर्घकाळापासून मिड-एसयूव्‍ही श्रेणीसाठी मापदंड स्‍थापित केले आहेत आणि ही न्‍यू जनरेशन अधिक मोठी, अधिक आकर्षक व अधिक प्रगतीशील उत्‍क्रांतीला सादर करते, जी भारतातील ग्राहकांनी दिलेल्‍या अभिप्रायानुसार डिझाइन करण्‍यात आली आहे. आमच्‍या अनंतपूर प्‍लांटमध्‍ये उत्‍पादनाला सुरूवात होण्‍यासह आमच्‍या टीम्‍स ग्राहक अधिक वाट न पाहता वेळेवर त्‍यांच्‍या ऑल-न्‍यू सेल्‍टोसची डिलिव्‍हरी घेऊ शकण्‍याची खात्री घेण्‍यासाठी पूर्णपणे सुसज्‍ज आहेत. आम्‍हाला विश्वास आहे की, ऑल-न्‍यू सेल्‍टोस पुन्‍हा एकदा श्रेणीमधील अपेक्षांची पूर्तता करेल आणि भारतात कियाचे नेतृत्‍व अधिक प्रबळ करेल,'' असे किया इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी ग्‍वांगू ली म्हणाले, जे या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याला साजरे करण्‍यासाठी अनंतपूरमध्‍ये उपस्थित होते. ''नवीन सेल्‍टोसचा लूक अधिक आकर्षक आहे. अनंतपूर प्‍लांटमधील टीमने आमच्‍या पुरवठादार सहयोगींसोबत सहयोगाने उल्‍लेखनीय कामगिरी बजावली आहे, जेथे ग्राहकांना प्रभावी कार्यक्षमता व कनेक्‍टीव्‍हीटीसह आकर्षक लुक, अधिक मोठी डिझाइन, तंत्रज्ञानदृष्‍ट्या प्रगतीशील आणि सुरक्षित वेईकल मिळेल,'' असे ते पुढे म्‍हणाले.

अनंतपूर प्‍लांट कियाचे भारतातील पहिले उत्‍पादन प्‍लांट व प्रमुख जागतिक उत्‍पादन केंद्र आहे. २०१९ मध्ये स्‍थापना करण्‍यात आलेल्‍या या प्‍लांटमध्‍ये पहिल्‍यांदा किया सेल्‍टोस उत्‍पादित करण्‍यात आली होती. हे मॉडेल विशेषत: भारतातील ग्राहकांसाठी संकल्पित व डिझाइन करण्‍यात आले होते. देशांतर्गत मागणी आणि आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये निर्यातीची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या प्‍लांटमध्‍ये प्रगत ऑटोमेशन, उच्‍च दर्जाचे मानक आणि कुशल कर्मचारीवर्ग आहेत. स्‍थापनेपासून या प्‍लांटने कियाच्‍या जागतिक धोरणामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्‍यासह सेल्‍टोस भारतासाठी प्रमुख मॉडेल बनण्‍यासह कियाच्‍या जागतिक पोर्टफोलिओमध्‍ये मोठी योगदानकर्ता देखील ठरली आहे.      

ऑल-न्‍यू किया सेल्‍टोस प्रबळ वारसा आणि पूर्वीच्‍या मॉडेलला ग्राहकांकडून मिळालेल्‍या विश्वासाच्‍या आधारावर डिझाइन करण्‍यात आली आहे, तसेच कियाचे मुलभूत उत्‍पादन आधारस्‍तंभ लक्षवेधक उपस्थिती, आकर्षक डिझाइन आणि प्रगतीशील सुरक्षितता व तंत्रज्ञानाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. भारतातील ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक अपेक्षा लक्षात घेत विचारपूर्वक डिझाइन करण्‍यात आलेली ही एसयूव्‍ही आकाराने अधिक मोठी आहे, लांबी ४,४६० मिमी आहे, जी श्रेणीमध्‍ये सर्वात लांब आहे आणि रूंदी १,८३० मिमी आहे. २,६९०‍ मिमी लांब व्‍हीलबेस केबिनमध्‍ये अधिक जागेची आणि ड्रायव्हिंग स्थिरतेची खात्री देते, ज्‍यासह प्रत्‍येक प्रवास आत्‍मविश्वासपूर्ण, आरामदायी व प्रीमियम होण्‍याची खात्री मिळते. 

अधिक आकर्षक असलेली ही एसयूव्‍ही ग्राहकांना अधिक लक्षवेधक व अधिक प्रगतीशील एसयूव्‍ही डिझाइन देते, जी कियाच्‍या ऑपोझिट्स युनायटेड तत्त्वाशी संलग्‍न आहे, ज्‍यासह या वेईकलची आकर्षकता व प्रीमियम अपील अधिक लक्षवेधक बनले आहे. या वेईकलमध्‍ये नवीन डिजिटल टायगर फेस, आइस क्‍यूब एलईडी प्राजेक्‍शन हेल्‍डलॅम्‍प्‍ससह डायनॅमिक वेलकम फंक्‍शन, स्‍पोर्टी क्रिस्‍टल कट अलॉई व्‍हील्‍ससह निऑन ब्रेक कॅलिपर्स, शक्तिशाली व समकालीन सिल्‍हूट अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यासह ऑल-न्‍यू सेल्‍टोस रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...