सीधे मुख्य सामग्री पर जाएं

होमलेनची फ्रँचायझी विस्‍तारीकरण योजनेला गती

मुंबई। होमलेन या भारतातील आघाडीच्‍या एण्‍ड-टू-एण्‍ड होम इंटीरिअर्स सोल्‍यूशन्‍स प्‍लॅटफॉर्मने लाभक्षमतेमध्‍ये परिवर्तन करत आर्थिक वर्ष २०२४-२५ ची सांगता केली, जेथे आर्थिक वर्ष २५ मध्‍ये महसूल २२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ७५६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला, तर चौथ्‍या तिमाहीत ईबीआयटीडीएमध्‍ये सकारात्‍मक वाढ झाली. या गतीला अधिक प्रबळ करत कंपनी १२ महिन्‍यांच्‍या कालावधीत प्रमुख मेट्रो बाजारपेठांपेक्षा पलीकडे विस्‍तार करत आणखी १०० नवीन फ्रँचायझी-नेतृत्वित स्‍टोअर्स लाँच करण्‍याच्‍या आपल्‍या योजनेची अंमलबजावणी करत आहे. 

कंपनीचे फ्रँचायझी नेटवर्क दोन मॉडेल्‍स अंतर्गत कार्यरत आहे: एफओसीओ (फ्रँचायझी-ओन्‍ड, कंपनी-ऑपरेटेड) आणि नुकतेच लाँच करण्‍यात आलेले एफओएफओ (फ्रँचायझी-ओन्‍ड, फ्रँचायझी-ऑपरेटेड). २०२५ मध्‍ये होमलेनने देशभरात आपली फ्रँचायझी उपस्थिती अधिक वाढवली, जेथे ४० हून अधिक शहरांमध्‍ये ५५,००० हून अधिक घरांचे काम पूर्ण केले आणि दररोज जवळपास ३० घरांमध्‍ये इन्‍स्‍टॉलेशन केले. मुंबई, बेंगळुरू व दिल्‍ली-एनसीआर अशा प्रमुख शहरांपासून सिलगुडी, जयपूर व कोची अशा उदयोन्‍मुख बाजारपेठांपर्यंत फ्रँचायझी-नेतृत्वित मॉडेलने विश्वसनीय, तंत्रज्ञान-संचालित इंटीरिअर सोल्‍यूशन्‍स सक्षम केले आहेत, ज्‍यांना प्रोप्राइटरी सॉफ्टवेअर आणि सर्वोत्तम पुरवठा साखळयांचे पाठबळ लाभले आहे.

''आम्‍ही २०२५ मध्‍ये केलेल्‍या प्रगतीने होमलेनमध्‍ये विकासाच्‍या पुढील उत्‍साहवर्धक टप्‍प्‍यासाठी मंच स्‍थापित केला आहे,'' असे होमलेनचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक श्रीकांत अय्यर म्‍हणाले. ''आमच्‍या फ्रँचायझी नेटवर्कचे विस्‍तारीकरण आणि ऑपरेशनल क्षमतेच्‍या अधिक सक्षमीकरणाने आम्‍हाला देशभरातील अधिकाधिक घरमालकांना उच्‍च दर्जाचे, तंत्रज्ञान-सक्षम इंटीरिअर्स देण्‍यास मदत केली आहे. वर्ष २०२६ कडे वाटचाल करत आम्‍ही प्रमुख शहरांमध्‍ये व उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये आमची उपस्थिती अधिक दृढ करण्‍यावर लक्ष केंद्रि‍त केले आहे, तसेच सर्वोत्तम, विश्वसनीय व सहजसाध्य इंटीरिअर सोल्‍यूशन्‍स देत राहू. आमचे फ्रँचायझी सहयोगी आणि तंत्रज्ञान-नेतृत्वित अंमलबजावणीसह आम्‍हाला शाश्वत विकासाला गती देण्‍याचा आणि भारतातील होम इंटीरिअर्स क्षेत्रात अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्‍याचा विश्वास आहे.''

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...