सीधे मुख्य सामग्री पर जाएं

पोको सी८५ ५जी च्‍या पहिल्या सेलला सुरूवात

आकर्षक दरामध्‍ये कार्यक्षमता, स्‍टाइल आणि सर्वोत्तम बॅटरीचा अनुभव 

मुंबई। पोको या भारतातील सर्वात विश्वसनीय ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने फक्‍त फ्लिपकार्टवर नवीन पोको सी८५ ५जी च्‍या फर्स्‍ट सेलला सुरूवात केली आहे. सर्वोत्तम बॅटरी अनुभवासाठी पोको सी८५ ५जी मध्‍ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते. ३३ वॅट फास्‍ट चार्जिंगसह स्‍मार्टफोन फक्‍त २८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍के चार्ज होऊ शकतो, ज्‍यामधून तुम्‍ही सतत कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईसला पोर्टेबल पॉवर बँक बनवते, ज्‍यासह मोबाइल्‍स, टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स, स्‍मार्टवॉचेस् आणि इतर अॅक्‍सेसरीज चार्ज करता येऊ शकतात. हा पॉवर-पॅक स्‍मार्टफोन १२,००० रूपयांपेक्षा कमी किमतीच्‍या डिवाईसेस श्रेणीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करतो.

पोको सी८५ ५जी सह तुम्‍ही तुमच्‍या स्‍टाइलमध्‍ये सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. या स्‍मार्टफोनमध्‍ये स्‍लीक, आधुनिक डिझाइनसह क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशिंग आहे. हा स्‍मार्टफोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्‍लॅक या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. उच्‍च कार्यक्षम मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० चिपसेटची शक्‍ती असलेला हा डिवाईस गेमिंगपासून मल्‍टीटास्किंगपर्यंत प्रत्‍येक गोष्‍टीसाठी अत्‍यंत सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. तसेच, ५० मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा सेटअप महत्त्वपूर्ण क्षण सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर होण्‍याची खात्री देते. फर्स्‍ट सेलला फ्लिपकार्टवर १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरूवात होत आहे.

अद्वितीय लाँच किमतीसह १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर पोको सी८५ च्‍या विक्रीला सुरूवात होईल. सुरूवातीची किंमत ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १०,९९९ रूपये*, ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरएिण्‍टसाठी ११,९९९ रूपये* आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३,४९९ रूपये* आहे. लाँच ऑफरचा भाग म्‍हणून ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्सचा वापर करत १,००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा आनंद घेऊ शकतात किंवा पात्र डिवाईसेसवर १,००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनसचा अवलंब करू शकतात. तसेच, क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर ३ महिने नो-कॉस्‍ट ईएमआय उपलब्‍ध आहे. वरील ऑफर्स फक्‍त विक्रीच्‍या पहिल्‍या दिवशी लागू आहेत.   

पोको सी८५ ५जी हा असा स्मार्टफोन आहे जो उत्कृष्ट बॅटरी लाइफ, आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स यांचा परिपूर्ण संगम साधतो. यामध्ये ६००० एमएएच क्षमतेची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जवर दोन दिवसांहून अधिक काळ सहज वापर करता येईल इतकी सक्षम आहे. यासोबतच ३३ वॅट फास्ट चार्जिंग आणि अत्यंत उपयुक्त १० वॅट वायर्ड रिव्हर्स चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. डिझाइनच्या बाबतीत, प्रीमियम फील देणारा क्वॉड-कर्व्ह्ड बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी, ड्युअल-टोन फिनिश आणि वेगळा उठून दिसणारा कॅमेरा डेको यामुळे हा फोन सेगमेंटमध्ये खास ठरतो आणि हातात घेतल्यावर उत्तम ग्रिप देतो.

सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच डिस्प्लेवर १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला असून त्यामुळे स्क्रॉलिंग, स्वाइपिंग, गेमिंग आणि मनोरंजनाचा अनुभव अत्यंत स्मूथ व आनंददायी होतो. मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरने सुसज्ज असलेला हा डिव्हाइस ४.५ लाखांहून अधिक AnTuTu स्कोअर मिळवून उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करतो. पोको सी८५ ५जी अँड्रॉईड १५ वर आधारित हायपरओएस २.२ सह आउट ऑफ द बॉक्स उपलब्ध असून, सेगमेंटमधील सर्वोत्तम सॉफ्टवेअर कटिबद्धतेअंतर्गत २ अँड्रॉईड अपग्रेड्स आणि ४ वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्यात येतात. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत हा स्मार्टफोन अधिक शक्तिशाली बॅटरी, मोठा व आकर्षक डिस्प्ले आणि प्रीमियम क्वॉड-कर्व्ह्ड बॅक डिझाइनसह मोठी झेप घेतो, तसेच हातात सहज बसणारा आहे. ट्रेंडी पण कार्यक्षम डिव्हाइस शोधणाऱ्या तरुण आणि उत्साही वापरकर्त्यांसाठी खास डिझाइन करण्यात आलेला पोको सी८५ ५जी सध्या फक्त फ्लिपकार्टवर पहिल्या सेलच्या खास ऑफर्ससह उपलब्ध आहे—म्हणून ही संधी हातातून जाऊ देऊ नका.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...