सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भारतातील २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित

जसलोक हॉस्पिटलमध्ये प्रगत व्‍हीएटीएस शस्त्रक्रियेने यशस्वी उपचार 

मुंबई। जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पाल्मर हायपरहायड्रोसिसने पीडित आधी एअरहोस्टेस म्हणून काम केलेल्या तरुणीवर बायलॅटरल थोरॅकोस्कोपिक सिम्पॅथेक्टॉमी (व्‍हीएटीएस)च्‍या माध्‍यमातून यशस्वीरित्या उपचार केले. ही सुरक्षित, किमान इन्‍वेसिव्‍ह, डे-केअर शस्‍त्रक्रिया आहे, ज्‍यामधून त्‍वरित परिणाम मिळतात.

भारतातील २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्‍याचा अंदाज आहे. असे असताना देखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्‍यक्‍तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्‍यास या आजाराचा दैनंदिन काम, मानसिक आरोग्‍य आणि व्‍यावसायिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. 

या महिला रुग्णाला किशोरावस्थेपासून लक्षणे जाणवत होती आणि गेल्या काही वर्षांपासून तिने अनेक वैद्यकीय उपचार देखील केले, पण त्‍यामधून हा आजार कायमसाठी बरा झाला नाही. या आजारामुळे तिला तिची नोकरी सोडावी लागली, तसेच तिच्‍या मानसिक आरोग्‍यावर परिणाम होण्‍यासोबत मनोबल कमी झाले.

डॉ. विमेश राजपूत, कन्‍सल्‍टण्‍ट, थोरॅसिस सर्जरी यानी महिला रूग्‍णावर बायलॅटरल थोरॅसिस्‍कोपिक सिम्‍पॅथेक्‍टोमी (व्‍हीएटीएस) प्रक्रिया केली. डॉ. सावी कपिला, कन्‍सल्‍टण्‍ट, अॅनेस्‍थेसियोलॉजी यांनी कुशलपणे अनेस्‍थेसियाचे व्‍यवस्‍थापन केले. या एक तासाच्‍या शस्‍त्रक्रियेमध्‍ये हातांना जास्‍त घाम येण्‍यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सिम्‍पॅथेटिक नसांना प्रतिबंध केला जातो.

“हायपरहायड्रोसिस सामान्य आजार नसून शारीरिक अक्षमता आणणारा आजार आहे, जो रूग्‍णांना समाजापासून वेगळे करू शकतो, त्‍यांच्‍यामध्‍ये चिंता व नैराश्‍य आणू शकतो,'' असे जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्‍हणाले. “पण चिंताजनक बाब म्‍हणजे या आजारावर निश्चित, सुरक्षित उपचार उपलब्‍ध असताना देखील आजाराबाबत जागरूकता कमी प्रमाणात आहे.'' 

या प्रक्रियेच्‍या परिणामकारकतेवर भर देत ते पुढे म्‍हणाले, “ही किमान इन्‍वेसिव्‍ह, डे-केअर शस्‍त्रक्रिया आहे. वर्षानुवर्षे त्रास होत असलेल्‍या या आजारासह रूग्‍ण हॉस्पिटलमध्‍ये येतात त्‍याच दिवशी शस्‍त्रक्रियेसह बरे होऊन डिस्‍चार्ज दिला जातो. या शस्‍त्रक्रियेचे परिणाम सर्वोत्तम, दीर्घकालीन आणि जीवनाला कलाटणी देणारे असतात.''

डॉ. राजपूत यांनी देखील लवकर सल्‍लामसलत व हस्‍तक्षेपाच्‍या महत्त्वाला निदर्शनास आणले, “अनेक रूग्‍ण अधिक प्रमाणात येणाऱ्या घामाकडे दुर्लक्ष करतात, त्‍यांना ते सामान्‍य असल्‍यासारखे वाटते. पण काळासह या आजारामुळे त्‍यांचा आत्‍मविश्वास कमी होतो, समाजामध्‍ये उपस्थिती कमी होते आणि मानसिक आरोग्‍यावर परिणाम होतो. लवकर निदान आणि वेळेवर शस्‍त्रक्रिया उपचारामुळे आजारामधून पूर्णपणे बरे होण्‍यासोबत जीवनाचा दर्जा सुधारू शकतो.'' 

शस्‍त्रक्रियेनंतर महिला रूग्‍णाला लक्षणे त्‍वरित व पूर्णपणे बरी झाल्‍याचे जाणवले, ज्‍यासह ती भिती, संकोच व अस्‍वस्‍थतेला दूर करत पुन्‍हा सामान्‍य दैनंदिन काम करू लागली.

या केसबाबत मत व्‍यक्‍त करत जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके म्‍हणाले, “हायपरहायड्रोसिसचे योग्‍य निदान होणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. व्‍हीएटीएस सिम्‍पॅथेक्‍टोमी सारख्‍या किमान इन्‍वेसिव्‍ह, शॉर्ट-स्‍टे प्रक्रिया त्‍वरित आराम देऊ शकतात आणि रूग्‍णांचा आत्‍मविश्वास वाढवू शकतात. याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकतेचा प्रसार करणे आवश्‍यक आहे, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना या आजारावर उपचार करता येऊ शकतो हे समजेल आणि वेळेवर वैद्यकीय हस्‍तक्षेप होऊ शकतो. जसलोक हॉस्पिटलमधील वैद्यकीय उत्‍कृष्‍टता सर्व प्रकारच्‍या आजारांचे जागतिक दर्जाच्‍या केअरसह सर्वसमावेशक व्‍यवस्‍थापन करण्‍याची खात्री देते.'' 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

तिहार जेलमध्ये ‘तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’चा भव्य ग्रँड फिनाले

गायन, नृत्य, संगीत, चित्रकला, कविता आणि अभिनयातून बंद्यांनी दाखवली आपली प्रतिभा नवी दिल्ली। दिल्ली कारागृह प्रशासन आणि आर्ट क्रिएशन्स कल्चरल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 25 सप्टेंबर रोजी सेंट्रल जेल क्रमांक 8/9, तिहार येथे ‘ तिहार स्किल टॅलेंट हंट-2026’ चा भव्य ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश तिहार कारागृहातील बंद्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे हा होता. या कार्यक्रमातून “प्रतिभेला पंख, कौशल्यातून ओळख आणि भविष्यासाठी नवी ओळख” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. सुमारे 11 दिवस चाललेल्या या टॅलेंट हंटमध्ये बंद्यांनी गायन, नृत्य, वाद्यसंगीत, चित्रकला, कविता सादरीकरण आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांत आपली कला सादर केली. विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींची विजेते म्हणून निवड करण्यात आली. सहभागींच्या कलागुणांचे परीक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक भूपिंदर सिंह भूपी, पार्श्वगायक दीपक राणा, गायिका खुशबू लता...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...