सीधे मुख्य सामग्री पर जाएं

टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स


मुंबई। आयकॉनिक टाटा सिएराने धमाकेदार पुनरागन केले आहे, जेथे भारतातील ऑटोमोटिव्‍हप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. अधिकृतरित्‍या बुकिंगला सुरू झाल्‍याच्‍या पहिल्‍याच दिवशी सिएराने ग्राहक उत्‍साह व विश्वासासाठी नवीन मापदंड स्‍थापित केला आहे, जेथे ७०,००० हून अधिक बुकिंग्‍ज झाले आहेत आणि आणखी १.३५ लाख ग्राहक त्‍यांची पसंती व्‍यक्‍त करण्‍यासोबत औपचारिकपणे बुकिंग करत आहेत. या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादामधून भारतातील ग्राहकांमध्‍ये प्रीमियम मिड-एसयूव्‍ही म्‍हणून सिएराचा प्रख्‍यात दर्जा व लोकप्रियता दिसून येते.

या बुकिंग टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ''आम्‍ही उत्‍स्‍फूर्त प्रतिसादासाठी ग्राहकांचे आभार व्‍यक्‍त करतो, ज्‍यामधून टाटा सिएराचा प्रतिष्ठित दर्जा दिसून येतो. नियमांना नव्‍या उंचीवर नेण्‍याचा आपला वारसा कायम राखत सिएरा प्रीमियम मिड-एसयूव्‍ही या नवीन श्रेणीमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षा जाणून घेत या मध्यम आकाराच्‍या एसयूव्‍हीला नवीन लुक देण्‍यात आला आहे. एैसपैस जागा, आरामदायीपणा, लक्‍झरी, सुरक्षितता व दैनंदिन उपयुक्‍तता अशा प्रत्‍येक पैलूला अधिक दृढ करत सिएराने श्रेणीला पूर्णत: नवीन उंचीवर नेले आहे. सिएरा वेईकलपेक्षा अधिक असून प्रगती, व्‍यक्तिमत्त्व आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे.''

२५ नोव्‍हेंबर २०२५ रोजी टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍सने लाँच केलेली ऑल-न्‍यू टाटा सिएरा प्रतिष्ठित वेईकलचे नवीन व्‍हर्जन आहे, जिने तीन दशकांपासून महत्त्वाकांक्षा, ओळख व आठवणींना आकार दिला आहे. नवीन युगासाठी पुन्‍हा बारकाईने डिझाइन करण्‍यात आलेल्‍या सिएराने आपला दिग्‍गज वारसा व विशिष्‍ट डीएनए कायम ठेवला आहे, तसेच वेईकलमध्‍ये अत्‍याधुनिक बदल करण्‍यात आले आहेत. ही वेईकल यश, व्‍यक्तिमत्त्वाचे प्रबळ प्रतीक, शोधाचा उत्‍साह असण्‍यासोबत एस्‍केप मेडिकोअरसाठी आवाहन करते आणि अद्वितीय ड्रायव्हिंगचा आनंद देते. तीन प्रगत पॉवरट्रेन्‍स १.५ लिटर क्रियोजेट डिझेल, १.५ लिटर टीजीडीआय हायपेरियन पेट्रोल आणि १.५ लिटर एनए रेव्‍होट्रॉन पेट्रोलमध्‍ये उपलब्‍ध असलेली सिएरा विविध ड्रायव्हिंग स्थितींमध्‍ये सुलभ, आत्‍मविश्वासपूर्ण कार्यक्षमता देते. 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

लिटल एंजल्स इंग्लिश स्कूलच्या वार्षिक समारंभात डॉ. संजय शाह आणि डॉ. अल्पा शाह यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला

प्रतिभा, यश आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी सजला संस्मरणीय वार्षिक समारंभ मुंबई। मालाड पूर्व येथील लिटल एंजल्स इंग्लिश स्कूल आणि लिटल एंजल्स अकॅडमीचा वार्षिक समारंभ गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालय मराठी स्कूल, जयप्रकाश नगर, कलानगर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी ज्वेल मेकर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय जीवनलाल शाह आणि जैन अल्पसंख्याक सेवा संस्थानच्या उपाध्यक्षा डॉ. अल्पा संजय शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा परिवारातर्फे दोन्ही प्रमुख पाहुण्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार करण्यात आला. वार्षिक समारंभात विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपली प्रतिभा, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचे सुंदर प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनमोहक सादरीकरणांना उपस्थित पालक, शिक्षक आणि पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे डॉ. संजय जीवनलाल शाह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ चांगले गुण मिळवणे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, ...

किआ इंडियाचा विक्रीत नवा उच्चांक

    ४१% वाढीसह सप्टेंबरमध्ये ३२,०१७ वाहनांची विक्री  मुंबई। किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सप्टेंबर २०२६ मध्ये ३२,०१७ युनिट्सच्या घाऊक विक्रीसह भारतातील बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च मासिक विक्रीची नोंद केली. या विक्रीमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या २२,७०० युनिट्सच्या तुलनेत वार्षिक आधारावर ४१ टक्‍के वाढ झाली. ही ऐतिहासिक कामगिरी किया इंडियाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे, तसेच ब्रँडवरील आणि त्यांच्या विस्तारत जाणाऱ्या उत्पादन पोर्टफोलिओवरील ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास दर्शवते. कंपनीने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत देखील ही गती कायम राखत ८९,२५९ युनिट्सची विक्री नोंदवली, ज्यामध्ये २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६४,४४३ युनिट्सच्या तुलनेत ३८.५ टक्‍के वाढ झाली. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत किया इंडियाची एकत्रित विक्री २,५३,००८ युनिट्सवर पोहोचली आहे, गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवलेल्या २,०६,५८२ युनिट्सच्या तुलनेत यात २२.५ टक्‍के वाढ झाली आहे. या सातत्यपूर्ण कामगिरीमधून ब्रँडवरील वाढता ग्रा...

ऑडिओच्या पलीकडे झेप घेणार 'boAt'; नवीन श्रेणी आणि परदेशी बाजारपेठांवर देणार भर

मुंबई। ऑडिओ आणि वेअरेबल्स क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी भारतीय कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ' boAt' (बोट) आता आपल्या वाढीच्या (ग्रोथ) पुढील टप्प्यासाठी नवीन कन्झ्युमर टेक श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी प्रोजेक्टर्स, पर्सनल ग्रूमिंग, चार्जिंग सोल्यूशन्स आणि एंटरटेनमेंट व लाइफस्टाइल तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपल्या अस्तित्वाचा विस्तार करत आहे. कंपनी या पुढील टप्प्याकडे ‘boAt 2.0’ म्हणून पाहत आहे. या अंतर्गत ऑडिओ हा boAt च्या व्यवसायाचा मुख्य पाया राहील, तर नवीन श्रेणी आणि जागतिक बाजारपेठांना भविष्यातील वाढीचे प्रमुख इंजिन म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाईल. 'boAt 2.0' साठी कंपनी सज्ज: boAt चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नायर यांनी सांगितले की, "आता आमचा भर पुनर्लाभाकडून (टर्नअराउंड) शाश्वत वाढीकडे आहे. भक्कम ताळेबंद (बॅलन्स शीट), कार्यक्षम शिस्त आणि मजबूत मूळ व्यवसायाच्या जोरावर आम्ही 'boAt 2.0' साठी सज्ज होत आहोत." त्यांनी पुढे नमूद केले की, "आम्ही ऑडिओ व्यवसायातील आमचे अग्रस...